अजून एक खैरलांजी | बौद्ध तरुणाला माळी समाजाच्या मुलीशी प्रेम करणे पडले महाग अजून एक खैरलांजी | बौद्ध तरुणाला माळी समाजाच्या मुलीशी प्रेम करणे पडले महाग - बहुजन जागृती

बहुजन जागृती

डॉ बाबासाहेब आंबेडकर : बहुजन समाजाची राजनीतिक आणि सामाजिक चळवळ

Monday, March 16, 2020

अजून एक खैरलांजी | बौद्ध तरुणाला माळी समाजाच्या मुलीशी प्रेम करणे पडले महाग

<img src="aurangabad-vaijapur-one-more-khairlanji.jpg" alt="youths murder in interracial love affairs in aurangabad vaijapur"/>



औरंगाबाद, वैजापूर-खंडाळा : त्या दोन जीवाचे एकमेकांवर खूप प्रेम होते. जातीय मानसिकतेचा पुरेपूर अभ्यास 

असल्यामुळे ते गाव सोडून पळून गेले. त्यांचा गुन्हा हा आहे की त्यांचा जन्म मुलाचा बौद्ध समाजात तर मुलीचा 

माळी समाजात झाला आहे. पुरोगामी महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकर शिवाजींचा महाराष्ट्रात सगळे जण इतिहास 

फक्त चघळत असतात. पुरोगामी म्हणून ढोंग करत असतात. खैरलांजी महाराष्ट्राने पाहिले, नितीन आगे 

महाराष्ट्राने पाहिले आता हे लाख खंडाळा हत्याकांड सुद्धा पाहत आहोत.

प्रेम प्रकरणातून आमच्या मुलीशी लग्न करण्याची लायकी आहे का अस बोलून केली लहान भावाची हत्या...

14 मार्च 2020 च्या रात्री गावापासून दूर शेतात तपड तुरट्याच्या छपरात राहणारी पळून गेलेल्या भावाची आई, 

वडील आणि भाऊ यांच्यावर मुलीचे शस्त्रधारी नातेवाईक तुटून पडले. घराच्या बाहेर झोपलेल्या भावाला धारधार 

हत्याराने त्याचे नरड चिरल, नाक कापलं आणि आई वडिलांवर सुद्धा तुटून पडले. पळून गेलेल्या मुलाचा भाऊ 

भीमराज गायकवाड याची जगीच निर्घृण हत्या केली. त्याचे आई वडील अतिशय गंभीर जखमी आहेत. बेशुद्ध 

अवस्थतेत तिने मुलीचा बाप आणि चुलता दोघे होते म्हणून जबाब दिला. त्या दोघांना अटक केली आहे त्यांच्यावर 

अट्रोसिटीसहित हत्येचा गुन्हा दाखल झाला आहे. मुलाचा अंत्यविधी झाला तर आईवडील हॉस्पिटलमध्ये खितपत 

मृत्यूशी झुंज देत पडले आहेत. 
बौद्ध मुलगा तर माळी समाजाची तरुणी पळून गेली म्हणून एका दलित तरुणांनी आमच्या पोरीशी प्रेम कसं केलं याचा हा उद्रेक आहे. दलितांबद्दलची पुरोगामी महाराष्ट्रातली ही तालिबानी प्रतिक्रिया आहे.
सत्तेत बसलेले गेंड्याच्या कातडीचे आहेत. गृहमंत्री अनिल देशमुखला गृहमंत्री पद सांभाळता येत नाही हे आता 

सिद्ध झालं आहे. थोडी जरी लाज उरली असेल तर त्यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे. औरंगाबाद ग्रामीण 

पोलीस अधीक्षक एसपी मोक्षदा पाटील यांच्या नेतृत्वात जिल्ह्यात दलितांवर हल्ले सुरू आहेत. अंधारी, सिल्लोड, 

डोंगरगाव, लाख खंडाळा, फुलंब्री येते दलितांचे महिनाभरातले 5 हत्याकांड आहेत. त्यांचं तात्काळ निलंबन झालं 

पाहिजे. आमच्या जीवाला धोका आहे म्हणून तक्रार दिलेली असतांना हत्याकांड घडत असतील तर त्यास सर्वस्वी 

यंत्रणा जबाबदार आहे. भीमराज गायकवाड मारला गेलाय त्याला न्याय मिळालाच पाहिजे. ऑल इंडिया पँथर 

सेना या घटनेचा जाहीर निषेध करीत असून आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी करीत आहे. 

हे हत्याकांड दोघांनी नाही तर 20 जणांनी घडवलं आहे, त्यामुळे आणखी साथीदारांना तात्काळ अटक झालीच 

पाहिजे.

पळून गेलेले ते दोन जीव, प्रेम करायला निघाले होते. जातीअंताची आरोळी ठोकायला निघाले होते, नवा संसार 

थाटायला निघाले होते, नवे स्वप्न पाहण्यासाठी उडाले होते.

दलित असण्याची ही शिक्षा मनूच्या राज्यात असेल तर हे राज्य आमचं आहे का? ही व्यवस्था आमची आहे का? सडलेल्या मेंदूच्या दुर्गंधीने दम गुदमरतोय.

आई, वडील, भाऊ मारलेत त्याचे, आता त्याचाही पत्ता नाही,त्याच्या सहचरणीचा सुद्धा पत्ता नाही. त्यांचं यांनी 

काय केलंय का याचा तपास यंत्रणा करत नाही, कारण अस्तित्वात नसलेला कोरोना येते फोपावलाय, परन्तु 

कोरोनो पेक्षा भयानक असलेला जातीयवाद नावाचा रोग यांना दिसत नाही. तो व्हायरस ट्रेस होत नाही हे दुर्दैव 

आहे. ते दोघे तरी जिवन्त आहेत का? की त्यांचं सुद्धा काही यांनी केलंय याचा तपास या बिनलाज्या ऐतखाऊ 

व्यवस्थेनी लावावा, खितपत पडलेल्या गंभीर आई वडिलांना पुढच्या इलाजासाठी मुंबईला हलवावा, भीमराज 

गायकवाडला न्याय द्यावा आरोपीला फाशी द्यावा. 15 ते 20 जणांनी केलेला हा हमला आहे अटक फक्त दोघांना 

झालेली आहे. हे गाव आणि शिवसेनेचा आमदार हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत आहेत. गावातला बौद्ध 

दलित दहशतीखाली आहेत.
जीवाला धोका असल्याची तक्रार पोलीस स्टेशन ला अगोदरच गायकवाड कुटुंबांनी दिली होती...पोलिसांनी तक्रार का घेतली नाही...राज्याच्या गृहमंत्री झोपा काढत आहे का...स्थानिक पोलीस अधिकारी मोक्षदा पाटील गुन्हेगारांना पाठीशी का घालत आहेत...शिव सेनेचा स्थानिक आमदार गुन्हेगारांच्या पाठीशी का आहे...सगळी सिस्टीम उत्तर द्या...मयत भिमराज गायकवाड ला न्याय मिळालाच पाहिजे...

शरद पवार यांच्या सत्तेत दलितांचे कायम हेच हाल असणार आहेत का? खैरलांजी, खर्डा, शिर्डी यांच्याच 

कार्यकाळात घडलं आणि हे आजच प्रकरण सुद्धा यांच्याच कार्यकाळांत घडलंय. देश पातळीवर पुरोगामी 

म्हणून मिरवणारे पुरोमित्वाला काळिमा फासणाऱ्या घटना कसा काय सहन करतात? जातीयवादी मानसिकतेचा 

आणि सरकारचा जाहीर निषेध!

- दिपक केदार | ऑल इंडिया पँथर सेना

No comments:

Post a Comment