ओबीसी समाज बांधवांना, गेली सत्तर वर्षे कुणी जातीच्या नावावर मते मागितली तर कुणी धर्माच्या नावावर मते
मागितली आणि ओबीसी बांधवांचा केवळ मतदार म्हणून वापर केला...!!
सत्ताधारी होण्याची वेळ आली तेव्हा या प्रस्थापित राजकीय पक्षांनी ओबीसीचे राजकीय आरक्षण रद्द होऊ दिले
सत्ताधारी होण्याची वेळ आली तेव्हा या प्रस्थापित राजकीय पक्षांनी ओबीसीचे राजकीय आरक्षण रद्द होऊ दिले
मात्र कार्यवाही केली नाही...!!
डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले ओबीसी बांधवांचे संवैधानिक हक्क आणि अधिकार त्याच प्रस्थापित सत्ताधा-
यांनी काढून घ्यायला सुरुवात केली आहे...!!
ओबीसी बांधवांचे आरक्षण कॉग्रेस पक्षाने चाळीस वर्षे दिले नाही, मंडल आयोग व्ही पी सिंगानी लागू केला तेव्हा
ओबीसी बांधवांचे आरक्षण कॉग्रेस पक्षाने चाळीस वर्षे दिले नाही, मंडल आयोग व्ही पी सिंगानी लागू केला तेव्हा
भाजप, बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेने टोकाचा विरोध केला आणि व्ही. पी. सिंह सरकार पाडले...!!
ओबीसी बांधवांनो कॉग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना हे पक्ष सत्तेत असूनही ओबीसी समाजाच्या राजकीय
ओबीसी बांधवांनो कॉग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना हे पक्ष सत्तेत असूनही ओबीसी समाजाच्या राजकीय
आरक्षणासाठी काहीच करु शकले नाही, केंद्रातील भाजपा सरकारकडे ओबीसींचा इम्पीरियल डाटा आहे त्यांनी
तो दिला नाही आणि शेवटी ओबीसी बांधवांचे राजकीय आरक्षण संपविले या घटनेतून या चारही प्रस्थापित राजकीय
पक्षांची "नियतं" समजून घ्या...!!
एक जण दुस-याला दोष देतो तर दुसरा पहिल्याला दोष देतो हे नाटक आहे, त्यांच्या नाटकात ओबीसी चे राजकीय
आरक्षण संपले त्याचे काय...???
तुमची मतं मिळविण्यासाठी तुम्हाला जातीचा दाखला देतील, तुम्हाला तुमच्या धर्माची आठवण करून देतील परंतु
तुमची मतं मिळविण्यासाठी तुम्हाला जातीचा दाखला देतील, तुम्हाला तुमच्या धर्माची आठवण करून देतील परंतु
जेव्हा प्रत्यक्ष तुमच्या सत्तेतील सहभागाची वेळ येते तेव्हा तुमच्या साठी कुणीच पुढे येतं नाही ही प्रस्थापित राजकीय
पक्षांची "नियतं" समजून घ्या...!!
ओबीसी बांधवांनो वेळीच सावध व्हा, नाहीतर तुमचे सर्वच संवैधानिक हक्क आणि अधिकार काढून घेतले जाणार
ओबीसी बांधवांनो वेळीच सावध व्हा, नाहीतर तुमचे सर्वच संवैधानिक हक्क आणि अधिकार काढून घेतले जाणार
आहेत...!!
धुळे, नंदुरबार, नागपूर, अकोला आणि वाशिम जिल्ह्यातील जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने ओबीसी
धुळे, नंदुरबार, नागपूर, अकोला आणि वाशिम जिल्ह्यातील जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने ओबीसी
विरोधात कोर्टात जाऊन ओबीसी बांधवांचे राजकीय आरक्षण संपविले हाच धागा पकडून शैक्षणिक, नोकरी
विषयक, पदोन्नती आणि इतरही आरक्षण संपविले जाणार आहे.ही सुरुवात झाली आहे...!!
डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीच्या माध्यमातून तुमच्या हातात मोठे शस्त्र दिले आहे, तुमच्या मताचा
डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीच्या माध्यमातून तुमच्या हातात मोठे शस्त्र दिले आहे, तुमच्या मताचा
अधिकार, त्याच मताचा हिसका सत्ताधारी कॉग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस,शिवसेना आणि भाजपा या चारही पक्षांना
दाखवा आणि ओबीसी आरक्षण परत मिळविण्यासाठी दबाव तयार करा...!!
धुळे, नंदुरबार, नागपूर, अकोला आणि वाशिम जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत या चारही प्रस्थापित
धुळे, नंदुरबार, नागपूर, अकोला आणि वाशिम जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत या चारही प्रस्थापित
राजकीय पक्षांना धुळ चारण्याची तयारी करा, तरच तुमची दखल घेतली जाईल नाहीतर तुमचे एक एक करुन
सगळेच हक्क आणि अधिकार काढून घेतले जातील हेही समजून घ्या...!!
नाक दाबल्या शिवाय तोंड ऊघडतं नाही हा नैसर्गिक नियम आहे, माजोर झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून तुमची
नाक दाबल्या शिवाय तोंड ऊघडतं नाही हा नैसर्गिक नियम आहे, माजोर झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून तुमची
अवहेलना थांबवायची असेल तर तुमच्या हातातील "मताच्या" शस्त्राचा योग्य वापर करा...!!
वेळ आली आहे मस्तवाल, आणि नाटकबाज सत्ताधाऱ्यांना धडा शिकवण्याची, ओबीसी बांधवांनो तुमची संख्या
वेळ आली आहे मस्तवाल, आणि नाटकबाज सत्ताधाऱ्यांना धडा शिकवण्याची, ओबीसी बांधवांनो तुमची संख्या
लक्षणीय आहे, तुम्ही पाचही जिल्हा परिषदेमधील निकाल बदलवू शकता... !!
ओबीसी आरक्षण वाचविण्यासाठी येत्या ५ अॉक्टोबर ला कॉग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजपला धडा
ओबीसी आरक्षण वाचविण्यासाठी येत्या ५ अॉक्टोबर ला कॉग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजपला धडा
शिकवा,त्यांना घरी बसवा ,जातीचा विचार करु नका, ओबीसी उमेदवार कुठल्याही सत्ताधारी पक्षावर ऊभा असला
तरीही बळी पडू नका,तुम्हाला जातीच्या नावावर पुन्हा ठगवतील, जातीपेक्षा ओबीसी ही ओळख महत्त्वाची समजून
मतांचा वापर करा. तुमच्या मतांची किंमत त्यांना समजू द्या आणि दबाव वाढवा....!!
जयभीम.
- भास्कर भोजने. - सोशल आक्टिविस्ट
जयभीम.
- भास्कर भोजने. - सोशल आक्टिविस्ट
No comments:
Post a Comment