मराठा आरक्षण | संभाजीराजे भोसले आणि प्रकाश आंबेडकर यांची भेट ठरणार ऐतिहासिक मराठा आरक्षण | संभाजीराजे भोसले आणि प्रकाश आंबेडकर यांची भेट ठरणार ऐतिहासिक - बहुजन जागृती

बहुजन जागृती

डॉ बाबासाहेब आंबेडकर : बहुजन समाजाची राजनीतिक आणि सामाजिक चळवळ

Friday, May 28, 2021

मराठा आरक्षण | संभाजीराजे भोसले आणि प्रकाश आंबेडकर यांची भेट ठरणार ऐतिहासिक

<img src="black-flag-on-rajgruha.jpg" alt="sambhajiraje bhosale meeting with vba president adv prakash ambedkar on maratha reservation"/>




मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाने नाकारल्याच्या पार्श्वभूमीवर खासदार  संभाजीराजे भोसले हे आज मा.मुख्यमंत्र्यांना 

भेटले,कालपरवा ते मा.शरद पवारांना भेटलेत.उद्या ते माजी मुख्यमंत्री मा देवेंद्र फडणवीस यांना भेटणार आणि 

परवाला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष मा अॅड प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांना भेटणार आहेत.

श्रीमंत संभाजी महाराजांनी वरील मान्यवरांच्या भेटीगाठी घेणे हे समजू शकतो.कारण हि सर्व मंडळी सत्तेत आहेत, 

होती.परंतु परवाला म्हणजे दि.29 मे रोजी ते मा. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकरांना भेटणार आहेत हे काही 

लोकांना अनपेक्षित असले तरी वैचारिक बुध्दीजिवींना ही भेट अत्यंत महत्वाची वाटते.






मा बाळासाहेब आंबेडकरांनी अगदी सुरुवातीपासूनच मराठा आरक्षणाचे समर्थन केले आहे. हे करत असताना 

कोपर्डी प्रकरणावरून मराठा समाजाचे ऐक्य तत्कालीन फडणवीस सरकारला धोक्याचे वाटल्याने मुद्दा डायव्हर्ट 

करण्याच्या उद्देशाने मराठा समाजाचे ऐक्य फोडण्यासाठी मराठा विरुद्ध बौद्ध असा महाराष्ट्रात वाद पेटावा , 

जातीय दंगे व्हावेत अशा व्यूहरचनेचा बाळासाहेबांनी भांडाफोड केला होता.सामंजस्याची भूमिका घेत मराठा 


समाजातील वैचारिक प्रगल्भ मान्यवरांच्या भेटीगाठी घेऊन, चर्चा करून महाराष्ट्राला एका मोठ्या संकटातून 

वाचवले होते.तत्कालीन परिस्थितीत बाळासाहेब आंबेडकर यांनी घेतलेल्या भूमिकामुळे ते अक्षरशः राजकीय 

सामाजिक दृष्टीने हिरो ठरलेले होते.


बाळासाहेब आंबेडकर हे कायद्याचे जाणकार अभ्यासक ,कायदेतज्ज्ञ आहेत, भाजप सेना,कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या 

कुटील नितीला भेदणारे,छेदणारे, उघडे पाडणारे आहेत,बदलत्या सामाजिक परिस्थितीचे आकलन करून त्याची 

व्यवस्थित मांडणी करणारे द्रष्टे समाजशास्त्रज्ञ आहेत.महाराष्ट्रातला संख्येने मोठा असणारा "गरीब" मराठा आणि 

वंचित अलुतेदार बलुतेदार यांचे सामाजिक ऐक्य घडवून त्यांनी राजकीय सत्तेची सुत्रे हातात घेऊन आपले वर्षानुवर्षे 

प्रलंबित प्रश्न स्वतः च धसास लावावेत अशी लोककल्याणकारी भूमिका घेणारे आहेत."नाही रे वर्गाचे" प्रतिनिधित्व 

कुशलतेने नेतृत्व करणारे आहेत. समाजासमाजात जातीधर्माच्या नावाखाली वितुष्ट निर्माण करून नव्हे तर 

सामाजिक सलोखा निर्माण करण्यासाठी अनेक वर्षे धडपडत असलेले विचारवंत आहेत.

हे वाचा : दुसऱ्या आंबेडकरांची भीती का वाटते


सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण नाकारल्यानंतर बाळासाहेब आंबेडकर यांनी जी भूमिका घेतली आहे ती अत्यंत 

महत्त्वाची आहे.तत्कालीन सत्ताधारी भाजप सेनेचे फडणवीस सरकार असो किंवा आताचे तीन पक्षाचे महाआघाडी 

सरकार असो या सर्वांनी मिळून मराठा आरक्षणा बाबत मराठा समाजाची अक्षरशः दिशाभूल केली म्हणण्यापेक्षा 

फसवणूक कशी केली ? याचे सविस्तर अॉपरेशनच बाळासाहेब आंबेडकरांनी केले.भविष्यात मराठा समाजाला 

आरक्षण पाहिजे असल्यास काय केले पाहिजे याचा रोडमँप सुध्दा सांगितला आहे.


संभाजी राजे भोसले हे नवखे राजकारणी असल्याने भाजपसेना,कॉंग्रेस राष्ट्रवादीने त्यांच्या नेतृत्वाला शह देण्याचीच 

भूमिका घेतली आहे.अशा परिस्थितीत संभाजी महाराजांना मराठा आरक्षणाची खरचं न्याय्य भूमिका घ्यायची 

असल्यास त्यांना वैचारिक प्रगल्भ,कायद्याचे अभ्यासक,बुध्दीजिवी बाळासाहेब आंबेडकर यांच्या 

सल्ल्याची,मार्गदर्शनाची अत्यंत आवश्यकता आहे. तत्कालीन परिस्थितीत डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती 

शाहू महाराज यांचे वैचारिक ऐक्य आणि आजच्या परिस्थितीत अॅड बाळासाहेब आंबेडकर व संभाजी महाराज 

भोसले यांचे वैचारिक ऐक्य झाल्यास महाराष्ट्राला एक नवी दिशा मिळणार आहे एवढे मात्र निश्चित.

- सुरेश रा.शिरसाट | वंचित बहुजन आघाडी


No comments:

Post a Comment