औरंगाबाद वैजापूर येथील भीमराव गायकवाड प्रकरणी पालकमंत्र्यांकडून गंभीर दखल औरंगाबाद वैजापूर येथील भीमराव गायकवाड प्रकरणी पालकमंत्र्यांकडून गंभीर दखल - बहुजन जागृती

बहुजन जागृती

डॉ बाबासाहेब आंबेडकर : बहुजन समाजाची राजनीतिक आणि सामाजिक चळवळ

Thursday, March 19, 2020

औरंगाबाद वैजापूर येथील भीमराव गायकवाड प्रकरणी पालकमंत्र्यांकडून गंभीर दखल




औरंगाबाद वैजापूर येथील 17 वर्षीय युवक भिमराव गायकवाड (बौद्ध) यांची जातीय कारणातून निर्घुण हत्या

करण्यात आली होती याच्या तीव्र निषेध राज्यभरातून नोंदवण्यात येत असून रिपब्लिकन युवा मोर्चाने याप्रकरणी

राज्य सरकारचे लक्ष वेधून जिल्हा पालकमंत्री सुभाष देसाई यांचेशी संपर्क साधून तीन मागण्या केल्या होत्या

तीनही मागण्या मंजूर करण्यात आल्या आहेत.
हे वाचा - अजून एक खैरलांजी

ज्येष्ठ मंत्री व औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी रिपब्लिकन युवा मोर्चा चे नेते राहुल डंबाळे यांना 

दिलेल्या आश्वासनानुसार अवघ्या काही तासांमध्येच अत्याचारग्रस्त पीडित कुटुंबीयांना सुमारे आठ लाख रुपये 

मंजूर केले असून पैकी 412000/ आरटीजीएस कुटुंबीयांच्या अकाऊंटमध्ये करण्यात आले असून उर्वरित दोन 

लाख 40 हजार रुपये उद्या सकाळी त्यांचे अकाउंटमध्ये जमा होणार आहेत.

आज औरंगाबाद जिल्हा पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांना आंबेडकरी तरुण कार्यकर्त्यांनी एकत्र येत निवेदन देऊन, मोक्षदा पाटील यांच्या सह उपविभागीय पोलीस अधीक्षक गोपाळ रंजनकार यांच्यावर अट्रोसिटी ऍक्ट प्रमाणे गुन्हे नोंदवून त्यांना सहआरोपी करण्यात यावे, सिल्लोड वैजापूर हत्याकांड प्रकरणातील दोषी पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावे, आरोपी देवकर कुटुंबियांना फाशीची शिक्ष्या देण्यात यावी. जिल्ह्यात बौद्ध दलित समूह सुरक्षित नाही. पोलिसांचा धाक गुन्हेगारांना राहिला नसून सरकार ही अट्रोसिटी प्रकरणात गंभीर नाही अनिल देशमुख यांनी राजीनामा दयावा. गायकवाड कुटुंबियांना सौरक्षण देण्यात यावे.



दरम्यान सदर खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालविण्यासाठी 3 दिवसात किंबहूना त्याअगोदरच याप्रकरणी 

चार्जशीट दाखल करण्यात येईल तसेच यामध्ये कोण येथील ज्येष्ठ विधिज्ञ एडवोकेट प्रताप परदेशी यांची विशेष 

सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात येईल येईल असे लेखी आश्वासन सरकारच्या वतीने त्यांनी दिले आहे.

कळावे.

मौजे लाख, वैजापूर येथील दलित समाजाचे भीमराव गायकवाड या अल्पवयीन तरुणाच्या हत्याकांड प्रकरणाची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली असून या प्रकरणी रिपब्लिकन युवा मोर्चाच्या वतीने करण्यात आलेल्या सर्वच मागण्यांवर सकारात्मक विचार करण्यात येत असून या प्रकरणी 3 दिवस किंवा त्यापूर्वीच चार्जशीट दाखल करण्यात येईल असे स्पष्ट आश्वासन राज्याचे ज्येष्ठ मंत्री व औरंगाबादचे पालकमंत्री आमदार सुभाष देसाई यांनी रिपब्लिकन युवा मोर्चाचे पक्ष नेते राहुल डंबाळे यांना दिले आहे.

राहुल डंबाळे पक्षनेता | रिपब्लिकन युवा मोर्चा महाराष्ट्र | M-9822917119.

राहुल डंबाळे आणि सुभाष देसाई यांचं संभाषण ऐकण्यासाठी लिंकवर क्लिक करा...


No comments:

Post a Comment