सामाजिक कार्यकर्ता तसेच पंचायत समिती सदस्य असलेले अरविंद बनासोड याची हत्या गृहमंत्री अनिल
देशमुख यांचे निकटवर्ती राष्ट्रवादी काँग्रेस चे कार्यकर्ते मिथिलेश उमरकर यांनी केली . पोलीस तक्रार नोंदवायला
तयार नाहीत . शेवटी आंबेडकरी कार्यकर्त्यांनी उभारलेल्या आंदोलन प्रतिसाद म्हणून तक्रार नोंदविण्यात आली .
पण प्रत्यक्षात हा खून नसून पारिवारिक वातावरणातून आत्महत्या केल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे .
हे वाचा : जातीयवादी काँग्रेस पक्ष | अरविंद बनासोड हत्याकांड
या घटनेचा पूर्व पोलीस निरीक्षक व वंचित बहुजन आघाडी उपाध्यक्ष ॲड. धनराज वंजारी यांनी मांडलेली
अरविंद बनासोड हत्याकांड प्रकरणातील पोलीस यंत्रणेचा वापर सत्ताधारी पक्षाकडून कसा होतो हे पहा ...
1. जलालखेडा ठाणेदार श्री दीपक डेकाटे, यांनी दिखाऊपणे ताबडतोब तकलादू भा.द.वि. कलमांव्दारे
राष्ट्रवादीच्या आरोपीच्या विरुध्द गुन्हा नोंदवून, आरोपीचे अटकनाट्य संगनमताने घडवून आणले (A PRIME
CONSPIRACY) व आरोपीविरोधात परिस्थितीजन्य पुरावा निष्पन्न करणेसाठी काहीच प्रयत्न केलेले नाहीत.
2. IN FURTHERANCE TO IT.....गोंधळलेल्या प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराचा भोंगळ जबाब (कलम १६२
2. IN FURTHERANCE TO IT.....गोंधळलेल्या प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराचा भोंगळ जबाब (कलम १६२
क्री.प्रो.कोड-१९७३ अन्वये) नोंदवून आरोपींसाठी ढाल (PROTECTION) निर्माण केली. (कलम १६२ क्री. प्रो.
कोड अन्वये नोंदवलेला जबाब बिन-सहीचा व पोलिसांच्या म्हणण्याप्रमाणे असतो, हे कायदेशीर सत्य आहे.
म्हणून त्यावर तर्क-विवेकाने संशय घेण्यास जागा आहे.)
3. आरोपीस अटक केल्यावर कसलीच लॉक-अप प्रक्रिया न करता, न्यायालयात त्यांना दिखाऊ पी.सी.आर.
साठी हजर करून, तपास करण्याच्या दृष्टीने कसलाच न्यायालयीन व लोक अभियोक्त्याच्या मार्फतीने युक्तिवाद
न करता, आरोपीस जमीन मिळवून देण्यास अवैध्यरीत्या मदत केली. सादर बाबत CCTV footage
कायदेशीररीत्या आवश्यक असून, उपलब्ध व्हावे. (जर तपासी व न्यायालयीन यंत्रणेत खोट नसेल तर)
4. उपरोक्त माहिती जलालखेडा ठाणेदार श्री दीपक डेकाटे यांनी वरिष्ठांना कळवून त्यांची दिशाभूल नव्हे, तर
संगनमताने खोट्या दिखाऊ माहितीची उपलब्धता करवून दिली; हा मुद्दा महत्वाचा आहे.
5. आणि म्हणूनच नागपूर ग्रामीण पोलीस अधिक्षक श्री राकेश ओला खोट्या पद्धतीने युक्तिवाद करतांना
5. आणि म्हणूनच नागपूर ग्रामीण पोलीस अधिक्षक श्री राकेश ओला खोट्या पद्धतीने युक्तिवाद करतांना
आढळतात. प्रत्यक्षदर्शी सक्षीदाराला समोर बसवून बुद्धीभेद निर्माण करतात. श्री ओला यांनी लक्षात ठेवावे कि, ते
कार्यकारी-अधिकारी आहेत, त्यांच्याकडे न्यायालयीन वकूब नाही.
6. साक्षिदाराचा जबाब कलम १६४ क्री.प्रो.कोड १९७३ अन्वये न्यायालयासमोर नोंदवण्याच्या प्रक्रियेत जी त्रुटी
6. साक्षिदाराचा जबाब कलम १६४ क्री.प्रो.कोड १९७३ अन्वये न्यायालयासमोर नोंदवण्याच्या प्रक्रियेत जी त्रुटी
ठेवायची त्यात श्री दीपक डेकाटेंचा हातखंडा आहे. (योग्य वेळी पुरावा सादर केला जाईल)
7. हे सर्व का घडले किंवा घडवून आणले? कारण तो जिल्हा/तालुका/गांव (थडीपवणी) हा मा.गृहमंत्री श्री अनिल
7. हे सर्व का घडले किंवा घडवून आणले? कारण तो जिल्हा/तालुका/गांव (थडीपवणी) हा मा.गृहमंत्री श्री अनिल
देशमुख यांचा बालेकिल्ला असून, आरोपी हे राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते आहेत. व बळीत/मयत (अरविंद
बनसोड) हा वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता आहे.
8. श्री अनिल देशमुखांनी या आधी जातीयवादाच्या धर्तीवर त्यांच्या विरोधकांना कसे पोलीस केसेसच्या
8. श्री अनिल देशमुखांनी या आधी जातीयवादाच्या धर्तीवर त्यांच्या विरोधकांना कसे पोलीस केसेसच्या
माध्यमातून लोळवले याचे समाजात उघडपणे दिसेल (छुप्या रीतीने बोलले जातात) असे पुरावे आहेत. पण
देशमुखशाही उर्फ साम्राज्यशाही पुढे उघडपणे कुणी जीभ उचलत नाही, हे ही तितकेच न नाकारता येणारे सत्य
आहे.
9. सी.बी.आय. ने श्री.डेकाटे व श्री.ओला यांना सह-आरोपी करून या प्रकरणाचा सखोल तपास करावा.
No comments:
Post a Comment