
भारतातील पहिले आणि कदाचित शेवटचे शिक्षक ज्यांनी ज्ञानाची गंगा अज्ञानांपर्यंत पोहचवताना निशुल्क काम केले, मनुवादी भारतात मुलींच्या शिक्षणासाठी ज्यांनी स्वतः, स्वतःच्या पत्नीला शिक्षित करून स्वखर्चाने मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली, भारतातील पहिले शिक्षक ज्यांनी शिकविताना जातीभेद केला नाही, भारतातील पहिले महामानव ज्यांनी शेतकऱ्यांच्या आणि विद्यार्थ्यांच्या कैफती खुद्द इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया यांच्या दरबारा पुढे मांडल्या......
असे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले हेच खरे शिक्षक दिनाचे मानकरी.....!
राष्ट्रीय शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🌹
देशभरात ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.हा उत्सव लोकाभिमुखाने साजरा होत नसला तरी डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती निमित्त हा अधिकृत पणे शासकीय पातळीवर शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. खरे तर महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले हेच खरे समाजसुधारणेचे शिक्षक होते.
‘प्राथमिक शिक्षणाचा पाया महात्मा फुले यांनी रचला. मुलींच्यासाठी मोफत शाळा सुरु केल्या. डॉ. राधाकृष्णन यांच्या जन्मापूर्वी चाळीस वर्षापूर्वी शिक्षणाची ज्ञानगंगा बहुजन समाजापर्यंत पोहोचविली. डॉ. राधाकृष्णन यांची स्त्री शिक्षणाच्या विरोधात भूमिका होती. महात्मा फुले यांनी निर्माण केलेले साहित्य कोणत्याही पुरस्कारासाठी नव्हते. जनमानसाला उभे करण्यासाठी साहित्याची निर्मिती केली. आधुनिक काळातील आद्य नाटककार म्हणून फुलेच आहेत. त्याउलट डॉ. राधाकृष्णन यांचे साहित्य बहुजन समाजाला गुलामगिरीत लोटणारे होते. काही वर्गाचे समर्थन त्यांनी आपल्या साहित्यातून केले. डॉ. राधाकृष्णन यांनी जदुनाथ सिन्हा या विद्यार्थ्यांच्या प्रबंधातून साहित्य चोरून इंडियन फिलॉसॉफी हा ग्रंथ लिहला, त्याबाबत विद्यार्थ्यांने आक्षेप घेतला असता न्यायालयात दावा दाखल करण्यात आला व आपसात समजोता होऊन वाद मिटवला होता, म्हणून त्यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केल्यास राजर्षी शाहू, फुले आणि आंबडेकर यांच्या विचारांना तिलांजली देण्यासारखे आहे.
एकोणिसाव्या शतकात सामन्यांना शिक्षणाचा अधिकार नव्हता, बहुजन व स्त्रीया शिक्षणापासून वंचित होते, हजारो वर्षांपासून शिक्षणापासून वंचित असलेल्या बहुजन समाजापर्यंत शिक्षणाची गंगा वाहून आणणाऱ्या महात्मा फुले यांनी उच्चवर्णीयांची मक्तेदारी संपुष्टात आणल्यांने त्यांच्याकडुन बहुजन समाजाला चुकीची माहिती दिली जाते.महात्मा फुले यांच्या जन्म ११ ऑगस्ट १८२७ साली झाला,म्हणजेच डॉ.राधाकृष्णन यांचा जन्म २० सप्टेंबर १८८७ रोजी झाला,तसे ५ सप्टेंबर १८८८ हा दिवस चुकीचा आहे... असे डॉ. राधाकृष्णन यांचे चिरंजीव सर्वपल्ली गोपाल हेच नमूद करतात (संदर्भ - as Radhakrishnana a Biography -Page 10) म्हणजे जोतीराव फुले यांच्यापेक्षा डॉ. राधाकृष्णन हे ६० वर्षांनी लहान होते.त्यांच्या जन्मापुर्वी महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षणाची ज्ञानगंगा बहुजन समाजापर्यंत पोहोंचवली.
प्रस्थापित व्यवस्था ही स्त्री ला अबला समजणाऱ्या मानसिकतेचि व्यवस्था होती. स्त्री केवळ चुल आणि मूल हेच तीच साम्राज्य या पलीकडे तिला कुठेच गिणल्या गेलं नाही.नेहमी स्त्रीयांना भोग वस्तू या मानसिकतेतून पाहत आलेली ही व्यवस्था,सती जाते,केशवपण सारख्या भ्रष्ट विचारसणीत जगणारा समाज,उच्च निच्छतेची कीड पसरलेला समाज उच्चवर्णीयांना शिक्षणाचा अधिकार आहे मात्र शूद्र समजल्या जाणाऱ्या सामान्यांना शिक्षणाचा अधिकार नाकारले गेले.मात्र यार्सव बाबींचा सूक्ष्मतेने अभ्यास करून महात्मा फुलेंनी या व्यवस्थेच्या विरोधात जाऊन सण१८४८ साली भारतातील पहिली मुलींची शाळा पुण्यातील भिडेवाड्यात स्थापना करून स्त्रियांना समानतेचा दर्जा दिला.स्त्रियांचा खरा धर्म त्यांना शिक्षण देणे होय. स्त्रियांच्या मानसिकतेसाठी व सक्षम स्त्री घडवण्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही. हे ओळखून *म. फुलेंनी आपल्या पत्नी सावित्रीबाईंना शिक्षण देऊन आद्य शिक्षिका म्हणून कार्यास सुरुवात केली* आणि स्त्री-शिक्षण मोहमेस सुरुवात केली. आणि एका वर्षात २० शाळा सुरू केल्या.
त्याच बरोबर शिक्षणांचा पाया म्हणजे प्राथमिक शिक्षण होय,आणि ते सक्तीचे करणे काळाची गरज होती, *भारतीयांना शिक्षण देण्यासाठी इंग्रज सरकारने १८८२ साली सर विल्यम हंटर यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय शिक्षक आयोग निर्माण केला यालाच हंटर आयोग असे म्हणतात.सर हंटर महाराष्ट्रात आले तेंव्हा पुणे येथील एम्.एम्.कुंटे यांनी बहुजनांना शिक्षणाची गरज नाही असे हंटर यांना सांगितले.* तेंव्हा १९ ओक्टोबर १८८२ रोजी *राष्ट्रपिता जोतीराव फुले यांनी हंटर यांची भेट घेतली व एक निवेदन दिले त्यामध्ये जोतीराव फुले म्हणतात की बहुजनांच्या मुलांना वयाच्या १२ व्या वर्षापर्यंत प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत द्यावे. सरकारला मिळणांरा महसूल बहुजनांचा आहे या महसुलावर उंचवर्णीय शिक्षण घेतात पण बहुजनांना शिक्षण घेण्यास विरोध करतात हे कटुसत्य जोतीराव फुले यांनी हंटर आयोगाच्या निदर्शनास आणून दिले. आणि ते प्राथमिक शिक्षण सक्तीचा हट्ट नेहमीच लावून धरले.* आपला बहुजन समाज बहुतांश ग्रामीण भागात वास्तवि असते,ते आजही शिक्षणापासून वंचित आहेत,मात्र प्रस्थापित व्यवस्थेत ज्योतिबा फुलेंना यांच्या शिक्षणाची फार काळजी वाटत,त्यामुळे त्यांनी १८८८ साली ग्रामीण भागाच्या शिक्षणाकडे शासनाने विशेष लक्ष पुरवावे असे वेळोवेळी प्रयत्न केलेले दिसते.आपल्या देश्यात बहुजन समाज अडाणी आहे,त्यांना शिक्षणाशिवाय त्यांचा उन्नती होत नाही, ज्या राष्ट्रात सामजिक आणि आर्थिक गुलामी असते तिथे राष्ट्रवाद निर्माण होऊ शकत नाही,त्यासाठी शिक्षण हे एकमेव उपाय आहे असे ठणकावत कृतीशील कार्य करत बहिजनांसाठी सर्वसाठी शिक्षणाचे दारे खुले करण्याचे आयुष्यात हेच फुले दाम्पत्य अन्याय अत्याच्याराच्या निखार्यावर प्रवास केला. मात्र खचले नाही.
शिक्षण हा मानवांचा तिसरा डोळा मानला गेला,महात्मा फुलेंनी या तिसऱ्या डोळ्याला अधिक भक्कम केलं,सर्व बहुजन समाजाचा तिसरा डोळा उघडला. १९६४-६६ दरम्यान कोठारी आयोगाने त्रिभाषा सूत्रांचा अवलंब जरी केला असला तरी महात्मा फुलेंनी ७७ वार्षपूर्वी त्रिभाषा सूत्रांचा अवलंब शिक्षणात करावा यावर अधिक भर दिले. शिष्यवृत्ती व वसतीगृहाच्या सुविधा असो व यासाठी लागणारे सर्व सामग्री स्वतः महात्मा फुलेंनी आपलं सर्वस्व पणाला लावून आयोजन केले,महात्मा फुले स्वतः स्थापत्य अभियंता होते,खडकवासला धरण, कात्रज घाट, पुण्यातील, अनेक पुल, छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनल(मुंबई)इ. सारखे अनेक वास्तूंची उभारणी त्यांनी केली त्यातून मिळणाऱ्या आर्थीकेतून त्यांनी समाजाच्या उन्नतीसाठी खर्ची केले. समाजाकडून कुठलेच वेतन नघेता हा शैक्षणिक कार्य केले,शिक्षणाची गंगा आम्हा सामान्यांपर्यंत वाहून आणली, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या माऊलीने तर प्रस्थापित व्यवस्थेशी लढा दिला, स्वतः वर शेण दगड खाऊन देखील स्त्री शिक्षणाचा हट्ट सोडला नाही. पतीच्या खांद्याला खांदा देऊन शेवटच्या स्वासापर्यंत लढा कायम ठेवले.
आज सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती निमित्त आपण शिक्षक दिन भल्या उत्साहात (केवळ शासकीय पातळीवर) साजरी करतोत,मात्र यांच्या जन्माअगोदर ज्यांनी या बहुजांना शिक्षित केले त्यांना मात्र या समाज मनातून दूर लोटले गेले. २०१६साली महाराष्ट्र शासनाने महात्मा फुले यांना भारतरत्न देण्यात यावा यासाठी प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवण्यात आले होते. मात्र अद्याप या मुद्यावर अजूनही काही हालचाल दिसत नाही. महात्मा फुलेंना नाकारणारा वर्गाचा आज या देश्यात झपाट्याने संख्या वाढत चालली आहे. मात्र ज्या शिक्षणाच्या जोरावर आपण आज आवाज उठवत आहोत,ते आवाज याच महापुरुषांनी दिली हे विसरून चालणार नाही. आज शासकीय पातळीवरील हा शिक्षक दिन असेल मात्र खरा शिक्षक दिन हा महात्मा फुले यांच्या स्मृती दिनीच असेल.
- विश्वजित सामाजिक संघटना
शिव-फुले-शाहु-आंबेडकर-संघ युवा विचार मंच सामाजिक बहुउद्देशीय संस्था
No comments:
Post a Comment