ब्रिटिशांच्या काळातच आर.एस.एस.ची स्थापना झाली आणि आज बहुमताने ते सत्तेवर आहेत. भाजपा हि
आर.एस.एस. ची राजकीय पार्टी आहे .त्यामुळे आर.एस.एस. काय नि भाजपा काय एकाच आहे हे सर्व आपल्या
सर्वाना ज्ञात आहे . आता इतक्या वर्षापासून आणि सध्याच्या काळात त्यांनी किती किती कार्य केलं हे त्यांना
आणि जनतेला चांगल्या प्रकारे ठाऊकच आहे .पण आता काही प्रश्न जनतेकडून आवर्जून विचारले जात आहेत
.त्यातून आर.एस.एस.( किंवा संघ ) वाल्यांकडून उलट सुलट उत्तर मिळत आहेत .आणि बहुतेक उत्तर हि
इतिहास बदलवून सांगण्यात आर.एस.एस. वाले एकदम तरबेज आहेत .पण काही प्रश्न असे आहेत कि ज्यांची
उत्तरे त्यांच्याकडे नाहीत आणि असे प्रश्न विचारल्याने आर.एस.एस.वाल्याना नक्कीच राग येतो आणि त्याच उत्तर
द्यायचं टाळतात .
याबद्दलचे प्रश्न पुढील प्रमाणे आहेत ;
1.आर.एस.एस. नेहमीच मुस्लिम आणि ख्रिस्ती लोकांच्या विरोधात काम करते . मग त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध (
कारण ब्रिटिश ख्रिस्ती होते ) का नाही लढले अथवा त्यांना विरोध का नाही केला ?
2.१९१७च्या भिमाकोरेगावच्या लडाई मध्ये पेशवा राजवट संतुष्टयात आली.पुढे मग १९ व्या शतकात ब्रिटीशानी
भारतातील काही लोकांचं ख्रिस्ती धर्मात धर्मान्तर केलं. त्यांचं हे सत्र चालू असताना याच काळात आर.एस.एस. ने
१९२५-१९४७ पर्यंत का विरोध केला नाहि ?
3.काय आर.एस.एस. ने १९२५ ते १९४७ पर्यंत या धर्मान्तराला थांबविण्यासाठी काही ठोस पावले उचलली का ?
देशामध्ये ब्रिटिशांविरुद्ध "चलेजाव"चे वारे वाहत होते पण एकाही आर.एस.एस. च्या कार्यकर्त्यांनी या लढ्यात
भाग न घेता त्यांनी ब्रिटिशाना का समर्थन का केलं ?
4.देशामध्ये ब्रिटिशांविरुद्ध "चलेजाव" चालू असताना आर.एस.एस (संघा )तील कोणत्याही कार्यकर्त्याला
कारावास झाल का ? किंवा कोणत्याही कार्यकर्त्याला फाशीची शिक्षा झाली का ?
5.ब्रिटिश हुकूमत असतानाच १९२५-१९४७ पर्यंत गो-हत्या संबंधात आर.एस.एस.नी एकही फिर्याद का नाही
नोंदवली ?
6.हिंदू मध्ये फक्त ३% ब्राह्मण आहेत आणि ८५% ओबीसी, एससी और एसटी आहेत .आतापर्यंत झालेल्या संघ
संचालकापदि किती ब्राह्मण झाले नी किती किती गैर-ब्राह्मण अर्थात ओबीसी, एससी और एसटी झाले ?
7.जर आर.एस.एस. स्वता: ला एक हिंदू संघटना मानते .मग ८५ % हिंदू असलेल्या जनतेच्या आरक्षणाला का
विरोध करते ?
8.जर आर.एस.एस शूद्र ( आजचे ओबीसी ) आणि अतिशूद्र ( आजचे एससी और एसटी ) यांना हिंदू मानतात तर
त्यांच्या राष्ट्रीय नेत्यांमध्ये या ओबीसी, एससी और एसटी नाव का नाही आहे ?
9.१९२५ ते आजतागायत स्थापन झाल्यापासून आर.एस.एस मध्ये एकही महिला सभासद नाही याचा अर्थ ते
महिलांचा विरोध करतात असा नाही का ?
10.आर.एस.एस (संघा )मध्ये असणाऱ्या ब्राह्मण आणि गैर ब्राह्मण यांचं सामाजिक योगदान किती आहे ?
11.आर.एस.एस चे संचालक विश्व हिंदू परिषदेचे संचालक आखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे संचालक राष्ट्रीय
मजदूर संघ किंवा राष्ट्रीय सवयं सेविका संघ यांच्या अद्याप पर्यंत प्रथम अध्यक्ष कोण ?
12.स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशातील पाहिलं हत्याकांड " म.गांधी हत्या " याचा आरोप सतत
आर.एस.एस (संघा )वरच का लागतो ?
13.जर अस्पृश्य समाज हा देखील हिंदू समाज आहे असं मानत असणाऱ्या आर.एस.एस (संघा )ने नाशिकमधील
डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या काळाराम मंदिर प्रवेशाला आर.एस.एस (संघा ) ने विरोध का केला ?
14.१९२५ ते १९४७ अस्पृश्य समाज किंवा आदिवासी समाजासाठी न्याय हक्कासाठी आर.एस.एस (संघा ) ने
कोणतेही आंदोलन केलं काय ?
16.१९२५ ते १९४७ मध्ये आर.एस.एस (संघा ) ने " वंदे मातरम "चा नारा दिला होता का ?
17.१९२५ ते १९४७ मध्ये जर आर.एस.एस (संघा)ला बाबरी मस्जिद हीच रामजन्म भूमी आहे हे माहीत होत का ?
आणि जर माहीत असत तर का त्यांनी १९९१ मध्ये केलेल्या बाबरी मस्जिद विंध्यस त्यावेळी हि (ब्रिटिशांच्या
काळात ) केला असता का ?
18.१९८० मध्ये मंडल आयोगाचा ५२ टक्के आरक्षणाचा रिपोर्ट आला आणि तो लागू करण्याची मागणी देश भर
होऊ लागली आणि १९८३-१९८४ मध्ये याच आर.एस.एस (संघा)ने याविरुद्धाची भूमिका का घेतली ?
पुढे मंडल आयोग रिपोर्ट ज्यात २७ टक्के सरकारी नोकरीत ओबीसी ना आरक्षण व्ही पी सिंग सरकारने १९९०
ला लागू केल्यानंतर मात्र याच हिंदुच्या विरुद्ध आर.एस.एस (संघा) ने विरोधात का भूमिका घेतली ?
19.७ ऑगस्ट १९९० ला मंडल आयोग रिपोर्ट लागू केल्यानंतर कट्टर जातीवादी ब्राह्मणांनी सोमनाथ ते बाबरी
मस्जित अश्या रथयात्रेच आयोजन का बर केलं ?
20.१९ नोव्हेंबर १९९२ मध्ये सरकारने २७ टक्के आरक्षणाला भारतीय संविधानानुसार मान्यता दिली आणि याच
वेळी ओबीसी ना भुलवून रामराथाची-कारसेवकांची योजना आणून अखेर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा विरोध
21.दर्शवत ६ डिसेंबत १९९२ ला बाबरी मस्जिद विंध्यस करण्यात आली . बाबरी मस्जिद आणि राम मंदिर
मामला गाजवून देशावर मोठं संकट उभं केलं .हे त्यांचं काम हिंदू विरुद्ध नव्हतं का ?
22.आर.एस.एस (संघा) ने ब्रिटिश काळातच १९४७ पर्यंत गो-हत्या रोखण्यासाठी का प्रयत्न केले नाहीत .मात्र
१९४७ नंतर सतत गो हत्या रोखण्यासाठी प्रयत्नशील का आहे ?
23.आर.एस.एस (संघ ) राष्ट्रवादी आणि हिंदू(त्व)वादी संघटन आहे कि फक्त जातीवादी संघटन आहे ?कारण
आतापर्यंत आर.एस.एस (संघ) प्रमुख हे ब्राह्मणच का आहेत ? ,फक्त राजेंद्र सिंग वगळता जे ठाकूर समाजाचे
आहेत .
24.१९२५ ते १९४७ मध्ये स्वातंत्र्य लढ्यात आर.एस.एस (संघा )ने भाग का नाही घेतला ? आणि ते स्वातंत्र्याच्या
विरोधात आणि ब्रिटिशांच्या समर्थानात का होते ?
25.आर.एस.एस (संघा ) मध्ये आतापर्यंत ब्राह्मणाच सर्वोच्च पद का कायम आहे ?
वरील एकाही प्रश्नच उत्तर कोणताही आर.एस.एस (संघा )चा सभासद किंवा कार्यकर्ता देऊ शकणारच नाही .
वर जे २५ प्रश्न विचारले आहेत ते गुजरात मधील एका सामाजिक,राजनीतिक कार्यकर्ता जयंता भाई मनानी यांचं
आहेत .त्यांनी विचारलेले प्रश्नच हेच उत्तर आहे .