चवदार तळे सत्याग्रह चवदार तळे सत्याग्रह - बहुजन जागृती

बहुजन जागृती

डॉ बाबासाहेब आंबेडकर : बहुजन समाजाची राजनीतिक आणि सामाजिक चळवळ

Saturday, March 11, 2017

चवदार तळे सत्याग्रह




<img src="chavdar-tale-satyagraha.jpg" alt="dr babasaheb ambedkar mahad chavdar tale satyagraha "/>




भारताच्या स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळामध्ये अनेक सत्याग्रह तथा आंदोलने झाली. पण आपल्याकडे म.

गांधींनी केलेल्या सत्याग्रहांचा इतिहास आपल्याकडे सातत्याने शिकविला आणि चर्चिला जातो.आपल्याला पाठ्य

पुस्तकाच्या अभ्यासक्रमात आवर्जून आणि कायमचा आढळणारा सत्याग्रह करणारे म . गांधी आणि कसला तर

मिठाचा.पण का काढली हे जर कोणाला विचारलं तर याच कारण नाही देता येत .असो,जेव्हा ब्रिटीशानी एक

नवीन कायदा  केला कि आता मिठावरही कर (टॅक्स )  द्यावा लागेल आणि हे जेव्हा व्यापारी वर्गाला समजले

तेव्हा सगळे व्यापारी ( म्हणजे बनिया ) लोकांनी गांधींकडे धाव घेतली



 व हा कर रद्द करण्यासाठी काहीतरी करा

असं विनंती केली आणि त्यासाठीच दांडी  यात्रेचं आयोजन केलं.

मीठ चवीसाठी वापरात असत आणि सर्वाना त्याकाळी उपलब्ध होते आणि कोणाला मीठ मिळालं नाही अशी

त्याकाळी घडलेली कोणतीही घटना हि नाही .तरीही व्यापारी वर्गासाठी गांधींनी दांडी यात्रा केली होती आणि

त्याचा इतका गाजवजा हि केला . पण जर का माणसाला पाणीच मिळाले नाही तर काय होईल याची कल्पना

करा जरा .आज आपण २१ व्या पाहतोय काही शहरी भागात तर खेड्यापाड्यात पाणी टंचाई आहे ती आणि पाणी

न मिळाल्यामुळे किती लोकांना जीवाला मुकावं लागत ते .आणि जर इतिहासावर नजर टाकली तर काय दिसत

एक भयाण सत्य. जे मुळात अभ्यासक्रमात टाकण्याची फार गरज आहे. 



<img src="chavdar-tale-satyagraha.jpg" alt="dr babasaheb ambedkar mahad chavdar tale satyagraha "/>




कारण गांधींच्या मिठाच्या सत्याग्रहपेक्षा

महत्त्वाचा सत्याग्रह म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या " चवदार तळ्याच्या सत्याग्रहा "कडे पहावे .कारण

महाडचे चवदार तळे अजरामर झाले ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या सत्याग्रहामुळे. महाडच्या

चवदार तळ्याच्या ऐतिहासिक सत्याग्रहाला 95 वर्षे पूर्ण होत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 20 मार्च 1927

रोजी महाडच्या चवदार तळ्यावर समताधिष्ठित समाजासाठी सत्याग्रह केला. चवदार तळ्याचे पाणी प्राशन

करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्य समाजाला गुलामगिरी व अस्पृश्यतेच्या अनिष्ट प्रथेतून मुक्‍त

केले. अस्पृश्याच्या भिंती गाडून इथल्या वर्षानुवर्षे वाट पाहत असणाऱ्या पददलितांना न्याय मिळवून देण्यासाठी

डॉ. आंबेडकरांनी हा सत्याग्रह करून सामाजिक क्रांतीचेे रणशिंग फुंकले. महाडमध्ये हा दिवस प्रतिवर्षी

"क्रांतिदिन" म्हणून साजरा केला जातो. 19 मार्च 1927 रोजी डॉ. आंबेडकरांनी महाडमध्ये पहिली कुलाबा 

जिल्हा बहिष्कृत परिषद घेतली होती आणि याच्या दुसर्‍या दिवशी चवदार तळ्याचे पाणी प्राशन करून

सत्याग्रह केला होता.हा सत्याग्रह केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित नव्हता, तर उभ्या देशाला प्रेरणा देणारा होता.

सामाजिक समतेच्या दृष्टिकोनातून मुंबई विधान परिषदेतील सदस्य रावबहादूर सीताराम केशव बोले यांनी 4 

ऑॅगस्ट 1923 रोजी मांडलेला एक ठराव संमत झाला होता. या बोले ठरावात असे म्हटले गेले होते की,

‘सार्वजनिक तळी, धर्मशाळा, मंदिरे, विद्यालये, न्यायालये आदी जी सरकारी खर्च वा अनुदानाने बांधली वा

चालविली जातात, त्यात अस्पृश्यांना मुक्‍तद्वार असावे.’परंतु हा ठराव फक्त चोपडी बंद होता अस्पृश्याचे होणारे

हाल आपेष्टा काही ब्राह्मण पुढार्यानाही पाहवत नव्हते . म्हणून बोलेंनी पुन्हा एकदा 5 ऑॅगस्ट 1926 रोजी त्याचे

कायद्यात रूपांतर केले. त्याचबरोबर ज्या स्थानिक स्वराज्य संस्था ( ज्यांना सरकार कडून अनुदान मिळते अश्या

मंदिर ,धर्मशाळा ,दवाखाने इ . )ठरावाची अंमलबजावणी करणार नाहीत त्यांचे अनुदान बंद करण्याची तरतूद

केली. अनुदान बंद झाल्यावर व्यवहार ठप्प होणार असल्याने मुंबई राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांनी

आपापल्या क्षेत्रात अंमलबजावणीचे ठराव पास केले. पुढे फेब्रुवारी 1927 मध्ये डॉ. आंबेडकर यांची मुंबई

विधानसभेवर नियुक्‍ती झाली. त्यांनी 19-20 मार्च 1927 रोजी तत्कालीन कुलाबा जिल्ह्यातील महाड

नगरपालिकेच्या हद्दीत या ठरावाची अंमलबजावणी करण्याचे पक्के ठरवले. या परिसरात डॉ. बाबासाहेब

आंबेडकर यांचे अनेक अस्पृश्य सहकारी कार्यरत होते. कुलाबा जिल्हा बहिष्कृत परिषद घेतली होती आणि

याच्या दुसर्‍या दिवशी चवदार तळ्याचे पाणी प्राशन करूनठरावाची अंमलबजावणी करण्याचा ठराव महाड

नगरपालिकेनेही केला होता. या ठरावाची अंमलबजावणी करणार्‍या परिषदेचे अध्यक्ष स्वतः बाबासाहेब होते.

<img src="chavdar-tale-satyagraha.jpg" alt="dr babasaheb ambedkar mahad chavdar tale satyagraha "/>



या परिषदेच्या पहिल्या दिवशी 19 मार्चला या ठरावावर भाषणे झाली. या भाषणामध्ये बाबासाहेब म्हणाले होते

की,

हा संघर्ष केवळ पाण्यासाठी नसून तो मानवी मूलभूत हक्‍कांसाठी आहे. चवदार तळ्याचे पाणी 

प्यायल्याने आम्ही अमर होऊ, अशातला भाग नाही. आजपर्यंत चवदार तळ्याचे पाणी प्यायलो नव्हतो, 

तर तुम्ही-आम्ही काही मेलो नव्हतो. त्यामुळे चवदार तळ्यावर केवळ पाणी पिण्यासाठी जायचे नसून 

इतरांप्रमाणे आम्हीही या समाजातील माणसे आहोत, हे सिद्ध करण्यासाठी.’ अशा आशयाचे प्रतिपादन

केल्यानंतर दुसर्‍या दिवशी म्हणजे 20 मार्च रोजी सकाळी रांगेने जाऊन चवदार तळ्याचे पाणी पिण्याचे

ठरवण्यात आले.

तलावाच्या चारही दरवाजांतून सत्याग्रही तळ्याच्या काठावर आले व त्यांनी स्वत:च्या ओंजळीने पाणी प्राशन केले.

प्रस्थापित वर्णवर्चस्ववादी शक्‍तींना हे रुचणारे नव्हते. साहजिकच, या सत्याग्रहानंतर एक प्रचंड विरोधी लाट

आली. सत्याग्रहींना मारहाण झाली. जखमी झालेल्या कार्यकर्त्यांना बाबासाहेबांनी स्वत: दवाखान्यात नेऊन

पोहोचवले. कालांतराने या कार्यकर्त्यांवर हल्ले करणार्‍या लोकांवर खटले चालवून त्यांना शिक्षाही देण्यात आली.

यासाठी महाडच्या न्यायालयात बाबासाहेब लढले. या एका लढ्यामुळे ठिकठिकाणचे पाणी पेटले.आणि पुढे

देशभरातील अस्पृश्य लोकांनी या विरुद्ध आवाज उठविला आणि अश्या प्रकारे अस्पृश्य समाजात अभूतपूर्व

क्रांती झाली. या समाजाचा स्वाभिमान जागा झाला आणि गुलामगिरीच्या बेड्या तुटण्यास सुरुवात झाली.

काही महिन्यातच म्हणजे २५ डिसेम्बर ला मनुस्मृतीला जाळली गेली त्याच महाड ठिकाणी.  भारताच्या

इतिहासातील एक मोठा क्रांतिकारी लढा आणि जगातील एकमेव असा लढा जो पाण्यासाठी करण्यात आला

होता .

महाड चवदार तळ्याच्या सत्याग्रहात सामील होऊन यशस्वी करणाऱ्या सर्व बांधवाना( स्पृश्य आणि अस्पृश्य)

आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना व त्यांच्या विचारांना विनम्र अभिवादन !