कोरोनाचा संशयित समजून जातीवाचक शिवीगाळ केली. एवढ्यावरच न थांबता त्यांच्या घरावर हल्ला केला.
ऋषीकेश आपल्या आजोबाकडे मामाकडे राहतो. आजोबाची तबीएत खराब असते म्हणून त्यांची काळजी घेतो.
अचानक त्यांच्या घरावर जातीयवाद्यानी हल्ला केला. यात ऋषीकेशच्या डोक्याला जबर मार लागला तर मामी व
आजोबा यांनाही मारहाण करण्यात आली.
ऋषीकेशच्या फिर्यादीवरून तिघा जणांविरोधात अट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून यातील काशीद
हे वाचा - अजून एक खैरलांजी
ऋषीकेशच्या फिर्यादीवरून तिघा जणांविरोधात अट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून यातील काशीद
नामक 2 तर सोळंके नामक 1 असा तीन आरोपीपैकी दोन आरोपीला अटक करण्यात आली आहे.
या घटनेची माहिती मिळताच ऑल इंडिया पँथर सेनेचे महाराष्ट्र महासचिव विनोद भोळे यांनी परिवाराशी संपर्क
या घटनेची माहिती मिळताच ऑल इंडिया पँथर सेनेचे महाराष्ट्र महासचिव विनोद भोळे यांनी परिवाराशी संपर्क
साधला घटनेची माहिती घेतली व पीएसआय सूर्यकांत डोंगरे यांच्याशी फोनवर संपर्क साधून पीडित कुटुंबांना
तात्काळ संरक्षण देण्याची, आरोपीना तात्काळ अटक करण्याची व कठोर कार्यवाहीचा मागणी केली. संघटनेचे
राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी पीडित कुटुंबाला संपर्क साधून आम्ही आपल्या पाठीशी आहोत, कोरोना
लॉकडाउन संपताच आपल्या भेटीसाठी येऊ, खचू नका घाबरू नका, संपूर्ण महाराष्ट्र आपल्या पाठीशी
असल्याचे त्यांनी सांगितले. पीएसआय डोंगरे यांना मोबाईलवर संपर्क साधून पीडित कुटंबाला सर्व सहकार्य
करावे, संरक्षण द्यावे, सर्व आरोपींना अटक करावे, जातीयता ही कोरोना पेक्ष्या भयानक रोग आहे त्याचा नायनाट
करा, लाख खंडाळा घटनेमुळे आंबेडकरी जनता संतप्त आहे, या प्रकरणाकडे संपूर्ण महाराष्ट्र पाहत असून या
केसवर आमचं लक्ष असेल, आरोपींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे, जबर मारहाण झालेली असल्यामुळे त्यात
307 कलम सुद्धा लावण्यात यावं अशी मागणी करण्यात आली आहे. डोंगरे यांनी होय जातीयता हा कोरोना पेक्षा
भयानक रोग असल्याचे मान्य करत बीड जिल्ह्यात दलित अत्याचार मोठ्या प्रमाणात असल्याची खंत सुद्धा व्यक्त
केली.
ऑल इंडिया पँथर सेना गृहमंत्री अनिल देशमुख यांना आव्हान करते की, दलित अत्याचार आपल्याला मुद्धा
वाटत नसेल तर आम्हाला पँथर उभा करावी लागेल. लाख खंडाळा वैजापूर हत्याकांडाने पुरोगामी महाराष्ट्राला
काळिमा फासला आहे. कोरोनामध्ये पोलीस यंत्रणा व्यस्त आहे परन्तु दलित अत्याचारात वाढ होत चालली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या तोंडावर बाबासाहेबांच्या लेकरांना जातीवरून मारत असतील तर हे
निंदनीय आहे.
गृहमंत्र्यांनी तात्काळ या प्रकरणी भूमिका घ्यावी, पीडित कुटुंबाला संरक्षण द्यावे, पुनर्वसन करावे, प्रकरण फास्ट
गृहमंत्र्यांनी तात्काळ या प्रकरणी भूमिका घ्यावी, पीडित कुटुंबाला संरक्षण द्यावे, पुनर्वसन करावे, प्रकरण फास्ट
ट्रॅक कोर्टात नेऊन कठोर शिक्षा करावी, आणि दलित अत्याचारा विरोधात कठोर भूमिका घ्यावी, कोरोना जशी
राष्ट्रीय आपत्ती आहे तशीच दलित अत्याचार राष्ट्रीय आपत्ती घोषित केली पाहिजे.
दलित अत्याचाराविरोधात सरकारने कठोर पाऊलं न उचलल्यास ऑल इंडिया पँथर सेना लॉक डाऊन संपताच
दलित अत्याचाराविरोधात सरकारने कठोर पाऊलं न उचलल्यास ऑल इंडिया पँथर सेना लॉक डाऊन संपताच
राज्यव्यापी आंदोलन उभा करेल अशा इशारा देत आहे.
#JusticeForDalit
#GoDalitAtyacharKorona
- दिपक केदार | राष्ट्रीय अध्यक्ष, ऑल इंडिया पँथर सेना
#JusticeForDalit
#GoDalitAtyacharKorona
- दिपक केदार | राष्ट्रीय अध्यक्ष, ऑल इंडिया पँथर सेना
No comments:
Post a Comment