कामानिमित्त दोन वेळ पुण्याला जावं लागलं. पहिल्यांदा भीमा कोरेगाव विजयस्तंभ आणि दुसर्यांदा संभाजी महाराजांची समाधी पाहायला गेलो होतो. आपल्या पुर्वंजाच्या पराक्रमाच्या ऐतिहासिक पाऊलखुना, प्रतिकं पाहील्यावर कंठ कसा दाटून येतो.
संभाजी महाराजांची समाधी पाहीली, लागूनच असलेली कविकलश यांचीही समाधी पाहीली. अगदी सुरक्षित जातीने काळजी घ्यावी असा बंदोबस्त. इतकंच कशाला तर तैनात असलेले पोलिस मोबाईल सेल्फी देखील घेऊ देत नव्हते.
त्यानंतर थोड्याच अंतरावर (फोटोमध्ये दिसते) गोविंद गोपाळ गायकवाड अर्थात गणपत महार यांची समाधी पाहायला गेलो. पाहील्यावर अंतःकरणापासून वाईट वाटलं.
संभाजी महाराजांची समाधी पाहीली, लागूनच असलेली कविकलश यांचीही समाधी पाहीली. अगदी सुरक्षित जातीने काळजी घ्यावी असा बंदोबस्त. इतकंच कशाला तर तैनात असलेले पोलिस मोबाईल सेल्फी देखील घेऊ देत नव्हते.
त्यानंतर थोड्याच अंतरावर (फोटोमध्ये दिसते) गोविंद गोपाळ गायकवाड अर्थात गणपत महार यांची समाधी पाहायला गेलो. पाहील्यावर अंतःकरणापासून वाईट वाटलं.
मी स्वतःशीच पुटपुटत होतो.. 'हा आहे फरक.. हा आहे जातीवाद.. हाच तो शूरवीर जेव्हा कोणात दम नव्हता तेव्हा कशाचीही पर्वा न करता आपल्या राजाची अंत्यविधी करणारा आणि आज पहा काय दुर्दशा केली जातीवादी लोकांनी त्याच माणसाच्या समाधीची.. शिवाय सरकार तरी काय करत आहे.. महाराष्ट्राच्या स्थापनेपासून ते आजतागायत महाराजांना दैवत माणनार्यांची सत्ता येऊन एकाही सरकारला दैवताच्या निष्ठावान मावळ्याबद्दल आपुलकी प्रेम कृतज्ञता वाटू नये.. ही शोकांतिका आहे तथाकथित पुरोगामी महाराष्ट्राची...'
तर तिथला पोलिस मला म्हटला.. ओ..दादा पहायला आलेत ना.. दर्शन घ्या आणि जावा.. काही बोलू नका.. अगोदरच तणावाचं वातावरण आहे.. वातावरण चिघळेल काही बोलता कशाला..
विचार करा मी सत्य बोललो तरी ते तणावाचं वातावरण निर्माण करायला कारणीभूत ठरु शकतं इतका खोटेपणा सहज स्विकारलेल्या वातावरणात वावरतोय आपण.
मात्र, ही सुनियोजित केलेली दुर्दशा पाहुन मनात डोक्यात तेच घोंगावत होतं. वाटत होतं, कोणी इतकं कसं कृतघ्न असावं, म्हणून लिहून मन हलकं केलं.
हीच ती शुरवीर गणपत / गोविंद गोपाळ महाराची समाधी, ज्याची जातीवाद्यांनी २०१८ मध्ये इतिहासातील त्यांच्या पुर्वजांच्या पराभवाचा बदला म्हणून नासधूस केली होती. वाईट केवळ नासधूस केल्याबद्दल वाटलं, असं नाही. वाईट याचं वाटलं की संभाजी महाराजांना दैवत मानणार्यांपैकी कोणालाही संभाजी महाराजांंवर अंत्यविधी करणार्या निष्ठावाण मावळ्याबाबत कवडीचाही आदर कृतज्ञभाव नसावा किंवा चूकीचं घडतय म्हणून विरोध करायचं धाडस वाटू नये..?
अरे.. संभाजी महाराजांना पकडून देणारा गणोजी शिर्के कोण होता..?
त्या तुलनेत गोविंद महाराचे कार्य पहा.. तरीही समाधी नष्ट करता..? केवळ महाराने इतकं धाडसाचं काम केलं म्हणून..? खोट्या प्रतिष्टेपोटी मनाला पटत नाही म्हणून मान्य करायचं नाही..?
ही तर काळ्या दगडावरील पांढरी रेघंच म्हणायची, त्याची काय सांगायची गरज.
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री य. चव्हाण आणि इतिहास तज्ज्ञ वा.सी बेंद्रे यांनी मिळुन संभाजी महाराज समाधी स्थळी एक बोर्ड लावला होता ज्यावर लिहलेलं होतं की,
"या वृंदावणाच्या तीन सेवेकाऱ्यांपैकी एक गोविंद गोपाळ हा महार जातीचा होता हे विशेष होय"
हा बोर्ड तब्बल २०१४ म्हणजे भाजप सरकार सत्तेत येईपर्यंत तिथं सुरक्षित होता. पण नंतर तो बोर्ड काढून दुसरा बोर्ड लावला ज्यावर शिवले देशमुख असे नावे लिहलेले आहेत.. हे मी स्वतः पाहीलं.
मुळ इतिहास पाहीला तर जेव्हा संभाजी महाराजांच्या शरिराचे तुकडे करुन भीमा नदीच्या काठी फेकले होते. अंत्यविधीसाठी ते शरिराचे तुकडे गोळा करुन शिवणारे शिवले असा त्याचा अर्थ होतो. शिवाय शिवले आडणावाचे लोकं तिथं असल्याचा काहीही ऐतिहासिक पुरावा नाही.
गोविंद गोपाळ ऐवजी अंत्यसंस्कार करणारे आम्ही होतो असा दावा जे शिवले देशमुख करत आहेत त्यात जर सत्य असतं तर संभाजी महाराजांची समाधी वढूच्या घनदाट जंगलात अज्ञातवासात असलेली वा.सी. बेंद्रे या इतिहास तज्ज्ञाला का शोधावी लागली..? समाधी स्थळी जो बोर्ड होता त्यावर गोविंद गोपाळ हा महार जातीचा सेवेकरी होता हे का लिहावं लागलं..? आणि गोविंद गोपाळांना ४५ बिघा जमीन का म्हणून दिल्या गेली होती..?
जे लोकं आज कृतघ्नपणे बोर्ड बदलुन दुसर्यांचे नावं लिहत आहेत, त्याला काही मुकसंमती देवून सत्य इतिहास बदलण्याचा प्रयत्न करित आहेत त्यांनी लक्षात ठेवावं की,
महाराजांच्या शरिराचे तुकडे औरंगजेब व स्थानिक ब्राम्हणांच्या भितीने अंत्यविधीसाठी गोळा करायचे धाडस कोणीच दाखवत नव्हतं, तेव्हा वढू गावचा तत्कालीन प्रमुख (सरपंच) दामाजी पाटील औरंगजेबाच्या फर्मानाला घाबरुन जे जे घडत होतं आणि जे जे घडलं ते ते निपचितपणे घरात बसून पाहत होता. हे त्या गावच्या पाटलाचं शौर्य आणि महाराजांवरचं प्रेम. आज तुम्ही महारांच्या पराक्रमाचे श्रेय स्वतःच्या नावावर लाटण्याचा प्रयत्न करत आहात..?
अखेर..
"काहीही झाले तरी चालेल, पण मी माझ्या राजाच्या मृत देहावर अंत्यसंस्कार करणारच. त्यासाठी हजार वेळा मरायला तयार आहे. औरंगजेबाच्या आणि ब्राम्हणाच्या दहशतीला मी घाबरणारा नाही.
होय, मी माझ्या राजावर अंत्यसंस्कार करणारच. "
असे म्हणत, ज्यांनी पेडगावच्या बहादूर गडावरुन संभाजी महाराजांच्या सुटकेसाठी प्रयत्न करत असतांना आपल्या राजासाठी प्राणाचं बलिदान दिलं होतं त्या शूरवीर 'रायप्पा' महाराच्या सख्ख्या मावसभावाने म्हणजेच शूरवीर गोविंद गोपाळ गायकवाड अर्थात गोविंद / गणपत महार यांनी ते धाडस दाखवलं आणि छत्रपती संभाजी महाराजांवर अंत्यसंस्कार केले..
हा आहे सत्य इतिहास..!
'तुम दौडो हम कडबे मे' विचाराच्या लोकांना हा त्यांच्या नाकर्तेपणाचा इतिहास कसा काय पचेल..? म्हणून काय तर सत्य इतिहास मिटवून टाकायचा.
'जेव्हा मी जात चोरली' विचारग्रस्त लोकांना सांगू इच्छितो.. अरे बाबांनो आपला इतिहास खुप शूरवीरतेचा आणि गौरवशाली आहे. बाबासाहेबांनी 'शूद्र पुर्वी कोण होते ?' का लिहलं तर.. खोट्या प्रतिष्टेच्या आड न्युनगंडातून जात लपवत जावू नका.
आपला महारांचा इतिहास हा धाडस शूरवीरता प्रामाणिक व इमानदारीचा आहे.
गोविंद गोपाळांची नाशिकच्या एका किल्ल्यावर राज्यपाल म्हणून नियुक्ती केली गेली होती. जो किल्ला औरंगजेबाला जिंकता आला नाही.
त्याचबरोबर १८६८ मध्ये संभाजी महाराजांनी गोव्या जवळील स्टीफन किल्ला जिंकला असता त्या किल्ल्यावर देखील राज्यपाल पदी गोविंद गोपाळांची नियुक्ती केली होती.
परंतू, जातीने महार असल्या कारणाने गोविंद गोपाळांची सदाशिव पेठेतून लिहलेल्या इतिहासाने याची नोंद घेतली नाही.
ते तुम्हाला पेशवेकालीन पुण्यातील महारांच्या इतिहासाची आठवण करुन देतील, तुम्ही त्यांना त्याच पेशव्यांच्या काळातील खर्ड्याच्या लढाईतील महारांचे शौर्य सांगा, संभाजी महाराजांचे तुकडे केल्यानंतर तुळापुरच्या ब्राम्हणांचे वाडे जाळणारा व गावातून हद्दपार करणारा हाच शूर गोविंद महार होता.. हे सांगा.
ज्या पेशव्यांना महारांच्या सावलीचा विटाळ होत होता, त्या पेशवाईचा १८१८ ला अंत करणारे देखील आपले पुर्वज शूरवीर महारंच होते, हे कायम लक्षात असू द्या.
म्हणून मला रायनाक अमृतनाक शिदनाक रायप्पा गोविंद आदी शूरवीर महारांचा वंशज असल्याचा अगदी मनापासुन अभिमान आहे..!
बाबासाहेबांना देखील त्यांचा अभिमान होता. म्हणून १८१८ च्या लढाईनंतर ११० वर्षाने बाबासाहेबांनी १९२७ साली भीमा कोरेगावच्या विजयस्तंभाला जावून अभिवादन केले होते.
आपल्याला राजकीय चळवळ यशस्वी करायची असेल तर त्याअगोदर सांस्कृतिक चळवळ गतिमान करावी लागेल. त्यासाठी आंबेडकरी चळवळीतील ऐतिहासिक प्रतिकांचे संवर्धन व पुनर्जीवन करुन नवीन पिढीसमोर आणने गरजेचे आहे.
जय भीम.. जय भारत 🙏
राज गवई सोशल ऍक्टिव्हिस्ट
#शौर्यदिन
#भीमाकोरेगाव
#जयभीम
No comments:
Post a Comment