देण्यात आली. खैरलांजी पेक्षा भयानक असं हे हत्याकांड आहे. अमोल गायकवाड शेजारील माळी समाजाच्या
मुलीवर प्रेम करतो ती मुलगीही त्याच्यावर जीवापाड प्रेम करते आणि या गुंडांची मानसिकता त्यांना माहीत होती
म्हणून ते पळून गेले. त्यानंतर आमचं नाक गेलं म्हणून आरोपींनी कांगावा केला. खालच्या जातीच्या मुलाने
आमची मुलगी घेऊन गेला म्हणून त्यांचं नाक गेलं इज्जत गेली अशी मानसिकता त्यांची झाली. शांतरीत्या कट
केला, गायकवाड कुटुंब कापून टाकायचं म्हणून शांतपणे कटकारस्थान केलं. शेळ्या, गायी विकून त्यांनी पैसे
जमा केले आणि हत्यारबंद जातीचे हे उन्मादी सैतान त्या कुटुंबावर तुटून पडण्याचे षडयंत्र शिजवले. कुटुंबियाला
धमकीसुद्धा दिली.
सामूहिक रित्या अर्ध्या रात्री केली बौद्धांची कत्तल...
म्हणून दि. 13 मार्च 2020 रोजी पीडित कुटुंबांनी पोलीस निरीक्षक कुलकर्णीला तक्रार दिली की, आमच्या
जीवाला धोका आहे. पोलीस यंत्रणेनी नेहमीप्रमाणे हे प्रकरण दडपून टाकण्यासाठी त्या तक्रार अर्जाकडे लक्षच
दिलं नाही.
अखेर दि. 14 मार्च 2020 ला रात्री हे हत्यारबन्ध जातीचे सैतान या कुटुंबावर तुटून पडले. अमोलचे आई वडील
आणि भाऊ तिघे घरी होते. आई वडील बाहेर बसले होते तर, अमोल घरात गाढ झोपला होता. आईच्या डोक्यात
वार झाला, वडिलांच्या कानावर वार झाला दोघांचे हात मनगटापासून लोंबकळत होते. सपासप वार करून
जिकडे तिकडे रक्ताचा सडा केला. घरात घुसून अमोलच्या नरडीवर जबर वार करून नाकावर वार केला.
अमोल जागीच थारोळ्यात पडून तडफडत जीव सोडून दिला. आईवडिल गंभीर जखमी अवस्थतेत पळत सुटले
जवळच असलेल्या चुलत भावाच्या घरी गेले. आरोपींनी अर्ध्यापर्यंत पाठलाग केला. आईवडील वस्तीत गेले आणि
हात लोंम्बकळलेले डोक्यात वार, नाकावर वार हा सगळा रक्तरंजित खेळ 1 किलोमीटर अंतरावर चारही
बाजुनी कुनीही नाही असा किर्रर्र अंधारात झाला ती रात्र गायकवाड कुटुंबीयांसाठी मोठी संकटाची रात्र होती.
अमोल पळून गेला भीमराज मारला. जातीच्या गारध्यानी रक्ताची होळी खेळली. शांतपणे सामूहिकरीत्या
तिघांच्या हत्येचा कट केला. त्याच नाक गेलं म्हणून त्यांनी यांच्या नाकावर वार केले. घटनेचा आणखी मोठा
तपशील आहे.
आमदार, सरपंच, पोलीस पाटील सगळे चिडीचीप आहेत. आरोपी पोलीस पाटलाचे भाऊ लागतो.
आमचे प्रश्न
पोलिसांनी धमकीच्या तक्रार अर्जावर लक्ष का घातले नाही? पोलीस यंत्रणेला हे माहीत होतं का? आरोपी दोन
नाहीत तर 8 च्या वर असल्याचे सांगण्यात येत आहे मग पोलिसांनी 2 च का पकडलेत? एसपी मोक्षदा पाटील या
दलितात्याचारावर असंवेदनशील का असतात त्यांची भूमिका दलितांप्रति बोटचेपी का आहे? गृहमंत्री अनिल
देशमुख यांना गृहखाते सांभाळता येत नाही का? जातीयवादी एकदम एवढे का फोपावले आहेत? त्यांना कायदा
यंत्रणा यांची भीती नाही का? एसपी घटनास्थळी का गेल्या नाहीत? आमदार खासदार घटनास्थळी का गेले नाही?
अमोल बाळासाहेब गायकवाड मुलीसोबत पळून गेला आहे त्याची mising केस आहे मग ते आजवर का
सापडलेले नाहीत? त्यांची सुद्धा हत्या झालेली आहे का? त्यांना तरी ही पोलीस, सरकार वाचवणार आहे कि नाही.
ऑल इंडिया पँथर सेना हे प्रश्न उपस्तीत करत आहे.
![]() |
all india panther sena |
हे सरकार दलित विरोधी सरकार असून दलित अत्याचार यांना रोखता येत नाही. यांच्या कार्यकाळात
जातीयवादी भीत नाहीत याचा अर्थ सरकारची जातीय मानसिकता याला कारणीभूत आहे. येते शिवसेनेचा
आमदार आहे राज्याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहे त्यांना दलित अत्याचारावर बोलण्याची लाज वाटते का?
गृहमंत्री अनिल देशमुख सगळ्यात निष्क्रिय गृहमंत्री म्हणून त्यांची गिनीज बुकात नोंद होईल. दलितांसंदर्भातील
मुख्यमंत्र्यांची भूमिका दुटप्पी आहे.गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे. निष्क्रिय एसपी मोक्षदा पाटील
हीच तात्काळ निलंबन झालं पाहिजे, वैजापूर पोलीस स्टेशनचा पोलीस निरीक्षक कुलकर्णी व डीवायएसपी
रंजनकरला तात्काळ निलंबित करावे. आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. वैजापूर लाख हत्याकांड फास्ट
ट्रॅक कोर्टात चालवलेच पाहिजे. मुलीच्या बाप व चुलत्याला अटक झाली असून मुलीच्या भावाला व चुलत मालत
नातेवाईकाला सुद्धा अटक झाली पाहिजे. या हत्याकांडात वापरलेल्या मोटर सायकल व आणखी हल्लेखोर
तात्काळ अटक केले पाहिजे. इत्यादी मागणी ऑल इंडिया पँथर सेना करत आहे. वैजापूर पोलीस स्टेशनला तसे
निवेदन देऊन मागणी करण्यात आली आहे.
लाख गावात शोकसभा घेऊन आरोपींना कठोर शिक्षा होईपर्यंत लढायचे, वैजापूर बंदची हाक देईची, पुन्हा एकदा आंबेडकरी जनतेच्या नेतृत्वात राज्यव्यापी आंदोलन उभा करायचे व या दलित विरोधी सरकारच्या विरोधात रान पेटवण्याचा निर्धार झाला आहे. यावेळी शहिद भीमराज बाळासाहेब गायकवाड यास भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. महाराष्ट्राने हे प्रकरण गंभीरतेने घ्यावे व राज्यभर आंदोलन छेडावे. आता संघर्ष आपल्या वाट्यालाच आहे तर चला मग संघर्षाचा एल्गार उभा करूया. खैरलांजीत जे सामूहिक मॉडेल वापरले तेच मॉडेल येते वापरण्यात ले आहे.
शरद पवारांनी ही सत्ता निर्माण केली, शरद पावरांच्या सत्तेच्या कार्यकाळातच दलितांच्या कत्तली का होतात.
पुरोगामी महाराष्ट्र तालिबान महाराष्ट्र कशा काय होतो. बौद्धांचे मत मिळत नाहीत म्हणून त्यांना चिंता आहे मग
आज दलित कापला जातोय तेंव्हा त्यांची भूमिका दलितांच्या न्यायाची का नाही? का दलित अत्याचारावर हे
बोलत नाहीत. या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत..!
- दिपक केदार | अध्यक्ष, ऑल इंडिया पँथर सेना
No comments:
Post a Comment