डॉ बाबासाहेब आंबेडकरांना ब्लॅक चेक म्हणणाऱ्या संजय आवटे यांना प्रत्युत्तर डॉ बाबासाहेब आंबेडकरांना ब्लॅक चेक म्हणणाऱ्या संजय आवटे यांना प्रत्युत्तर - बहुजन जागृती

बहुजन जागृती

डॉ बाबासाहेब आंबेडकर : बहुजन समाजाची राजनीतिक आणि सामाजिक चळवळ

Tuesday, June 2, 2020

डॉ बाबासाहेब आंबेडकरांना ब्लॅक चेक म्हणणाऱ्या संजय आवटे यांना प्रत्युत्तर








<img src="dr-ambedkar-is-blank-cheque.jpg" alt="sanjay awate says dr babasaheb ambedkar is blank cheque for politicians"/>



जॉर्ज फ्लोईड या अमेरिकन कृष्णवर्णीयाच्या खुनानंतर अमेरिका ढवळून निघाली. जॉर्ज फ्लॉईडचा खून गोऱ्या

पोलिसाने कसा केला याबाबत गुगल करून माहिती मिळवू शकता. अमेरिकेत या हत्येविरोधात प्रचंड निदर्शन 

होत आहेत. हजारो निदर्शक काल व्हाईट हाऊजसमोर एकत्र आल्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांना अर्धातास व्हाईट 

हाऊज मधील बंकर मधे आश्रय घ्यावा लागला होता. या खुनी पोलीस अधिकाऱ्याला अटक झाली असून त्याला 

३०-३५ वर्षाची जेल होऊ शकते. मिनीसोटा शहरातील पोलिसांनी या हत्येनंतर गुडघे टेकून जनतेची माफी 

मागितली आहे. तरीही निदर्शन थांबत नाहीयेत. या निदर्शनांमध्ये आफ्रिकन अमेरिकन नागरिकांसाहित गोरे 

नागरिक, मेक्सिकन व इतर अल्पसंख्य समुदाय सुद्धा सहभाही झाले आहेत. अमेरिकन भारतीय समुदाय मात्र 

या विरोध प्रदर्शनात सहभागी झाल्याचे दिसत नाहीये.

तर या घटनेचा हवाला देत संजय आवटे नावाच्या एका पत्रकाराने आंबेडकरवादी नेत्याना प्रश्न विचारणारी पोस्ट 

लिहिली आहे. संजय आवटे गांधीवादी आहेत. त्यांना अनेकदा बाबसाहेबांबद्दलच्या प्रेमाची सुदधा हुक्की येत 

असते. काँग्रेस-राष्ट्रवादीला पाठिंबा म्हणजे पुरोगामीत्व आणि भाजप-आरएसएसला विरोध अशी मांडणी यांच्या 

फेसबुक पोस्टमधून नेहमीच होत असते. कालच्या पोस्टचा निमित्ताने त्यांनी स्वतःच्या अकलेचे जे काही दिवाळे 

काढले त्यावर विचार करणे भाग आहे. मोहसीन, रोहित वेमुलाच्या हत्येवरून ते आंबेडकरवादी नेत्यांवर 

आगपाखड करतात. त्यांनी जर या निमित्ताने सवर्ण पुरोगाम्यांच्या बोटचेप्या भूमिकेवर टीका केली असती तर ते 

लिखाण एकांगी वाटल नसत पण नरेंद्र जाधव, रामदास आठवले आणि एड.प्रकाश आंबेडकर या यांच्यावर 

टीका करून त्यांना काय साध्य करायचे आहे ते स्पष्ट आहे.

संजय आवटे यांनी नेमकं काय लिहिलंय ते वाचा :
'आरोपी' असलेल्या एका कृष्णवर्णीय नागरिकावर पोलीस अधिकारी अत्याचार करतात. त्याला मारून टाकतात. तेव्हा, असे आंदोलन उसळते की अमेरिकेच्या विभाजनवादी अध्यक्षाला घरातल्या भुयारात लपून बसावे लागते.या हिंसक निदर्शनांचे समर्थन करायचे अजिबात कारण नाही, पण हा जनक्षोभ कमी महत्त्वाचा नाही.अमेरिकेला कोणी आंबेडकर मिळाले नाहीत, तरीही असा अन्याय झाल्यावर सर्व स्तरांतील लोक पेटतात. तो राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय चर्चेचा विषय होतो. (सर्वस्तरीय) समतावादी नेते, कलावंत, साहित्यिक, पत्रकार भूमिका घेतात.तुलना करण्याचा मुद्दा इथे नाही. दोन्हीकडच्या वास्तवात मूलभूत फरक आहेत.पण, आंबेडकरांचा रोज उदोउदो होणा-या तुमच्या देशात काय होतं? इतरांचं नंतर बघू, 'आंबेडकर' या नावाचा वारसा सांगतच जे वाढले, त्यांचं तरी काय?
१. 'आमचा बाप आणि आम्ही' लिहिणारे सोईनुसार बाप बदलतात.
२. 'मारूती कांबळेचं काय झालं?' असे प्रश्न 'त्यांना' कुठे आठवले, जे सत्तेच्या 'राजा'पुढे 'जोकर' झाले!
३. वंचितांच्या नावाने गळा काढणा-या वारसदारांच्या डोक्यात काही झाले तरी प्रकाश पडतच नाही.
'डॉ. बाबासाहेब आंबेडकर' हा 'ब्लॅंक चेक' आहे! तुम्ही जेवढे चलाख, तेवढी किंमत अधिक.गोरगरीब टाचा घासून मेले, तरी आपल्याला काय फरक पडतो?
रोहित असो वा मोहसीन, अखलाक असो की लोया, माणसं मरत राहातीलच, पण हे 'बार्गेनिंग' थांबवत नाहीत.काही 'भिडे'पोटी गप्प बसतात, तर काही भिकेपोटी.प्रत्येकजण आपापली किंमत वसूल करतो आणि नव्या तोडीसाठी सिद्ध होतो.
(अशांना अमेरिकेतील वंशवादाचा निषेध करण्याचा अधिकार तरी उरतो का?)


केवळ आंबेडकरवाद्यांनीच प्रस्थापितांविरोधात संघर्ष करण्याचा ठेका घेतला आहे का? डाव्यांनी, समाजवाद्यांनी, 

पुरोगाम्यांनी, स्त्रीवाद्यांनी संधी मिळेल तेव्हा आंबेडकरवाद्यांना झोडपण्याचा अर्थ काय? हा एकच समूह भाजप-

आरएसएस, प्रस्थापितांच्याविरोधातील लढ्यातील पुरोगाम्यांची वेठबिगार आहे का? की एक समूह तुम्हाला 

भडास काढण्यासाठीची पंचबॅग आहे? पूर्वी गावात जनावर मेल म्हणजे त्याची विल्हेवाट लावायची जबाबदारी 

महारांची होती. आता पुरोगाम्यांनी आंबेडकरवाद्यांवर ही नवी बलुतेदारी लादलेली आहे की काय? बर ही 

पुरोगामी बलुतेदारी आंबेडकरवादी मान्य सुद्धा करतील पण त्यांच्यासोबत आपण किती प्रमाणात आणि किती 

वेळ उभे असता? नामांतर आंदोलनात आंबेडकरवाद्यांसोबत डावे, समाजवादी आणि प्रमोद महाजांसारखे उजवे 

सुद्धा सोबत होते पण त्याचा सवर्णांवर किती सकारात्मक परिणाम झाला? दलित, आदिवासी समाजाबद्दल सवर्ण 

समाजाच्या मानसिकतेत किती बदल झाला? आजही जेव्हा दलितांवर, आदिवासींवर अन्याय होतो तेव्हा हाताच्या 

बोटावर मोजण्याऐवढे सवर्ण सोबत उभे राहतात आणि त्याबदल्यात संपूर्ण आंबेडकरवाद्यांना स्वतःचे वेठबिगार 

समजतात हे कटू सत्य आहे.

आवटे प्रस्थापितांना प्रश्न का विचारत नाहीत? मोहसीन शेख हत्याप्रकरणी तपास कुठपर्यंत आला आहे याबाबत 

गृहमंत्री असलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्याला प्रश्न विचारण्याची हिंमत का दाखवत नाहीत? सांगलीत भिडेला पोसून 

मोठं करणाऱ्या साळसूद नेत्याला आवटे जाब विचारणार आहेत की नाही? मिरज दंगली प्रकरणी भिडेला 

क्लिनचिट देणाऱ्या पक्षाला आवटे जाब विचारण्याची हिंमत करणार आहेत की नाही? भीमा कोरेगाव हल्ला 

प्रकरणी स्वतःचे सरकार असूनही त्याप्रकरणी आरोपी असलेला भिडे अजूनही मोकाट कसा असा प्रश्न आवटे 

सरकारला करणार आहेत की नाही? पण ते प्रश्न विचारत आहेत भीमा-कोरेगाव हल्लाप्रकरणी लढलेल्या एड. 

प्रकाश आंबेडकरांना. आवटे असे प्रश्न काँग्रेस-राष्ट्रवादीला अजिबात विचारणार नाहीत कारण आवटे 

कातडीबचाऊ पत्रकार आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीकडून कातडी बचावण्याची हमी मिळत असल्यामुळे दोन चार 

मिळमिळीत प्रश्न काँग्रेस-राष्ट्रवादीला विचारण्या पलीकडे काही टोकदार प्रश्न विचारण्याची हिंमत आवटेंमध्ये 

अजिबात नाही. पण आंबेडकरवादी आवटेंची आवडती पंचबॅग आहे. कितीही ठोसे हाणा आवटेंच्या 

बापाचं(बोलावता धनी) त्यात काय नुकसान आहे? उलट फायदाच आहे.

आवटे बाबासाहेबाना ब्लॅंक चेक म्हणतात. केवळ बाबासाहेबच नाही तर फुले आणि शाहू सुद्धा ब्लॅंक चेक 

आहेत. हा ब्लॅंकचेक हवा तेव्हा वापरून सत्तेत येणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीला जाब विचारण्याऐवजी आवटे 

ज्यांच्याकडे सत्ता नाही अश्या आंबेडकरवाद्यांना जाब विचारत आहेत. नरेंद्र जाधव गेले भाजपकडे मान्य आहे 

पण त्यांना तिकडे जावस का वाटलं याबाबत आवटेंच काय मत आहे? रामदास आठवले यांना स्वतःच्या 

राजकारणासाठी मोठं करून वापरणाऱ्या आणि त्यानंतर फेकून देणाऱ्या शरद पवारांना जाब विचारण्याची 

हिंमत आवटेंमध्ये आहे का?

जॉर्ज फ्लॉईडच्या खुनानंतर जर एखाद्या अमेरिकन संजय आवटेने काळ्यांनाच प्रश्न केला असता तर त्याला डोकं 

ठिकाण्यावर असलेल्या अमेरिकन नागरिकांनी A**hole म्हटलं असत असत. दलित अत्याचार प्रकरणी 

आंबेडकरवाद्यांनाच जाब विचारणारे संजय आवटे यांना गाढव (Ass) का म्हणू नये? पुरोगामीत्वाच्या नावाखाली 

प्रस्थापितांची ओझी वाहणार गाढव. या गाढवाला राम-राम!

- शाक्य  नितीन । प्रवक्ता - वंचित बहुजन आघाडी 




No comments:

Post a Comment