झाला आहे .या देशात नोकरी किंवा शिक्षणासाठी भारतीय वास्तव्यास आहेत . आणि ह्या भारतीयां
मार्फत कोरोना व्हायरस बाबत चुकीची माहिती भारतात फेसबुक च्या माध्यमातून पाठवली जात आहे .
युवराज साखरे यांचा हा महत्वाचा लेख
अजित रानडे नावाचे एक गृहस्थ इथे जर्मनीत "मराठी कट्टा जर्मनी" नावाची संस्था/ ग्रुप चालवतात. त्यांनी एका
फेसबुक पोस्ट द्वारे उद्धव ठाकरेंना उद्देशून म्हटलंय कि जर्मनी मध्ये शिकणारे काही मराठी तरुण भारतीय
वृत्तपत्रांना कोरोनाव्हायरस विषयीची चुकीची माहिती देतायत. सवंग प्रसिद्धीसाठी हे तरुण व्हिडीओ तयार
करून अफवा पसरवतायत असाहि त्यांनी आरोप केलाय. आपल्या आरोपांची पृष्टि करण्यासाठी त्यांनी राहुल
वाघ आणि वैभव शिंदे या तरुणांनी वृत्तपत्रांना दिलेल्या मुलाखतींची कात्रणे जोडून त्यावर FAKE NEWS असं
लिहिलंय. अशा FAKE NEWS पसरवणाऱ्या तरुणांवर जर्मनीत कायदेशीर कारवाई केली जाईल अशी
धमकीहि दिलीय. रानडेचा खोटारडेपणा अनेकांनी उघड पाडलाय त्यामुळे त्याबद्दल लिहीत नाही.
पण मराठी-मराठीच्या नावाखाली हे लोक फक्त जर्मनीतच नाही तर पूर्ण युरोप मध्ये काय काय करतात यावर
लिहायला घेतलं तर एक पुस्तक लिहून होईल. मराठी कट्टा जर्मनी ची वेबसाईट जरी बघितली अन या संस्थेच्या
टीम वर नजर जरी टाकली तरी "मराठी कट्टा जर्मनी" हे खरं तर "ब्राम्हण कट्टा जर्मनी" आहे हे लक्षात येईल. मी
इथे आल्यावर संघ स्वयंसेवक असलेल्या एका मित्राने मला रानडेची अन विनय सहस्रबुद्धेची (सहस्रबुद्धे भाजपचे
उपाध्यक्ष अन इतर अनेक संघ प्रणित संस्थांचे अध्यक्ष आहेत) भेट घालून देतो माझ्या बरोबर एका कार्यक्रमाला
चल अशी गळ घातली. (सहस्र्बुद्धे वगैरे संघाचे लोक पूर्ण युरोप मध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन युरोप
मध्ये राहणाऱ्या नवतरुणांना एक विशिष्ट विचारसरणी पस्रवण्यासाठी विविध संघटनांशी बांधून घेतात. हा एक
स्वतंत्र विषय आहे, यावर नंतर कधीतरी) मित्राला मी ब्रिगेडी आहे हे सांगून त्याला कोपरापासून नमस्कार केला
अन असल्या कार्यक्रमांमधून तुम्ही लोक काय करता ते मला चांगलं ठाऊक आहे म्हणून कटवल.
मुळात फेसबुक वर विखारी पोस्ट लिहून मुख्यमंत्र्यांना आवाहन वगैरे करण्याइतपत रानडेला मिरच्या का
मुळात फेसबुक वर विखारी पोस्ट लिहून मुख्यमंत्र्यांना आवाहन वगैरे करण्याइतपत रानडेला मिरच्या का
लागल्या याचं उत्तर फार अवघड नाही. परदेशात शिक्षण घेणं किंवा नोकरी-व्यवसायानिमित्ताने युरोप-अमेरिकेत
स्थायिक होणं हि आता काही सवर्ण-ब्राह्मणांची मक्तेदारी राहिलेली नाही. बहुजन समाजातले हजारो लाखो तरुण
युरोप-अमेरिकेत शिक्षण घेतायत हि बाब रानडे अन त्याच्या इतर ब्राम्हण सहकारयांना सतत खुपत असते.
भारतात काय चाललंय त्याबद्दल इथल्या लोकांमध्ये एक विशिष्ट (मोदी धार्जिणी) प्रतिमा तयार करणं, भारतीय
संस्कृती म्हणजे ब्राम्हणी संस्कृती हे गोऱ्या युरोपियनांच्या गळी उतरवणं वगैरे उद्योग हे लोक इथे करत असतात.
पण माहितीच केंद्र हे इतर कुणाचा हाती जाताना दिसलं कि रानडे वगैरेना पोटदुखी होते. राहुल वाघ चा व्हायरल
झालेला व्हिडीओ अन एबीपी माझाने घेतलेली त्याची मुलाखत याने "ब्राम्हण कट्टा जर्मनी" च्या सदस्यांमध्ये एक
वाघ अन शिंदे आडनावाची पोरे युरोप मध्ये राहणाऱ्या सकळ मराठी जणांची (ब्राह्मणांची) स्पेस ऑक्युपाय कशी
काय करू शकतात या सदाशिव पेठी विकृत संतापाने मळमळ चालू झाली.
स्वतःच्या प्रोफाइल वर दंगलीत हजारोंना मारल्याचे आरोप असलेल्या माणसाबरोबर पाठीत मणका
स्वतःच्या प्रोफाइल वर दंगलीत हजारोंना मारल्याचे आरोप असलेल्या माणसाबरोबर पाठीत मणका
नसल्याप्रमाणे झुकलेल्या अवस्थतेत अभिमानाने फोटो मिरवणाऱ्या रानडे वगैरेंनी जर्मन लोकांचे संघ अन तत्सम
विचारसरणी बद्दल काय मत आहे याबद्दल माहिती घ्यावी. ज्यादिवशी जर्मन लोकांना भारतातले ब्राम्हण इथे
येऊन हिट्लरविषयी ममत्व बाळगणाऱ्या संघटनेशी लागेबांधे ठेवतात हे कळेल त्या दिवशी जर्मन लोक यांच्या
पृष्ठभागावर लाथ मारून यांना इथून हाकलून देतील.
- युवराज साखरे
- युवराज साखरे
No comments:
Post a Comment