अखेरीस तो दिवस उजाडला ज्याची पांडबा व्याकुळतेने वाट पाहत होता
कारण आज पांडबा आपल्या 14 वर्षाच्या जन्मठेपेतुन मुक्त होणार होता.
सवर्णांच्या अत्याचाराला वैतागुन पांडबाच्या हातून नकळत एका जुलूमी
पाटलाचा खून झाला होता, ज्याचा पश्चाताप पांडबा गेली 14 वर्षे जेलमधे
करत होता.पांडबा येरवडा जेलच्या गेटमधुन बाहेर आला तर पाहतो काय
त्याचा तरुण मुलगा हातात हार घेऊन भली मोठी BMW कार घेऊन आपल्या
बापाचे स्वागत करायला उभा होता.. मग मुलगा म्हणाला की "या बाबा बसा गाडीत" हे सर्व पाहुन पांडबाचा
आनंद गगनात मावेना, पण अचानक पांडबाचं लक्ष गेल ते त्या BMW गाडीच्या काचेवर तिथे लिहिले होते"ॐ
साई राम" ... पांडबाच्या तळपायाची आग मस्तकात गेली तो म्हणाला की या गाडीवर बाबासाहेबांचे नाव नाही
पण हे "ॐ साई राम" कुठून आलं? मुलाने कशी बशी समजूत काढली मग पुढे बापलेकांचा प्रवासमुम्बईच्या
दिशेने सुरु झाला...मुंबईजवळ आल्यावर पांडबाला त्याचे बालपण जिथे गेले ते "भीम नगर" दिसले
पांडबा : (मुलाला) अशोक गाडी थांबव
अशोक : बाबा आता आपण इथे राहत नाही आता आपण हीरानंदानी मधे राहतो हां झोपड़पट्टी एरिया आहे
काय करायचे तिथे जाऊन... सर्व ब्लडी डर्टी जयभिमवाले लोक राहतात तिथेपांडबा आश्चर्याने अशोककड़े पाहू
लागला ...
गाडी शेवटी हीरानंदानी काम्प्लेक्स मधे शिरली, मग 17व्या माळ्यावर लिफ्टने गेल्यावर दारावर "अशोक
पांडबा कांबळे" च्या ऐवजी "Ashok P.K." एवढेच होते.आत शिरल्यावर पांडबा घरात बुद्ध बाबासाहेब यांचे
फ़ोटो शोधत होता पण त्याला काही काही सापड़ेना आणीसमोरच त्याला भला मोठा गजानन महाराजाचा गांजा
ओढ़तानाचा फ़ोटो सोन्याच्या फ्रेम मधे सजवलेलादिसून आला..आता तर पांडबाला राग अनावर झाला
पांडबा : आरं लेका! हे समदं काय पाहतोय मी, तुझ्या दारावर गाडीवर कुठच बाबासाहेब नाही आन इथ
घरातपण ह्या लंगोटीवाल्या चिल्लमओढयाचा फोटु तू लावलायस तुला मह्या सूटबूट वाल्या बाबासाहिबाचा
फोटु लावाय कसली लाज वाटत व्हती रं?
अशोक : बाबा just try to understand my feelings इथे सर्व पॉश लोक राहतात इथे हे जयभिम वगैरे चालत
नाही...पांडबा : आरं मग ह्यो लंगोटवाला चिल्लमओढया चालतोय व्हय?
आरं नालायक अवलाद ... ज्या मह्या भीमामूळं तुला हे समदं वैभव मिळालं त्या आपल्या बापाला तू इसरलास
यापेक्षा काय वाइट बघायचं व्हतं जीवनात? आरं कुत्र्या मांजरापेक्षाही वाईट गत होती आपली त्या
बाबासाहेबानं आपल्याला हे मिळवून दिलं त्या बाबासाहेबा सोबत मी स्वतः महाड़च्या आंदोलनात व्हतो,
नागपुरच्या दीक्षाभूमित व्हतो आम्ही कधी कुठल्या देवाला भिक नाय घातली कष्टाचा घाम गाळून तुला तुह्या
मायनं मोठा केला आन तू त्या बाबासहेबाला इसरलास?
अशोक : अहो बाबा आपण असे किती दिवस जयभिम जयभिम घेऊन बसायचे? मला जे काही मिळाले ते
तुमच्यामुळे मिळाले आईमुळे मिळाले जर तुम्ही कष्ट नसते केले तर मी आज डॉक्टर झालो नसतो त्यात मी
मग बाबासाहेबांना का मानु?
पांडबा : आरं कष्ट तर मह्या आईबापानं पण मह्यासाठी लइ केलत पण म्या का नाही तुह्यासारखा डॉक्टर
बनलो?कारण तूमच्या टाइमाला बाबासाहेबानं तुमच्या साठी समदं करून ठिवलं व्हतं ... आरं त्या माउलीन
तुह्या मायेनं तुला शिकता यावं म्हणून लोकांच्या घरात धूनी भांडीची कामं केली पण कधी तिनं भीम आणी
बुद्ध सोडून कुणा देवापुढं हात जोड़लं नाही...
अशोक : बस बाबा enough is enough मला तीच तीच तुमची जुनि कैसेट ऐकवू नका ... लक्षात ठेवा माझ्या
पत्नीला आणी मुलांना देखील हे जयभिम जयभिम आवडत नाही (तितक्यात अशोकचा मुलगा जिम्मी
शाळेतून येतो)
जिम्मी : हाय ग्रँडपा! How are You? तुम्ही का भांडत आहात?
पांडबा : आरं तुह्या बापानं बाबासाहेबाचा फोटु घरात लावला न्हाई,
जिम्मी : Who is this बाबासाहेब? Ohhh I am extremely sorry, I am not sure but I think त्यांनी काही संविधान
वगैरे लिहिले असे ऐकले आहे पण त्यामुळे त्यांचा फ़ोटो इथे का लावायचा?
पांडबाच्या शरीराचे तर आता रक्तच आटले होते त्याच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहु लागल्या होत्या त्याचाच
मुलगा बाबासाहेबाना विसरला होता या विचाराने तो कोलमडून गेला होता.. आपलं गाठोडं घेऊन पांडबा एक
एक जड़ पाऊल दाराकडे टाकू लागला...
अशोक : (चिडून) कुठे चाललात? वृद्धश्रमात? मला माहीत होतं की तुम्ही या घरात बाबासाहेबांच्या फ़ोटोवरुन
तमाशा करुन इथून रागाने निघुन जाल!
पांडबा : वृद्धाश्रम हे तुह्यासाठी उपयोगी आहेत मह्यासाठी नाही, म्या चळवळीतला भीमसैनिक हाय, म्या मह्य
आयुष्य मह्या भिमाच्या चळवळीत समर्पित करेन पण जिथं तू बाबासाहेबाला इसरलास तिथं तुझा लेक पण
तुला इसरल्याबगीर राहणार नाही...
पडेल...वाटलं होतं की पांडबा घर सोडून गेल्यावर अशोकच्या स्वभावात फरक पडेल पण काही नाही.
महिनेच्या महीने असेच लोटले जात होते अशोकने जवळपास आपल्या सर्व गरीब नातेवाइकांशी संपर्क
तोड़ला होता, गावी जाणे येणे बंद केले होते... त्याचे हॉलिडेज नेहमी शिर्डी, अक्कलकोट, गणपतीपुळे, शेगाव,
तिरुपती, वैष्णोदेवी, अजमेर, इत्यादी धार्मिक ठिकाणी साजरे होत असत सोबतच घरात गणपती बसवणे,
सत्यनारायण घालणे, वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, मंगळागौरी, नवरात्रेचा नऊ दिवस उपवास (जमल्यास 9
दिवस चप्पल न घालणे) इत्यादी गोष्टी करताना अशोक आणी त्याची पत्नी अनन्या याना फार आनंद होत असे
शिवाय या सर्व गोष्टींचा प्रसाद ते खुप ऐटित आपल्या सोसायटित ऑफिसमधे वाटत फिरत असत आणी
बुद्धिस्ट लोकांना पाहुन नाक मुरडत जणू आम्ही यांच्यातले नाहितच...
त्यादिवशी तारीख 6 डिसेंबर होती अशोक अगदी ओरडत, नाचत घरी आला, जसा आला तसा तो गजानन
महाराजांच्या फ़ोटोसमोर लोटांगण घालू लागला, मग त्याने म्यूजिक सिस्टमवर "गायत्री मन्त्र रीमिक्स"
लावले मग अनन्याला आपल्या मिठीत उचलून घेतले आणी "Oh my God" म्हणून किंचाळु लागला...
अनन्याने विचारले की "काय झाले जान" एवढा खुश कसा??" मग अशोकने स्पष्टीकरण दिले "तू माझ्या
जीवनात लक्ष्मीच्या पावलांनी आलीस त्या फडतुस हॉस्पिटलला मी राजीनामा देणार मला नविन नोकरी
मिळाली" "अय्या कुठे? आहिरे इंडस्ट्रीजच्या SEA-HILLS हॉस्पिटलमधे?" त्यावर अशोक म्हणाला
"SEA-HILLS" एवढी माझी लायकी आत्ता कुठे हो पण आज ना उद्या तिथे देखील आपला जैक लागेल, पण
सद्धया आपली सेटिंग लागली आहे सिंघानिया हॉस्पिटलला, तुला माहित आहे कितीचा पैकेज आहे 95 lacks
चा, anyways पिल्लू lets celebrate" अनन्या पण उत्साहित होऊन म्हणाली की sure why not, पण आधी
सिद्धिविनायकला जाऊन दर्शन घेऊ" त्यावर अशोक म्हणाला की "Ohh sorry जान पण आज 6 डिसेंबर आहे
म्हणून दादर स्टेशन ते शिवाजी पार्क व सिद्धिविनायक मंदिर एरिया त्या दलित लोकांनी पैक केला असेल,
आपण वाया वर्ली महालक्ष्मीला जाउ देवीचे दर्शन घेऊ, त्यानंतर मधेच अशोकचा मुलगा जिम्मी येऊन
म्हणाला "then dinner and disco theque - yo yo yaa yaa - hip hip hurrey"
इकडे चैत्यभूमिला खेड्यापाड्यातून उपाशी पोटी फक्त बाबासाहेबासाठी आलेले डोळ्यात लाखलाख अश्रु
असलेले गोरबरीब बांधव तर तिकडे पेडररोडला देवीचे दर्शन घेऊन दारुच्या नषेत झिंगणारे अशोकचे कुटुंब
काय ही विसंगती..जवळपास दहा ते अकरा महिन्यांचा काळ गेला सारे काही असेच चालले होते अशोकला
आपला बाप पांडबा अधुन मधून एखाद्या उपोषणात तर एखाद्या आंदोलनात तर गरीबांची सेवा करताना दिसे
पण अशोक त्याला पाहुन गाडीची काच बंद करुन घेई...
एक दिवस असा उजाडला जेव्हा अशोक वेड्यासारखा धावत घरी येऊन अनन्याला मीठी मारून रडु लागला
तिने विचारल्यावर सांगू लागला "आमच्या हॉस्पिटलमधे मानवी अवयवची तस्करी सृरु आहे पण माझा
त्यांच्याशी काही संबंध नाही पण त्यांनी बऱ्याच कागदावर माझ्या नेहमी सह्या घेतल्या आणी मीही न वाचता
काही सह्या केल्या पण आता मला कळले की त्यांनी इन्क्वायरी कमीशनसमोर मलाच दोषी दाखवले म्हणे ती
सर्व सवर्णांची मेजोरिटी माझ्या सारख्या शूद्राला त्यात स्थान नाही... (मोठ्याने रडत) आता माझी नोकरी
गेली सोबत मला blacklist केले ... आता मला कुठेच् नोकरी नाही मिळणार ...हे घर, गाडी, श्रीमंती हे सर्व वैभव
आपल्या हातून जाणार! (हम्बरडा फोडत) मी सम्पलो सोना! मी सम्पलो... (किंचाळत) गजानना तू हे काय
केलस?? मग त्यांचे काही दिवस असेच दुःखात गेले एके दिवशी त्यांच्या सोसायटित सत्य नारायणाची महापूजा
आणीमहायज्ञ होता, अशोक आधीच संकटात असल्याने त्याने बायकोसोबत सत्य नारायणाच्या महापूजेला
बसण्याची इच्छा व्यक्त केली पण सोसाइटी मेम्बर्सने आम्ही शुद्र परिवाराला हां मान देऊ शकत नाही हे स्पष्ट
शब्दात सांगीतले तसेच यापुर्विही त्या सोसाइटीतील काही बायकांनी अनन्याला हळदीकुंकवाला का नाही
बोलावले याचे असेच काहीतरी कारण देऊन दुखावले होते, आणी जिम्मिची मैत्रीण रूबी हिने तिच्या माँमडैडचे
अशोकच्या फॅमिली बद्दल काय मत आहे ते सांगून कट्टी घेतली होती...
या काळात अशोक असीम वेदना आणी दुःख या मार्गातून जात असल्यामुळे त्याला मॉडर्न लोकांमधला मॉडर्न
हायफाय जातिभेद दिसू शकत होता जो याआधी दिसला नव्हता, जसे देवीच्या गाभाऱ्यात अशोकच्या
परिवाराला येण्यास मनाई किंवा सवर्ण लोकांनी काही बाबतीत पाड़लेले अंतर मग आत्ता अशोकला कळून
चुकले की मी त्यांच्यात मिसळण्याचा आयुष्यभर खुप प्रयत्न केला पण त्यांनी माझ्याकड़े कायम दलित याच
नजरेने पाहिले...
अशोक आता पूर्ण उदास झाला होता खचला होता, उपाशी पोटी तो इकडे तिकडे वणवण भटकत होता त्याला
काहीच मार्ग सुचत नव्हता जीवन अंधकारमय झाले होते अशा वेळेस तो चुकून त्या भीमनगर
झोपड़पट्टीच्या समोर आला जिथे त्याचे बालपण गेले होते ... तिथे एकीकडे बुद्धाचा फ़ोटो होता त्या खाली
लिहिले होते
"जगात दुःख आहे हे सत्य
दुःखाचे कारण शोधता येते
दुःखावर मात करता येते"
दूसरीकड़े बाबासाहेबाचा फ़ोटो होता त्याखाली लिहिले होते
"बळी बकऱ्याचा दिला जातो वाघाचा नाही"
या दोन वाक्यांनी अशोकच्या डोक्यात विचारांचे चक्र गरागर फिरू लागले, त्याला वेगळीच ताकद आली, तो
बैचैन झाला, पूर्ण चेतनेने त्याच्या अंगावर शहारे येऊ लागले आणी लगेच रात्रभर विचार मंथन करुन दुसऱ्या
दिवशी त्याने TV-- चॅनेल वर जाऊन लाइव कार्यक्रमातुन सिंघानिया हॉस्पिटल मधे चालणारा सर्व गैरप्रकार
महाराष्ट्रासमोर आणला ... आणी जिकडे तिकडे अशोक कांबळे हे नाव एखाद्या फ़िल्मी हीरो प्रमाणे गाजले..
पांडबाने त्याला TV वर पाहीले गर्वाने पांडबाची छाती फुगली त्याने मनातल्या मनात ठरवले की अशोकला
एकदा जाऊन भेटायचे नक्की ....दुसऱ्या दिवशी अशोकला जागतीक अव्वल दर्जाच्या आहिरे इंडस्ट्रीजच्या
SEA HILLS हॉस्पिटलमधुन कॉल आला, अशोक तिथे जाऊन पाहतो तर काय समोर स्वतः SEA HILLS चे
चेयरमैन "विश्वासराव आहिरे" बसले होते त्यांच्या ऑफिस मधे बाबासाहेबांचा साठ फुट बाय साठ फुटचा भला
मोठा फ़ोटो लावला होता व बुद्धांची चाळीस फुटाची आकर्षक मूर्ति होती ... हे सर्व पाहुन अशोक गांगरुन गेला,
आहिरेन्नी त्याला त्याचे अपॉइंटमेंट लेटर दिले पैकेज होते एक करोड़ 80 लाख, अशोकला विश्वास बसेना...
अशोकच्या डोळ्यातून आनंदाश्रु वाहू लागले!
मिळाली कारण तुमच्यात असलेली लढाउ व्रुत्ती, आम्ही प्रमाणिकपणे काम करतो आणी अशा लढाउ व्यक्तींना
सलामही करतो .. आणखी एक महत्वाचे आम्ही बोनस दिवाळीला देत नाही, 14 एप्रिलला देतो ... व 5
दिवसाची सुट्टीही देतो... महापुरुषांच्या जयंत्याही साजऱ्या करतो पण कुठलाच धार्मिक सण आम्ही साजरा
करीत नाही ...
हे सर्व ऐकून अशोक स्वतच्याच नजरेत मेला पण तरी अशोकने आनंदाच्या भरात पेढयांचा पुडा आहिरेसाहेबा
समोर ठेवला पण आहिरे साहेब म्हणाले की "तसे तर आम्ही अंधश्रंद्धा मानत नाही पण तरी तुमचा मान
ठेवावा म्हणून मी हा प्रसाद खाल्लाही असता पण आज 6 डिसेंबर आहे आज आम्ही काही गोडधोड बनवत
नाही खात नाही, कुठलाच आनंद साजरा करत नाही....
यातून काही बोध नक्की घेउ या ना ?
बोला घेउया ना ?
जय भीम जय भारत