राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नव्हे हा तर जातीयवादी काँग्रेस पक्ष | जातीयतेतून आंबेडकरी कार्यकर्त्याची हत्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नव्हे हा तर जातीयवादी काँग्रेस पक्ष | जातीयतेतून आंबेडकरी कार्यकर्त्याची हत्या - बहुजन जागृती

बहुजन जागृती

डॉ बाबासाहेब आंबेडकर : बहुजन समाजाची राजनीतिक आणि सामाजिक चळवळ

Sunday, June 7, 2020

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नव्हे हा तर जातीयवादी काँग्रेस पक्ष | जातीयतेतून आंबेडकरी कार्यकर्त्याची हत्या






<img src="arvind-bansod-murder-case.jpg" alt="mithilesh umarkar nearest of home minister anil deshmukh murders arvin bansod"/>




अरविंद बन्सोड हा ३० वर्षीय तरुण मुलगा (तालुका नरखेड, गाव पिंपळधरा), एमए च शिक्षण पूर्ण झालेला, 

एमपीएससी स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा विध्यार्थी, सामाजिक कार्यात अग्रेसर, घरात सर्वात मोठा, त्याला २ 

लहान भाऊ, म्हतारे बाबा, आई सहा वर्षा आधीच वारलेली.अरविंद स्पर्धा परिक्षेची तयारी करत होता आणि 

सोबतच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेतून गोरगरीब जनतेचे काम करायचा. एक दलित कार्यकर्ता 

व्यवस्थेला प्रश्न का विचारतो ? या रागातून त्याची सुनियोजित कट करून हत्या करण्यात आली असल्याचा आरोप 

अरविंदच्या निकटवर्तीयांकडून करण्यात आला आहे.

नेमकं काय घडलं :-

अरविंद बन्सोड हा त्यांचा मित्र गजानन राऊत (घटनेतील प्रत्यक्षदर्शी) एटीएमला पैसे काढायला गेले असता, 

जवळच आरोपीची नाथपवनी येथील एचपी गॅस एजन्सी आहे. एचपी गॅस एजन्सीचा नंबर हवा म्हणून बोर्डचा 

फोटो घेत असताना लगेच आरोपी व त्याचे तीन साथीदार तिथे आले व मृतक अरविंद व मित्र गजानन राऊत 

यांना फोटो का घेतली म्हणून अरविंदला जातीयवाचक शिवीगाळ करू लागले. "तु क्या दलितों का नेता बनने 

की कोशिश कर रहा क्या... तु महार है, हमारे पैरो के नीचे रहेगा, तुम लोग बस गुलामी करो, ज्यादा नेता बनने 

की जरूरत नहीं" जातीयवाचक बोलून अरविंदला अपमानित केले आणि दोघांचेही मोबाइल हिसकावून घेतले. 

अरविंदला लाथा बुक्क्याने बेदम मारहाण केली. अरविंद एजन्सीच्या बाहेर पडून होता, आरोपी मिथलेश 

उमरकर निघुन गेले नंतर थोड्या वेळाने अरविंदने स्वतःला सावरत उभा झाला व सोबत आलेल्या मित्र गजानन 

याला पेट्रोल भरायला पाठवले आणि मी मोबाईल घेऊन येतो असं बोलला.

थोड्या वेळानि जेंव्हा गजानन (प्रत्यक्षदर्शी) घटना स्थळी परत आला तर अरविंद बन्सोड (मृतक) गैस 

एजन्सीसमोर पडलेला होता व बाजूला किटकनाशकचे बॉटल पडल होत. लोक जमा झाल्याच पाहून आरोपींना 

त्याला स्वतःच्या कारमध्ये उचलून बसवलं व बॉटल ही सोबत घेतली व गजानन (प्रत्यक्षदर्शी) याला गाड़ीमध्ये 

घेण्यास नकार दिला व हॉस्पिटल मध्ये जाऊन त्याला एडमिट केल्याचं नाटक केलं. त्याच वेळला गजानन घरी 

आलं आणि पीडिताच्या कुटुंबाबाला घेऊन पोलीस स्टेशन गाठले.

जलालखेडा ठाण्याच्या पोलीस निरीक्षकाने तक्रार नोंदवायला नकार दिला. अरविंदच्या कुटुंबालाच म्हटले कि " 

अजून व्यक्ती मेला नाही ना, जेव्हा मारेल तेंव्हा आम्ही कार्यवाही करू" असे बेजबाबदार वक्तव्य पोलीस 

निरीक्षकाने काढले. दोन दिवस सतत पोलीस स्टेशनला परिवार जात राहिला, कधी हॉस्पिटल कधी पोलीस 

स्टेशन तक्रार काही घेतली नाही. पोलीस अरविंदच्या मरण्याची वाट पाहत होते. अखेर दोन दिवसाने दि. २९ मे 

२०२० ला अरविंदने अखेरचा श्वास घेतला.

अरविंद बन्सोडने जीव सोडला तेंव्हाहि गजानन हा पुलिस स्टेशनला गेला आता तरी केस घ्या. आमचा दादा मेला 

आहे. तेंव्हाही निर्दयी पोलीस यंत्रणेने तक्रार घेतलेली नाही. जेंव्हा परिवाराने आणि गावकर्यांनी बॉडी ताब्यात 

घेणार नाही असा इशारा दिला तेंव्हा तक्रार दाखल करून घेतली. त्यावेळी सुद्धा उमरकरचा सालगडी असलेला 

जातीय पोलीस निरीक्षक याने चाल खेळली, एफआईआरमध्ये फक्त ३०६ व ३४ इंडियन पेनेल कॉड नुसार गुन्हा 

दखल केला.


<img src="arvind-bansod-murder-case.jpg" alt="mithilesh umarkar nearest of home minister anil deshmukh murders arvin bansod"/>


ऑलइंडियापँथरसेनेनी फोडली प्रकरणाला वाचा :-
दि. ३० मे २०२० च्या रात्री ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांना एक निनावी फोन आला आणि अरविंद बन्सोड हा चळवळीतला कार्यकर्ता होता त्याची हत्या झाली आहे. हे प्रकरण राजकीय दबावातून दाबलेलं आहे. मी सरकारी नौकरीत असल्यामुळे माझं नाव सांगू शकत नाही असं त्यांनी सांगितलं आणि अरविंद बन्सोडच्या भावाचा आणि सोबत असलेल्या गजाननाचा नबंर पाठवला. गजाननकडून सर्व माहिती घेतली आणि दि. ३१ मे २०२० ला सोशल मीडियातून या घटनेला वाचा फोडली. तात्काळ दि. ०१ जून २०२० ला ऑल इंडिया पँथर सेनेचे नरखेड तालुका अध्यक्ष शुभम गोंडाणे आणि नागपूर शहर अध्यक्ष पवन राऊत यांना परिवाराला भेट देण्यास पाठवले. संघटनेचे दोन्ही यांनी अरविंदचा भाऊ व गजानन यांना सोबत घेऊन जलालखेडा पोलीस स्टेशन गाठले. ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीने निवेदन दिले कि हि हत्या असून ३०२ सहित ऍट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत कार्यवाही करण्याची मागणी केली. पीडित गजाननाला लाईव्ह मार्फत हि घटना सविस्तर सांगायला लावली.दि. ०२ जुन २०२० ला पीडित पदाधिकाऱ्यांनी पीडित कुटुंबाच्या घरी भेट दिली. ऑल इंडिया पँथर सेनेचे नरखेड तालुका अध्यक्ष शुभम गोंडाणे, नागपूर शहर अध्यक्ष पवन राऊत, स्वीटी गजभिये, सन्हेल सोमकुवर, पवन गजभिये यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना निवेदन देऊन आरोपींवर कठोर कार्यवाही करून अरविंद बनसोडला न्याय देण्याची मागणी केली. अनिल देशमुख दलित अत्याचाराच्या केसेसला वेळ देत नाहीत कारण त्यांना दलितांचे मुद्दे मुद्देच वाटत नाहीत. निवेदन घेतले आणि बघतो म्हणून निघून गेले. सातत्याने या घटनेला हांबर केल्यामुळे सत्तेच्या बळावर राष्ट्रवादी काँग्रेसने दाबलेलं प्रकरण उचकुन काढले आहे.


हे वाचा : उतावीळ आंबेडकरी तरुणांनो


आरोपी 'मिथिलेश ऊर्फ मयूर बंडोपंत उमरकर राष्ट्रवादी काँग्रेसचे नागपूर जिल्हा उपाध्यक्ष आहेत, तर आरोपी 

राष्ट्रवादीचा युवा नेता पंचायत समिती सदस्य आहे. तसेच आरोपी मिथिलेश उमरकर हा राज्याचे गृहमंत्री अनिल 

देशमुख यांचा निकटवर्तीय असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे आरोपीस वाचविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर 

राजकीय दबाव टाकुन प्रकरण मिटविण्याचे प्रयत्न केले जात आहे. या प्रकरणात किरकोळ ३०६, ३४ 

कलमाअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. ही बाब फार चिंताजनक आहे.

या प्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी तपास अधिकारी आणि नागपूरचे पोलीस अधीक्षक (SP) यांच्याशी बोलून माहिती घेतली. पोलीस अधीक्षक (SP) यांना सांगण्यात आले आहे की तपास अधिकारी योग्य नसल्याने या प्रकरणाचा तपास दुसऱ्या चौकशी अधिकाऱ्याकडे देण्यात यावा, या मागणीला पोलीस अधीक्षक (SP) यांनी होकार दिला आहे.

आंबेडकरी चळवळीचे प्रश्न :-

१) एफआईआर उशिरा का घेण्यात आली?

२) पोलीस निरीक्षक डेकाते यांनी तात्काळ हॉस्पिटलमध्ये जाऊन अरविंदचा जबाब का घेतला नाही?

३) पोलीस निरीक्षक डेकाते याने घटनास्थळी जाऊन तपास का केला नाही?

४) एचपी गॅस एजन्सीसमोर लागलेले सीसीटीव्ही फुटेज का तपासलेले नाहीत?

५) जातीवाचक शिवीगाळ करत जातीयतेतून हत्या झालेली असताना ३०२ व ऍट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत कार्यवाही न 

करता फक्त ३०६, ३४ कलमच का लावले?

६) प्रत्यक्षदर्शीने दिलेला जबाब त्याला वाचायला का दिलेला नाही?

७) अरविंदचे मित्र पेट्रोल भरायला गेल्यावर आरोपी मिथलेश उमरकरनेच अरविंदला विष पाजले असावे?

८) आरोपींनि अरविंद गायकवाडला पॉयजनच्या बॉटलीसहित दवाखान्यात नेले होते त्यावेळी सुद्धा त्यांनी औषध 

गाडीत पाजले असावे?

९) दि. २९ मे २०२० ला एफआईआर दखल झाली मग आरोपीला तात्काळ अरेस्ट का करण्यात आली नाही?

१०) दि. २९ मे २०२० ला एफआईआर दाखल होते आणि लगेच दि. ३० मे २०२० ला त्याला anticipatary बेल 

कशी काय मिळते? हे राजकीय दबावाशिवाय होऊच शकत नाही? पोलीस निरीक्षक थेट गृहमंत्री अनिल 

देशमुखांच्याच दबावाखाली होते का? दि. २७ मे २०२० ला जर तक्रार घेतली असती आरोपीला अटक केले असते 

तर जमानत तात्काळ मिळाली नसती? पोलीस यंत्रणेनीच उमरकरला कायदेशीर सल्ला देऊन जमानत दिली.

ऑल इंडिया पँथर सेनेच्या मागण्या :-

१) आरोपींना तात्काळ अटक करून ३०२ व ऍट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत कठोर कार्यवाही झाली पाहिजे.

२) जलालखेडा पोलीस स्टेशनचा पोलीस निरीक्षक इकातेला तात्काळ निलंबित केले पाहिजे.

३) जलालखेडा पोलीस निरीक्षक इकाते यांचे २७ मे २०२० पासूनचे कॉल तपासले पाहिजेत.

३) अरविंद बन्सोड हत्याकांडातील आरोपी मिथलेश उमरकर याच पंचायत समिती सदस्य पद रद्द केलेच पाहिजे.

४) पीडित कुटुंबाला तात्काळ संरक्षण दिलंच पाहिजे.

५) अरविंद बन्सोडच्या कुटुंबातील सदस्याला शासकीय नौकरी मिळालीच पाहिजे.

६) गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कार्यकाळात दलित हत्याकांड आणि दलित अत्याचाराच्या शेकडो घटना 

घडत असल्यामुळे त्यांनी नैतिक जबाबदारी घेऊन तात्काळ राजीनामा दिला पाहिजे.

रोहिथ वेमुलाची शैक्षणिक हत्या आणि हि अरविंद बन्सोडची सामाजिक राजकीय हत्या एकसारखीच आहे. 

जातीयवाद आणि सत्तेची मस्ती यातून हि हत्या झाली आहे. आरोपी मिथलेश उमरकरचे वडील राष्ट्रवादी 

काँग्रेसचे माजी जिल्हा अध्यक्ष आणि आता जिल्हा उपाध्यक्ष आहेत. शरद पवार याना वंचित बहुजन आघाडीकडे 

आंबेडकरी समूह गेला म्हणून त्यांनी तात्काळ दखल घेत हा समूह आपल्याकडे आला पाहिजे असे पदाधिकर्यांना 

आदेश दिले. आंबेडकरी समूहावर दलित अत्याचार होतात तेंव्हा मात्र ते बोलत नाहीत. आता या उमरकर 

परिवाराची पक्षातून हकालपट्टी करतील का? असा आमचा त्यांना प्रश्न आहे.

वैजापूर भीमराज गायकवाड हत्याकांड, पारधी समाजाचं ३ जणांचं हत्याकांड, अरविंद बन्सोडच हत्याकांड 

आणि शेकडो दलित अत्याचार झाल्यामुळे निष्क्रिय गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तात्काळ राजीनामा दिला 

पाहिजे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री या नात्याने दलितांच्या हत्याकांडाकडे गांभीर्याने पहिले पाहिजे. 

दलित आंबेडकरी समूह उद्रेकाच्या उंबरठयावर आहे, आमचा अंत पाहू नका अन्यथा तीव्र आंदोलनाचा पवित्रा 

घेतला जाईल.

-दिपक केदार | राष्ट्रीय अध्यक्ष - ऑल इंडिया पँथर सेना




No comments:

Post a Comment