प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिल्या महत्वाच्या सूचना प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिल्या महत्वाच्या सूचना - बहुजन जागृती

बहुजन जागृती

डॉ बाबासाहेब आंबेडकर : बहुजन समाजाची राजनीतिक आणि सामाजिक चळवळ

Saturday, March 28, 2020

प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिल्या महत्वाच्या सूचना

राज्यातील लॉकडाऊन परिस्थितीमुळे सर्वसामान्य, हातावर पोट असणारी जनता संकटात सापडली आहे. त्या 

पार्श्वभूमीवर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेऊन या संकटातून बाहेर पडण्यासाठी 

चर्चाविनिमय करून ठोस पावले उचलली असती, तर या भीषण परिस्थितीतुन काही मार्ग निघाला असता. व 

सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळाला असता.

पण, ते शक्य झाले नाही. या पार्श्वभूमीवर मी मुख्यमंत्र्यांना काही महत्त्वाच्या सूचना या व्हिडीओच्या माध्यमातून 

करतोय. शासनास आमची विनंती आहे की, त्यांनी पुढील गोष्टींवर तातडीने मार्ग काढावा. व हातावर पोट 

असणाऱ्या जनतेला दिलासा द्यावा.

- प्रकाश आंबेडकर.

या व्हिडिओत काय म्हणाले प्रकाश आंबेडकर

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवली पाहिजे होती ती त्यांनी बोलवली 

नाही आणि म्हणून ते या विडिओ मार्फत सांगत आहे 

पहिली गोष्ट सगळ्यात मोठा वर्ग ज्याच्यावर परिणाम होईल तो रोजंदारीचा वर्ग आहे त्यात अनेक वर्ग येतात त्यांचं 

उल्लेख मी करत नाही 

डिमॉनेटायजेशन ने त्यांची तिजोरी संपविली तर लॉकडाऊन मुळे त्यांच्याकडे होत नव्हते ते संपायला आलाय 

अशी पसरिस्तिथी आहे 

किती दिवस लॉकडाऊन राहील याची खात्री नाही तर १५ एप्रिल नंतर देखीलसुद्धा चालू राहील असं दिसतंय 

अश्या परिस्तिथीमध्ये हा रोजंदारीवाला वर्ग आहे त्याला अत्यावक्षक सुविधा पुरवणं हे त्यातलं महत्व आहे.

सविस्तर पाहण्यासाठी इमेजवर क्लिक करा

<img src="prakash-ambedkar-suggestion-to-cm.jpg" alt="prakash ambedkar gives suggestions to maharashtra cm uddhav thackeray"/>

No comments:

Post a Comment