डॉ संभाजी भिडे यांचा देश विदेशात डंका डॉ संभाजी भिडे यांचा देश विदेशात डंका - बहुजन जागृती

बहुजन जागृती

डॉ बाबासाहेब आंबेडकर : बहुजन समाजाची राजनीतिक आणि सामाजिक चळवळ

Wednesday, April 1, 2020

डॉ संभाजी भिडे यांचा देश विदेशात डंका

<img src="sambhaji-bhide-gives-tips-on-corona-virus.jpg" alt="treat corona virus with cow urine says sambhaji bhide"/>



कोरोनाच्या उपचारासाठी चिनचे राष्ट्राध्यक्ष Xi Jinping यांचे डॉ मनोहर भिड़े यांना निमंत्रण...

मनोहर भिड़े ( मनोहर कुलकर्णी अर्थात संभाजी भिडे ) सोबत 500 संशोधकांची टिम चिन ला रवाना ...? 

चीन ने दिली 1000 टन गोमुत्राची ऑर्डर 500 कोटी एडवांस आणी उर्वरीत 1500 कोटी उपचार झाल्यावर 

डॉ.मनोहर भिडेच्या संशोधनाने भारताची अर्थ व्यवस्था सावरणार...फ्रांन्स ,इटली ,अमेरिका ,जर्मनी , दक्षिण 

कोरिया इतर देशामध्ये मनोहर भिडेशी कोरोना वर उपचार करारा साठी रस्सीखेच....पहिला डॉ.भिडेंचा करार 

अमेरिके सोबतच व्हावा म्हणून ट्रंप चे मोदींना साकडे..डॉ.भिड़े ला अमेरिकेला पाठवण्याचे मोदीनी दीले ट्रंप ला 

वचन....अडचणीच्या काळात देशात लॉक डाऊन मुळे उपाशी मरत असताना ,अर्थव्यवस्था संपूर्ण नष्ट होत 

असताना डॉ.भिडेच्या संशोधनाने देशाला तील जनतेत आशा.....

भारतातील जनता आता संशोधक डॉ.भिडेच्या सन्मानार्थ एकदा थाळी वाजवण्याच्या कार्यक्रमाची मांगणी करीत 

आहे....

चिन ने काही अटी या करारात ठेवल्या आहेत...

१) उपचार पद्धतीचा प्रथम प्रयोग भक्तावर करण्यात येईल .प्रयोग यवस्वी झाल्यावरच चिनच्या नागरीकांवर ही 

उपचार पद्धती वापरली जाईल...

२) जर डॉ.भिड़े नी संशोधन केलेल्या उपचार पद्धतीने चिनच्या नागरीकांचा उपचार न होता बळी गेला तर 

दगाबाजी केलीय म्हणून सर्व संशोधकांना चिनच्या भिंतीवरून खाली फेकण्यात येईल...इतिहासातील हा एक 

धाडसाचा करार मानण्यात येत आहे....

एका क्षणात कोरोनाच्या संकटाने भयभीत झालेल्या जगातील सर्व देशांना आज भीडेंच्या संशोधनाने...आशेचा 

किरण दीसला....

हैट्स ऑफ डॉ.भिडे गुरुजी.....

मोदीजींना विनंती आहे ...

वेंटीलेटर,मास्क,इतर सर्व अत्यावश्यक सामग्री आपण १८ मार्च निर्यात केली..आता उरलेली रुग्णालयातील 

वेंटीलेटर ही विकून टाका कारण आजच या जुण्या उपकरणाचे पैशै खुप येतील...कारण विदेशातील अडाणी 

लोकांना यांची आज गरज भासतय कारण त्यांना अजून पर्यंत गौमुत्र थेरीपीचा शोध लावला नाही त्या आधीच 

आपण आपल्या देशातील सर्व वैद्यकीय उपचार यंत्र विकून टाका ,(तसे पण रेल्वे स्टेशन,विमान सेवा,सरकारी 

कंपनी,बैंका, सार्वजनिक ठिकाण आपण अंबानी अंबानी ला विकलेच ना) आणि डॉ भिडे यांच्या मार्गदर्शनात 

खाली URINEONLINE VACCINE निर्मीतीची कंपनी उघडा व सर्व जगाती स्वता फिरून हे गोमुत्र विकून 

या...आता मोदीजी खरी परिक्षा तुमच्या मार्केटींग कौशल्याची आहे...भारतीयांना जसे जूमले निकले..

तसे..ट्रंप तात्या ला 50 ml गौमुत्र पाजवून 2000 doller घेऊन या म्हणजे...तुम्ही जी अर्थ व्यवस्था मातीत 

घातली...ती सुद्धा सुधारेल....

Go. करोना..... करोना Go

डॉ भिडे is coming ...SO & SO

नोट:- हा लेख उपहासात्मक नाही तर बोधात्मक आहे , कृपया गैर समझ करून घेऊ नये... आणि जे पत्रकार अशा बातम्यांना कवरेज देतात..त्यांना व त्या चैनलच्या संपादकांना 200 ml गोमुत्र लाइव करून पाजवावे ... जेणे करून त्यांना ही कोरोना ची बाधा होणार नाही आणि लोकांचा या उपचार पद्धतीवर विश्वास बसेल...

विशेष नोट:-

भिड़े गुरूजी आज बाहेर यासाठी आले आहेत,कारण लॉक डाऊन मुळे लाखो हिंदू आज उपाशी मरत आहेत 

आणि हजारो मुस्लिम/बहुजन संघटना आज अशा पीडितांची मदत करताना ,त्यांना जेवण पुरवताना दिसत आहे 

त्यामुळे हिंदूच्या मनात सरकार बद्दल राग व मुस्लिम/बहुजन समाजाबद्दल प्रेम आत्मीयता निर्माण होत आहे ...

(पंत महासभा कुठे ही सामुहीक मदत करताना अजुन पर्यंत दीसली नाही हे विशेष)

अशा स्थितीत चाफेकर बंधू प्रमाणे सद्यस्थितीतील समस्येवरून लक्ष विचलीत करून हिंदू मुस्लिम वातावरण 

निर्मिती साठी ते पंत साहेबांच्या आदेशावरूणच आले असावेत... सांगली पुरात बुडाली असताना

घरात बसणारे भिड़े गुरूजी आज लॉक डाऊन असताना बाहेर का बरे आले असावेत?

सांगली तील कोरोना बाधीत लोकावर गुन्हा दाखल करा म्हणणारे भिड़े गुरूजी कनीका कपूर बद्दल शांत का?

जे भक्त त्यांचे समर्थन करीत आहेत त्यांनी सांगावे कनीका कपूर तुमची अत्या लागते का? न्याय करताना समान 

व्हावा ...चाफेकर बंधुच्या औलादींनो आता वेळ घेली आमच्या आईने सावित्री फूलेंनी रक्ताच्या शाईने आम्हाला 

लिहायला शिकविले आहे....

जिजाऊ सावित्री फातेमा

अहिल्या माता रमाईच्या

लेकरांचा नाद करूं नका.....

आमच्या खानदानीत

नाचणारे नाही तर

वाचणारे जन्म घेतात..

आम्ही दंगलीत मारणारे नाहीत तर

लॉक डाऊन मध्ये उपाशी मरणाऱ्यांना जेवण देऊन वाचवणारे

सावित्री माता फुले ची लेकरं आहोत...

बहुजन समाजाने आपले लक्ष

आपल्या समाजाला कोरोना आणी भूखमरी पासुन वाचवण्यावरच केंद्रीय करावे..

आपला समाज अडचणीत आहे

कारण तो कष्ट करून खातों..

इतराकडे वर्षानु वर्षे न संपणारी

शिधा जमा झाली आहे...

धन्यवाद

जय जिजाऊ जय शिवराय | जय ज्योतिबा जय सावित्री | जय भिमराय जय रमाई

- शेख सुभान अली । टिपू सुलतान ब्रिगेड.

No comments:

Post a Comment