डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचं ६ डिसेंबर १९५६ साली महापरिनिर्वाण झालं .त्या अगोदरच बाबासाहेबानी
देशाला संविधान देऊन इथल्या प्रत्येक समाजाच्या थराला न्याय हक्क मिळवून दिले होते आणि त्याच बरोबर
तुम्हाला तुमचं परिवर्तन करवून घ्यायचं असेल तर एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे (अंधश्रद्धा वाढविणारा आणि
फक्त ब्राह्मणी कर्मकांडात अडकलेला) हिंदू धर्माचा त्याग .बाबासाहेबानी स्वता: धर्म परिवर्तन करून बौद्ध
धम्माचा स्वीकार त्यांनी १४ ओक्टोम्बर १९५६ रोजी आपल्या पाच लाख अनुयायांसोबत घेतला होता .
परंतु डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पश्चात आंबेडकरी चळवळ देश भरात पसरविणे त्याकाळात शक्य झाले
नव्हते .त्यातच ब्राह्मणवादी विविध संघटनेने आणि तत्कालीन काँग्रेस सरकारने कोणत्याही प्रकारे डॉ बाबासाहेब
आणि त्यांची विचारसरणी नव्याने जन्म घेणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली .बाबासाहेबानंतर मात्र त्यांच्या
अनुयायांवर आणि इतर मागास्वर्गीनवर हल्ले होऊ लागले आणि त्यातच "दलित पॅन्थर "चा जन्म झाला .पण तेही
बाबासाहेबांचे विचार समाजात पेरण्यात असमर्थ ठरले आणि म्हणता म्हणता आंबेडकरी विचार संपत आले होते .
मग अश्यातच पंजाबातून पुण्यात आलेला एका तरुणाच्या हाती बाबासाहेबांचं एक पुस्तक हाती काय लागत
आणि रतो रात डोक्यातील सर्व चक्रे फिरू लागली आणि त्याने बाबासाहेबाना पुन्हा एकदा जागृत केलं आणि
बाबासाहेबांच्या विचारांची पेरणी देशभर इतकी खोलवर रोवली कि ती आता नष्ट होणे शक्यचं नाही,तर
अशक्यच आहे .त्या महान तरुणाचं नाव होत कांशीराम .होय त्यांना आपण बहुजन नायक कांशीरामजी म्हणूनच
ओळखतो
जीवन परिचय
कांशीरामजींचा जन्म १५ मार्च १९३४ मध्ये पंजाबमधील गाव-ख्वासपूर जिल्हा-रोपड शीख परिवारात (संत
रोहिदास ) दलित समाजात झाला .ज्यांना अजूनही दलित -मागासलेलं म्हणून हिणवलं जात . त्यांच्या वडिलांचं
नाव हरी सिंग आणि आईच नाव बिशन कौर होत .कांशीरामजींना दोन भाऊ आणि चार बहिणी होत्या .त्यांच्या
वडिलांनी आपल्या सर्व मुलांना शिकविण्याचा निर्धार घेतला होता .कांशीरामजी हे विज्ञानात स्नातक ( बी.एस सी )
होते. १९५८ मध्ये डिग्री घेतल्यानंतर त्यांना महाराष्ट्रातील पूना याठिकाणी एका वैज्ञानिक सहायक पदाची नोकरी
मिळाली .नोकरीत असतानाच त्यांना तिथला जातीयता भेदभाव आढळून येऊ लागला .पण नेमकं काय करायचं
आणि कसा विरोध करायचा हे त्यांना काळात नव्हतं .कारण तोपर्यंत डॉ बाबासाहेब आंबेडकर हे त्यांच्या
वाचनात आले नव्हते . नोकरी चालू असतानाच १९६५ मध्ये अचानक डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती
निमित्त दरवर्षी असणारी सुट्टी रद्द करण्यात आली .परंतु त्यातही काही कामगारांनी या गोष्टीला विरोध केला
.कांशीरामजी दिनाभाना(राज्यस्थान ) यांच्याशी झालेल्या संवादातून हि त्यात सामील झाले आणि शेवटी कंपनीने
सुट्टी जाहीर केली .आणि इथूनच नवीन क्रान्तीची सुरुवात झाली दिनाभाना यांनी दिलेल्या एका पुस्तकातून
कांशीरामजींचं जीवनाचं पालटून गेलं होत .ते पुस्तक होत "Annihilation of Castes"( जातींचा विनाश) .या एका
पुस्तकाच्या वाचनाने कांशीरामजी भारावून गेले आणि त्यांना कोण आंबेडकर ? काय केलं आंबेडकरांनी ? हे
समजलं .मग त्यांनी ज्योतिराव फुले ,पेरियार स्वामी ,नारायण गुरु ,कबीर,रोहिदास इत्यादीची गाथा पुस्तके ग्रंथ
वाचून काढले .त्यांच्या मनावर बाबासाहेबांच्या विचारांचा एक ठसाच उमटवला .आणि त्यांनी आंबेडकरी
चळवळीत उडी घेण्याचं ठरविलं.
संघर्ष कार्यपद्धती आणि राजनीतिक सफर
आंबेडकरी चळवळीशी जुडण्यासाठी ते सर्व प्रथम डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेली रिपब्लिकन
पार्टी ऑफ इंडिया ( आर पी आय ) मध्ये शामिल झाले .पण १९७१ मध्ये आर पी आय आणि काँग्रेस मध्ये काही
बिनसलं आणि त्यातच आर पी आय मध्ये आपापसात कलह वाढत होता .याचा राग म्हणून कांशीरामजी यांनी
सरळ राजीनामा दिला . त्यांनी आपल्या कामाला वेग येण्यासाठी वेगळ्या पक्षाची गरज भासू लागली आणि मग
नोकरीही सोडली . त्यांनी आपल्या सहकार्याना घेऊन पुण्यातच अनुसूचित जाती ,अनुसूचित जनजाती ,अन्य
मागासवर्गीय जाती आणि अल्पसंखांक कल्याणकारी संस्था स्थापन केली . या संस्थेचं मुख्य कार्य होत पीडित
समाजातील नोकरदार वर्गाच होणार शोषणा विरुद्ध आवाज उठविणे . त्याचबरोबर हि संस्था जन-जागृतीचा
कामही करू लागली . लोकांना जागृत करून शिक्षणाचे महत्व आणि इथली जाती व्यवस्था कशी काम करते हे
पटवून देऊ लागले .कश्या प्रकारे बहुजन महापुरुषांनी इथल्या जाती अंतासाठी लढे दिले आणि हे समाजात
पटवून सांगण्यात ते यशस्वी हि ठरले .
पुढे मग कांशीरामजी यांनी देशातील सर्वात मोठं राज्य आणि काँग्रेसच मक्तेदारी असलेलं राज्य उत्तर प्रदेश
मध्ये आंबेडकरी चळवळ नेण्याचा निर्णय घेतला आणि ते यशस्वीही झाले .१९७३ मध्ये त्यांनी दिल्ली येथे
बामसेफ ची स्थापना केली जी आता "मूलनिवासी बहुजन संघ " या नावाने ओळखली जाते . या संस्थेचं ब्रीद
वाक्य होत "शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा ".या संघटनेच्या माध्यमातून नवीन कार्यकर्ते निर्माण होऊन
जण जागृतीचा काम वेगानं निर्माण झालं .बामसेफचा पुनरबांधणी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी
१४ एप्रिल १९७८ रोजी नव्याने करण्यात आली .या संस्थेनं आंबेडकरी विचार घरा घरात पोहचविले .आणि देशात
नव्या जोमानं आंबेडकरी चळवळ उभी राहिली .बामसेफ संघटना उत्तर प्रदेशासहित दिल्ली हरियाणा पंजाब
बिहार महाराष्ट्र मध्यप्रदेश आणि इतर राज्यात मजबूत झाली .
त्यानंतर बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी ६ डिसेंबर १९७८ मध्ये त्यांनी बामसेफ च्या समांतर अशी अजून
एका संस्थेचं निर्माण केलं जिचं नाव " दलित शोषित संघर्ष समिती " म्हणजेच DS-4 . हि संघटना कार्यकर्त्यांवर
होणाऱ्या हल्ल्याचा प्रतिरोध करण्यासाठी उभारण्यात आली होती .या संस्थेनं नवीन नारा दिला " ठाकूर ,ब्राह्मण
आणि बनिया सोडून बाकी सब है डिएस-४ 'पण रेजिस्ट्रेशन अभावी पुढे अडचणीत आली .पण १९८४ मध्ये मात्र
त्यांनी राजनीतिक "बहुजन समाज पार्टी "ची स्थापना केली व त्याच ब्रीद वाक्य होत "बहुजन हिताय बहुजन
सुखाय " आणि आपले विचार कांशीरामजी या पार्टीद्वारे लोकांमध्ये मांडू लागले .त्यांनी ठणकावून सांगितलं " जर
कार सरकार आपले केलेले वाडे पूर्ण करण्यात अपयश येत तर असले सरकार हे कुचकामी आहे,त्यांच्यामध्ये
काम करण्याची क्षमता नाही आहे आणि अश्या सरकारला धुडकावून लावा ".
आपल्या सामाजिक आणि राजकीय कार्याद्वारे खालच्या जातीतील माणसांचा आवाज त्यांनी बुलंद केला.
लोकांमध्ये इतका बदल होऊ शकते हे पाहून ब्राह्मणवादि हादरून गेले .याचा परिणाम बहुजन समाज पार्टीने
उत्तर प्रदेशात सत्ता काबीज केली . आणि मायावती उत्तर प्रदेशाच्या मुख्यमंत्री झाल्या .त्यावेळी सत्तेवर
असलेल्या नरसिंह राव सरकारने मायावतींना बद्दल गौरव उदगार काढले ते म्हणाले कि हा स्त्री शक्तीचा विजय
आहे आणि पुढे मायावती आयरन लेडी म्हणून ओळखू लागली .
याच संघर्षाच्या काळात त्यांनी " चमचा युग " नावाचा ग्रंथ लिहून तथाकथित ब्राह्मणवादियांचं आणि इतर
मीडियाचं लक्ष वेधून घेतलं .राजकारणात कश्याप्रकारे चमचागिरी चालते यावर त्यांनी सविस्तर लिहिलं होत
.सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या .हा ग्रंथ रातोरात सर्व बुद्धिजीवींच्या पसंदिचा ठरला .आणि एका नवीन युगाची
एका नवीन आंबेडकरी युगाची चाहूल लागली होती . कांशीरामजींनी बाबासाहेबांच्या पावलावर पाऊल टाकायचं
ठरवलं होत ,त्यांना समजलं होत कि जोपर्यंत तुमची प्रसिद्धी इथला मीडिया देत नाही तोपर्यंत तुमचं कार्य हे शून्य
आहे .त्यासाठीच त्यांनी पत्रकारितेमध्ये हि आपला ठसा उमटवला .
त्यांनी सुरु केली काही पत्र -पुस्तिका ;
अनटचेबल इंडिया ( अंग्रेजी ) ,बामसेफ बुलेटिन ( अंग्रेजी ),आप्रेस्ड इंडीयन( अंग्रेजी ),बहुजन संगठन
(हिंदी),बहुजन नायक (मराठी हिंदी बंगाली अंग्रेजी ),श्रमिक साहित्य ,शोषित साहित्य,दलित आर्थिक उत्थान
,इकॉनॉमी अपसार्ज (अंग्रेजी )बहुजन टाइम्स दैनिक ,बहुजन एकता .
धर्म परिवर्तन आणि निर्वाण
बहुजन समाज पार्टी (बसपा)चा देश भर विस्तार झाला होता आणि उत्तर प्रदेशमध्ये सत्ता हि काबीज केली
होती .परंतु अजून बसपाला केंद्रात म्हणजे देशावर सत्ता आणायची होती . बाबासाहेबांचं स्वप्न पूर्णत्वकडे
नेण्याचा निर्णय जवळ येऊन ठेपला होता .२००२ मध्ये बसपाच्या रॅली मध्ये मान्यवर कांशीरामजी यांनी जाहीर
केलं कि लवकरच बौद्ध धम्माचा स्वीकार करणार आहे .यासाठी त्यांनी देशभरातील २० लाख जण समुदायाची
हि धम्म परिवर्तनासाठी तयार केले होते.त्यात मागास्वर्गीयाण व्यतिरिक्त उंचच जातीतलेही सहभागी होते .त्यांनी
सांगितलं कि येणाऱ्या २००६ मध्ये ५० व्या धम्मचक्र परिवर्तन दिनी नागपुरात ते आपल्या अनुयायान्सोबत बौद्ध
धम्माची दीक्षा घेतील .परंतु त्यांच्या तब्येतीनि मात्र साथ सोडली होती. त्यांना मधुमेहाचा त्रास होता जो अधिक
बळकावत होता . धर्म परिवर्तनाचा अगोदरच ९ ओक्टोम्बर २००६ मध्ये त्यांचं निर्वाण झालं . काही दिवसांनी
मायावतीजी ने जाहीर केलं कि जेव्हा आम्ही देश भर सत्तेवर येऊ तेव्हा धर्म परिवर्तन करून बौद्ध धम्माचा
स्वीकार करू .
अश्या या महान वैचारिक बुद्धिमत्ता असणारे कंदाची डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या इतके प्रखर बुद्धिमत्तेचेही
नसतील पण हे मान्यच करावं लागेल कि कश्या प्रकारे कांशीरामजींनी डॉ बाबासाहेब आंबेडकरां नंतर
सामाजिक आणि राजनीतिक मध्ये सर्वात मोठा परिवर्तन घडवून आणला आहे . तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर
यांनी दिलेलं संविधान कश्याप्रकार्रे जण कल्याणासाठी आहे हे सांगण्यात ते यशस्वी झाले .
कांशीरामजी यांच्या सन्मानार्थ देण्यात येणारे पुरस्कार :
कांशीराम खेळ कुद पुरस्कार,कांशीराम कला रत्न पुरस्कार ,कांशीराम भाषा रत्न सन्मान .
तसेच उत्तर प्रदेश मधील एका जिल्ह्याचं नाव "कांशीराम नगर" नामकरण १५ एप्रिल २००८ मध्ये करण्यात आलं.
निष्कृष्ट सत्तेवर असणाऱ्या भार सरकारन अजूनही मान्यवर कांशीरामजींचा योग्य तो सन्मान केलेला नाही .
परंतु त्यामुळे त्यांनी पेरलेली फुले शाहू आंबेडकर यांची विचारसरणी नेहमीच स्मरणात राहतिल.
अश्या महान बहुजन नायकास विनम्र अभिवादन .