उतावीळ आंबेडकरी तरुणांनो...तुम्ही चटकन भावनिक होता... उतावीळ आंबेडकरी तरुणांनो...तुम्ही चटकन भावनिक होता... - बहुजन जागृती

बहुजन जागृती

डॉ बाबासाहेब आंबेडकर : बहुजन समाजाची राजनीतिक आणि सामाजिक चळवळ

Tuesday, May 5, 2020

उतावीळ आंबेडकरी तरुणांनो...तुम्ही चटकन भावनिक होता...

<img src="dr-babasaheb-ambedkars-followers-and-politicians.jpg" alt="politicians uses dr ambedkars name"/>



कुणी बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेतले की, तुम्हाला तो आंबेडकरवादी भासतो...!

कुणी कुठं आहे देव म्हटले की, तुम्हाला तो फुले शाहु आंबेडकरी विचाराचा वाटतोय...!

या उतावीळ वृत्तीतून आंबेडकरी तरुणांनी बाहेर पडले पाहिजे...!

या अतिउत्साही आणि भावनिक वृत्तीमुळे अनेकदा धूर्त राजकारणी लोकांनी आपली हराशमेंट केली आहे...!

आजकाल बरेच आंबेडकरी तरुण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरे यांचे गुणगान गातांना दिसतात...!

काही जणांना ऊद्धव ठाकरे मध्ये प्रबोधनकार केशवराव ठाकरेंचे गुण दिसू लागले आहेत...!

राजकीय नेते सोंगाडेही असतात हे शिकून घ्या...!

यापूर्वी आपल्या भावनेशी खेळून अनेकांनी आंबेडकरी चळवळीमध्ये घुसखोरी केली आहे...!

अनेकांनी आंबेडकरी माणसाच्या भावनिकतेचा फायदा घेऊन आपली राजकीय पोळी भाजून घेतली आहे...!

डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणतात "ज्यांना इतिहासाचे विस्मरण होते ते इतिहास घडवू शकत नाहीत".

काय आहे आंबेडकरी चळवळीचा इतिहास ?

.तो एकदा आंबेडकरी तरुणांनी समजून घ्यावा आणि मगच आपले मत बनवावे...!

डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीत अनेक ब्रम्हाणेत्तर पुढारी होते,एवढंच काय तर ब्राम्हण सुद्धा डॉ 

बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्पृश्यतेच्या चळवळीत काम करीत असतं...!

१९२७ साली डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह सुरू केला...!

सत्याग्रहाला निर्णायक भूमिकेत घेऊन जाण्याची वेळ आली तेव्हा सत्याग्रह परिषदेने ठराव पास करुन मनुस्मृती 

जाळण्याचे घोषित केले.आणि प्रत्यक्ष कृती करायची वेळ आली तेव्हा....!

चवदार तळ्याच्या सत्याग्रह परिषदेत मंचकावर विराजमान असलेल्या ब्रम्हाणेत्तर नेत्यांपैकी अनेकांनी काढता 

पाय घेतला आणि सत्याग्रह परिषदेतून निघून गेले...!

वरवर सोबतं काम करण्यासाठी येणारे जेव्हा अटीतटीची वेळ येते तेव्हा कसे कलटी मारतात हा अनुभव 

महत्वाचा..!

आपल्या अस्पृश्य बांधवांनी हा अनुभव आपल्या गाठीशी बांधून ठेवला...!

डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीतील तेव्हाचा कार्यकर्ता अडाणी वा अल्पशिक्षित होता, परंतु त्यांचे 

चळवळींचे भान अतिशय ऊच्च श्रेणीचे होते...!

महाड चवदार तळ्याचा सत्याग्रह आटोपून डॉ बाबासाहेब आंबेडकर मुंबई मध्ये आले, मुंबई मधील परळ येथील 

दामोदर हॉलमध्ये पुढील भुमिका ठरविण्यासाठी अस्पृश्य बांधवांची सभा घेण्यात आली त्या सभेत ब्रम्हणेत्तर 

पुढारी देवराव नाईक आणि प्रबोधनकार केशवराव ठाकरें यांची सुद्धा जोमदार भाषणे झाली.,त्यांनी चवदार 

तळ्याच्या सत्याग्रहाला पाठिंबा जाहीर केला...!

अगोदरचा अनुभव लक्षात घेऊन काही अस्पृश्य कार्यकर्त्यांनी लगेच अस्पृश्य बांधवांच्या हातचे पाणि पिण्यास 

देवराव नाईक आणि प्रबोधनकार केशवराव ठाकरें यांना दिले,"बाप दाखव नाही तर श्राद्ध करं"

असा पवित्रा घेतला...!

देवराव नाईक आणि प्रबोधनकार ठाकरे यांनी भरसभेत अस्पृश्यांच्या हातचे पाणि प्राशन केले.आणि आपली 

मनोभूमिका दाखवून दिली...!

आजच्या सुशिक्षित आंबेडकरी तरुणांनी असा पवित्रा घेऊन समोरच्या नेत्याला जोखले पाहिजे...!

ऊद्धव ठाकरे मध्ये बदल झाला असेल तर त्यांच्या भुमिकेचे आंबेडकरी चळवळ स्वागतच करेल मात्र हेही खरे 

की,जो पर्यंत मनोहर भिडे आणि मिलिंद एकबोटे सारखे ब्राम्हणी विद्वेषी भिमा कोरेगाव चे खलनायक यांच्या वर 

कार्यवाही होतं नाही तोपर्यंत ऊद्धव ठाकरे यांचे सरकार पुरोगामी आहे असे म्हणायचे कुणीही धाडस करु नये...!

जो पर्यंत महाराष्ट्रातील डॉ नरेंद्र दाभोळकर कॉम्रेड पानसरे यांच्या हत्या करणारे मारेकरी पकडल्या जातं नाहीत 

तोपर्यंत ऊद्धव ठाकरे यांचे सरकार पुरोगामी आहे असे म्हणायचे धाडस कुणीही करु नका...!

बोलायचे एक मात्र वागायचे भलतेच हा पवित्रा घेऊन अनेकदा राजकीय नेत्यांनी आंबेडकरी जनतेचा भ्रमनिरास 

केला आहे हे आंबेडकरी तरुणांनी लक्षात घेऊन नेतृत्व जोखावे असे मनोमन वाटते...!

जयभीम.

- भास्कर भोजने.| वंचित बहुजन आघाडी

No comments:

Post a Comment