चक्रवर्ती राजा सम्राट अशोक जयंती विशेष । 1 एप्रिल 2020 चक्रवर्ती राजा सम्राट अशोक जयंती विशेष । 1 एप्रिल 2020 - बहुजन जागृती

बहुजन जागृती

डॉ बाबासाहेब आंबेडकर : बहुजन समाजाची राजनीतिक आणि सामाजिक चळवळ

Monday, March 30, 2020

चक्रवर्ती राजा सम्राट अशोक जयंती विशेष । 1 एप्रिल 2020

<img src="samrat-ashok-jayanti-2020.jpg" alt="maurya samrat ashoka birth anniversary 1st april 2020"/>



प्रियदर्शनी....सम्राट अशोका.....

तथागतांचा धम्म जपण्याचे आणि लोकांपर्यंत पोहचवण्याच कमी - जास्त कार्य गेल्या अडीच हजार वर्षांत

असंख्य व्यक्ती,पंथ,संस्था,इत्यादींनी केलं या सर्वांत धम्माच्या समग्र इतिहासामध्ये अग्रस्थानी ज्याचं नाव घ्याव 

लागेल,ते तिसरी धम्मसंगीति बोलावून धम्माचे व संघाचे मूळ स्वरूप पुन्हा स्थापित करणारा एकमेव सम्राट 

अशोका होय.!

धम्माच्या अनुयायी म्हणूनही आणि धम्माला अनुसरून राज्य करणारा शासनकर्ता,न्यायप्रिय,शितप्रिय म्हणून ही 

त्यांचं कार्य निदान भारताच्या इतिहासात तरी अजोड आहे.त्यांच्या महान कार्याचा आढावा संमग्रपणे घेण्याच 

ठरवलं तर लेख हा खूप मोठा होईल..!!

परंतू त्यांनी केलेल्या कार्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणे,हे मात्र आजच्या घडीला या ठिकाणी अत्यावश्यक 

आहे,त्याची खरी गरज आहे,त्यांनी राज्य कारभार हा सहृद्यतेने आणि धम्माला अनुसरून केला होता.यातील 

त्यांच्या काही महत्वपूर्ण कार्य,कृतीची मांडणी येथे करावीशी वाटते..!!

हे वाचा - आंबेडकरी समाज आणि धम्मचक्र परिवर्तन दिन

सम्राट अशोकाने धम्माचा उपदेश करण्यासाठी संपूर्ण भारतात विविध ठिकाणी उपदेशक पाठवले,परंतू 

त्यांसबरोबरीन त्यापलीकडे जावून त्यांनी श्रीलंका,बह्मदेश ग्रीस अशा अनेक देशात ही त्यांनी धम्म प्रसार 

करण्यासाठी आपले धम्मदूत पाठविले..!!

त्यांचं हे कार्य बौद्ध धम्माच्या इतिहासात अगदी वरच्यास्थानी,,वाचर्थाने सर्वस्वी अविस्मरणीय व मोठे आहे,त्यांनी 

जर हे केलं नसतं तर कदाचित जेव्हा भारतातून धम्म लुप्तप्राय झाला,तेव्हा तो साऱ्या जगातून समाप्त झाला 

असता,आणि हे असे घडू शकले असते,नाकारता येत नाही..!!

सम्राट अशोकाने आपली दोन्ही मुले त्यांची नावे देखील धम्माला अनुसरून आहे..महिंद, आणि संघमित्ता यांना 

सम्राट अशोकाने धम्मकार्यासाठी श्रीलंकेत पाठविले,ही ती धम्माकार्यात इतकी व्यस्त झाली की ती पुन्हा भारतात 

आली नाही..!!

येवू शकली नाही, धम्मकार्यामुळे जन्म देणाऱ्या आईवडिलांना देखील त्यांना भेटता, पाहतआलं नाही.हा त्याग 

असतो धम्मासाठी केलेला,धम्म विचारांचा प्रसार,प्रचार करण्यात त्यांनी स्वतःला इतकं एकरूप करून घेतलं की 

ते त्याच भूमीत समाविष्ठ झाले, धम्म हा सहज वाढत,रुजत नाही,त्यासाठी त्याग हा देखील खूप मोठा असावा 

लागतो..!!

त्यांच्या या त्यागामुळे,कार्य,कर्तृत्वालामुळेच आजच बौद्ध धम्माचा ग्रंथ असलेली तीपिटीका जगात जिवंत 

राहिली,जर ते जर नसते तर जगाला त्रिपटीकाची ओळख झाली नसती,आपल्याला ती पुन्हा मिळाली नसती,आज 

अनेकांनी स्वतःच्या स्वार्थासाठी धम्म स्वीकारला परंतू धम्मवाढवण्यासाठी त्याग मात्र कोणीही करताना दिसतं 

नाही..!!

तिपिटिका ही त्याकाळी बौद्ध अनुयायी,भिक्षु यांच्या तोंडपाट होती,त्यामूळे त्यांनी जगात यशस्वीपणे धम्म 

रुजवला,परंतू कालांतराने माणस ही मृत होत गेली,लुप्त पावत गेली,तर हा ग्रंथ जपण्याचं मोठं काम देखील 

श्रीलंकेत करण्यात आलं..!!

हे वाचा - ब्राह्मण सम्राट अशोकाचा तिरस्कार का करतात ?

जर सम्राट अशोकाने धम्म प्रसारण करण्यासाठी आपली मुलं,दूतावास जर समुद्राच्या पलीकडं पाठवली नसती 

तर कदाचित धम्म आपल्या कळू शकला नसता,कारण सम्राट अशोका नंतर देशावर राज्य करणाऱ्या विविध 

राज्यकर्त्यांनी धम्माच्या भारत देशातील अनेक खुणा मिटवल्या, नष्ट केल्या,अनेक लेण्यांना विद्रुप करून 

त्याठिकाणी देवळं उभारली,

आजच्या एकविसाव्या शतकात तर आपल्या मुलांना धम्म कळाला नसता जर का.....सम्राट अशोकानंतर या 

भारत भूमीवर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दुसरं धम्मचक्र परिवर्तनाच या भारत देशात १९५६ ला फिरवलं 

नसतं, जगात बुद्धांच्या धम्माचा जो सुगंध जो दरवळतो त्यात सम्राट अशोका व त्यांच्या दोन्ही मुलांचा खूप मोठा 

वाटा आहे..!!

हे वाचा - बाबासाहेबांचा फोटू - एक बोथकथा

सम्राट अशोकाने आपली संपूर्ण संपत्ती ही धम्मासाठी,धम्मवाढवण्यासाठी दान केली,आपण बाबासाहेबांनी 

सांगितलेल्या प्रमाणे आपल्या कष्टातील विसावा हिस्सा तरी धम्म कार्यासाठी द्यावा,१९५६ नंतर काही काळासाठी 

हे धम्मचक्र काहीसं स्थिर झालं होतं...आहे जितक्या वेगानं ते पुढं जायला पाहिजे ते जाताना दिसतं नाही,याचं 

एकमेव कारण म्हणजे आपल्याकडं त्यागाची भावना नाही..!!

त्यागाशिवाय धम्म वाढू शकत नाही,त्याग हा शिकवणीतून व धम्माच्या उपदेशातून येत असतो,आपल्या मुलांना 

उचशिक्षित करा,त्यांनां डॉक्टर, इंजिनियर,वकील,जज काय पाहिजे ते करा परंतू त्याला आधी काही

दिवस,वर्षे,महिने धम्मासाठी दान करा,धम्माच्या सानिध्यात राहुद्या,धम्माचा उपदेश कळू 

द्या,त्यागाचा,निस्वार्थाचा,निष्ठतेचा,मानवतेचा धम्म त्याला कळू द्या,धम्माची गोडी लागू द्या,तेव्हाच त्यागाची भावना 

त्याच्या मनात निर्माण होईल...!!

सम्राट अशोका राजाच कर्तृत्व हे खूप मोठं आहे,जगात धम्म पोहचवण्यात त्याच सर्वांत मोठं स्थान आहे,अशा 

महान प्रियदर्शनी सम्राट अशोका यांच्या कार्यास शतशः विनम्र अभिवादन...


- मा.रविंद्र गायकवाड | रिपब्लिकन सेना | पुणे

No comments:

Post a Comment