अवघं जग सध्या कोरोनाशी निकराची झुंज देत आहे. भारतही त्याला अपवाद नाही. या अभूतपूर्व संकटाचा
मुकाबला करणं सोपं नाही. अत्याधुनिक नि मूलभूत सुविधा असलेले अमेरिका, इटली, इंग्लंड, जर्मनी, फ्रांस,
चिन, जपानसारखे विकसित देश हैराण झाले आहेत. त्या तुलनेत 112 व्या क्रमांकावर असलेल्या भारताची
अवस्था काय असेल याची कल्पनाच न केलेली बरी. आजपर्यंत आरोग्य या विषयाकडे राज्यकर्त्यांनी म्हणावे तसे
लक्ष दिलेच नाही. सारं काही देवभरोसे सोडून दिलं. त्याची आज चर्चा करणे अनुचित ठरेल. या घडीला गरज
आहे
हे वाचा - कोरोना व्हायरस संदर्भात भारतीयांकडून खोटा प्रचार
लोकांना जीवदान देण्याची. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैशाची गरज असून सध्याची अर्थव्यवस्था पाहाता शासन
स्वबळावर हे करू शकेल याची सूतराम शक्यता नाही. यासाठी उद्योगपती, सेलिब्रिटीज, देवस्थाने, सेवाभावी
संस्था, अधिकारी-कर्मचारी, व्यापारी संघटनांना उदार अंत:करणाने पुढे यावे लागेल.
देशातील इतर देवस्थान ट्रस्टच्या तुलनेने आर्थिक द्रष्ट्या अगदीच जेमतेम असलेल्या बुध्दगया महाबोधी ट्रस्टने
देशातील इतर देवस्थान ट्रस्टच्या तुलनेने आर्थिक द्रष्ट्या अगदीच जेमतेम असलेल्या बुध्दगया महाबोधी ट्रस्टने
काल दिनांक 27 मार्च रोजी एक कोटी रूपयांचा धनादेश बिहार मुख्यमंत्री मदतनिधीमध्ये जमा करून
सामाजिक बांधिलकी निभावण्याचा यथाकुवत पण प्रामाणिक प्रयत्न केला.
बुद्धं सरणं गच्छामि
धम्मं सरणं गच्छामि
संघं सरणं गच्छामि !
भवतु सब्बं मंगलम् !
जय संविधान !!
जय भारत !!!
बुद्धं सरणं गच्छामि
धम्मं सरणं गच्छामि
संघं सरणं गच्छामि !
भवतु सब्बं मंगलम् !
जय संविधान !!
जय भारत !!!
No comments:
Post a Comment