आंबेडकरी समाज आणि धम्मचक्र परिवर्तन दिन | अशोका विजयादशमी / दसरा आंबेडकरी समाज आणि धम्मचक्र परिवर्तन दिन | अशोका विजयादशमी / दसरा - बहुजन जागृती

बहुजन जागृती

डॉ बाबासाहेब आंबेडकर : बहुजन समाजाची राजनीतिक आणि सामाजिक चळवळ

Friday, September 29, 2017

आंबेडकरी समाज आणि धम्मचक्र परिवर्तन दिन | अशोका विजयादशमी / दसरा


dhamm-chakra-parivartan-din

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ओक्टोम्बर १९५६ ला नागपूर याठिकाणी आपल्या पाच लाख अनुयायां सोबत

बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती  .धम्मचक्र प्रवर्तन दिन अशोकविजयादशमीच १४ऑक्टोंबर नव्हे !!!

रावण ,दसबळी इ . जे मांडले गेले आहे ते संपूर्ण बौद्ध धम्माच्या पाडवानंतरचे चित्रण आहे . आज कोणी रावण

किवा म्हैसासूर यांची उदाहरणे देऊन मांडत असेल किंवा आवतन देऊन सांगत असतील तर तो बौद्ध धम्माच्या

दृष्टीने निरुपयोगी गोष्ट आहे .बौद्ध धम्माचा इतिहास आणि अभ्यास करून पाहिलं तर या सर्व गोष्टी बौद्ध धर्माला

शह देण्यासाठी होत्या म्हणून काल्पनिकतेने सांगितल्या गेलेल्या पात्रांना मोठ करण्यात काहीही उपयोग नाही .

ज्यांचे ऐतिहासिक संदर्भ आणि पुरावे आहेत असाच बौद्ध धम्म सांगणे सर्वात अगोदर महत्वाचे आहे , रावण

अथवा म्हैसासुर अशी पात्रे रंगवून सांगणे आणि बौद्ध धम्माचे महत्व लपविण्यासारखे आहे . बाबासाहेबांनी

अशोक विजयादशमी चे महत्व ओळखून आणि त्यादृष्टीने येणारी तारीख १४ ऑक्टोबर १९५६ निवडली, ती १४

ऑक्टोबर म्हणून नव्हे तर अशोक विजयादशमी म्हणून त्यामुळे काही लोक म्हणत असतील कि धम्मचक्र प्रवर्तन

दिन हा १४ ऑक्टोंबर ला साजरा करायला हवा पण हे अत्यंत चूक आहे याचे स्पष्टीकरण पुढीलप्रमाणे :


'दसरा' हा हिंदू चा सण त्याच दिवशी येतो म्हणून आपण "धम्मचक्र प्रवर्तन दिन"हा १४ ऑक्टोंबर ला साजरा

करायला हवा असे बरेच लोक सांगताना आढळतात.पण बौद्ध धम्माचा इतिहास आणि अभ्यास करणे आवश्यक

आहे . सम्राट अशोक वयाच्या २१ व्या वर्षी मगध च्या गादीवर बसला आपला राज्याभिषेक करून संपूर्ण भारत

देशाचा अनभिषीज्ञ सम्राट बनला एका मागून एक राज्ये अशोकाला शरण येऊ लागली पण कलिंग देशाचा राजा

चैत्र काही शरण येत नव्हता म्हणून सम्राट अशोकाने कलिंग देशावर युद्ध पुकारले , युद्धात लाखो माणसे

मारली गेली , लाखो लोक जखमी झाले. हे भयानक चित्र पाहून अशोकाला कसलीच दया आली नाही आणि

भीती वाटली नाही.विजयाने बेभान होऊन सम्राट अशोक नाचत होता त्याचवेळी भन्ते निग्रोध चारीकेसाठी चालले

होते . "बुद्धं सरणं गच्छामी"चा निनाद सम्राट अशोकाच्या कानावर पडला .अशोक म्हणतो , या भन्ते ,आपले

स्वागत असो आपण वेळेवर आलात ,मला आशीर्वाद द्यावा ,मी आता सम्राट झालो .त्यावर भन्ते म्हणाले , यात तू

कसला आलास सम्राट , तू लाखो जीव हत्येचे पाप केले आहेस , हे सारे कशासाठी ? तृष्णेपोटीच ना ! यात

जनहित मुळीच नाही . या लोकांचा आक्रोश तुला ऐकू येतो ना , हे सारे तुझ्याचमुळे झाले , असे दुष्कर्म तू केलेले

आहेस .

पुढे भन्ते तथागताचा मैत्री , अहिंसा तत्वाचा उपदेश अशोकाला करतात . अशोकामध्ये बदल होऊन हाती

असलेली तलवार सम्राट अशोक म्यान करतात आणि म्हणतो ," मी आजपासून शस्त्र हातात घेणार नाही ,युद्ध

करणार नाही ,आजपासून मी धर्मशील होणार , मी बुद्ध धम्माला शरण जाणार आणि मग 10 दिवस धम्माचा

अभ्यास केला आणि सम्राट अशोक हरला म्हणून दश हरा म्हणतात. तेव्हा अशोक बौद्ध धम्माचा स्वीकार करून

भन्ते उपगुप्त यांच्या हस्ते बौद्ध धम्माची दीक्षा घेतात . तो काळ म्हणजे इ. स . पूर्व २५४ आणि तो दिवस म्हणजे

अश्विन शुद्ध दशमीचा दिवस . तेव्हाच सम्राट अशोकाने एक जाहीरनामा आपल्या राजमुद्रेत अंकित करून

दसहारा म्हणून प्रसिद्ध केला आणि पुढे अनेक वर्षे बौद्ध धम्माचे एक प्रतिक म्हणून "अशोकविजयादशमी "

दसहारा हा उत्सव साजरा करण्यात आला .

 धम्मदिक्षेच्या वेळी धम्मचक्र प्रवर्तनाय संकल्प म्हणुन बौद्ध धम्म आचार संहितेवर आधारलेला दसहरा नावाचा 

अधिक्रुत जाहीरनामा आपल्या प्रजेसाठी लोकनिती किंव्हा धर्मनिती म्हणून प्रसारित केला. हाच प्रजाधर्म, 

राजधर्म, व नितीधर्म समजून त्याचा आदर करावा आशी राजाद्न्या जाहीर केली. इ.स. पुर्वि २५४ पासून अशोक 

विजयीदशमिला दसहरा म्हणजेच दसरा सण सुरू झाला व तो भारतभर साजरा केला जावु लागला. या दिवशी 

सम्राट अशोकाने दुसरे धम्मचक्र फिरविले.

सम्राट अशोकाने दशहरा नावाचा जनतेच्या हिता सुखाचा जो जाहीरनामा प्रसिद्ध केला त्यामधील दहा निती तत्वे

खालील प्रमाणे,

१. हिंसाचार, धार्मिक स्थळी व कार्यक्रमात पशु हत्या करणार नाही.

२. चोरी, फसवणूक, लुबाडणूक इ. न करणे.

३. प्ररस्त्रिगमन न करणे, व्यभिचार न करणे.

४. खोटे न बोलणे, गैरव्यवहार न करणे. निंदा, चहाडी न करणे.

५. सार्वजनिक व पावित्र्य स्थळी मद्यपान न करणे.

६. नास्तिकपणा म्हणजे सत्कार्य व माणूसकीचा तिटकारा सोडून देणे.

७. माणुस गुणांनी श्रेष्ठ मानावा. त्याच्या जातीने नव्हे.

८. वैर सोडून दिल्यानेच वैर शांत होते हे विसरू नये.

९. धर्मगुरूंनी सांगितलेले बहुजन हिताय , बहुजन सुखाय व सदाचार हे आपले आचरण विसरू नये.

१०. निती नियमांचे पालन करणार्यास अम्रुताचा लाभ होईल, नाहीतर म्रुत्युगाठ हे विसरू नये.

असा हा दहा कलमांचा जाहिरनामा होता. याला दशहरा म्हणतात. त्याचाच दसरा हा शब्द रुढ झाला. सम्राट

अशोकाने प्रजेला प्रजाधर्म आणि राजधर्म म्हणून बौद्ध धम्म दिला , अनेक भिक्खूना परदेशात पाठविले , अनेक

लेण्या , स्तंभ उभारले . ८४००० स्तूप बांधले .लाखो करोडो लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली .बौद्ध धम्म आचार

संहितेवर आधारलेला 'दसहारा ' नावाचा अधिकृत जाहीरनामा बनवून त्यात आचरणाचे दहा तत्वे समाविष्ट

करून अशोकविजयादशमी , दसहारा म्हणजेच कालांतराने दसरा सण साजरा करण्यात येऊ लागला तो सम्राट

अशोकाचा नातू बृह्दत्त उर्फ बुद्धरथ याच्या काळापर्यंत .

सम्राट अशोकाने ८४००० स्तुपासाठी अमाप पैसा खर्च केला इ . स . पूर्व २६७ ला सुरु झालेलं काम अगदी

झपाट्याने इ . स . पूर्व २६५ ला पूर्ण झाले त्याचे कारण म्हणजे शहाणव्व कोटी सुवर्णमुद्रा खर्च करून हे

बांधकाम पूर्ण केले . सम्राट अशोक जगातील सर्वात बलाढ्य ,संपत्तीवान राजा होता म्हणून प्राचीन भारताला

सम्राट अशोकामुळे ' भारत सोने कि चिडिया ' किवा ' सोन्याचा धूर भारतातून निघत होता ' असे लोक आजही

अभिमानाने म्हणतात .

पुढे पुष्पमित्र शुंगाने सम्राट अशोकाचा नातू सम्राट ब्रूहदत्त उर्फ बुद्धरथ चा खून करून
रक्तरंजित प्रतीक्रांती करून लाखो बौध्द धर्मियांच्या , भिक्खुंच्या कत्तली केल्या . एका भिक्खूचे डोके जो आणेल 

त्याला १०० सुवर्ण मुद्रा बक्षीस म्हणून दिल्या अर्थात सम्राट अशोकाच्या वंशांची संपतीची देखील लुट केली आणि 

बौद्ध धम्माच्या पाडवासाठी 'दसहारा ' जो सम्राट अशोकाने धम्म उत्सव सुरु केला होता त्याला आपले विकृत 

रूप  देऊन धम्म आचाराची जी तत्वे होती तिचा पाडाव केला म्हणून आपल्यापरीने तोच सण सूडभावनेने साजरे 

केले . बौद्ध धम्माच्या ज्या सांस्कृतिक बाबी लोकांना आकर्षित करणाऱ्या होत्या कि बुद्ध मूर्तीची रथयात्रा , 

महोत्सव ,सण , उपोसथ इ स्वीकारून त्याचे पूर्ण ब्राह्मणीकरण केले . मनु ला हाती धरून मनुस्मृतीची रचना 

केली  ,रामायण , महाभारत, भगवदगीता ,पुराणे इ . काव्ये निर्माण करून स्वतःला राम आणि मोर्य राजांना 

रावणासारखे दर्शवून बौद्ध धम्माला मोठा शह दिला . अनेक स्तूप ,विहारे, लेण्या बळकावून त्याचे ब्राह्मणीकरण 

केले .काहींनी ब्राह्मणी देवस्थाने बनविली ज्यात पंढरपूर , तिरुपती ,बद्रीनाथ ,जग्गनाथपुरी अशी मुळची बुद्ध 

विहारे बळकावून त्याचे ब्राह्मणीकरण केले .

अर्थात बाबासाहेबांनी १९५६ या वर्षात येणारी अशोकविजयादशमी अर्थात 
दशहारा हा अश्विन शुद्ध दशमीचा दिवस निवडून सम्राट अशोकाने तथागत बुद्धाने केलेले जगातील धम्मचक्र प्रवर्तन अनुकारून त्या दिवशी धम्मदीक्षा घेतली आणि धम्मचक्र प्रवर्तनचे अनुष्ठान केले . म्हणून आपण अशोकविजयादशमी चे ऐतिहासिक महत्व आणि धम्माचे पालन करून अनुसरण करा.