दुसऱ्या आंबेडकरांची भिती का वाटते... दुसऱ्या आंबेडकरांची भिती का वाटते... - बहुजन जागृती

बहुजन जागृती

डॉ बाबासाहेब आंबेडकर : बहुजन समाजाची राजनीतिक आणि सामाजिक चळवळ

Saturday, April 24, 2021

दुसऱ्या आंबेडकरांची भिती का वाटते...



<img src="fear-about-next-ambedkar.jpg" alt="why to fear next ambedkar"/>



पहिले आंबेडकर अर्थात डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी राणीच्या पोटातुन जन्माला येणारा " राजा" ही प्रक्रियाच 

बदलून टाकली.राजा मतपेटीतून जन्माला येऊ लागला...!!

राजाचा जन्म ज्या मतपेटीतून होतो तो मताचा अधिकार सर्वांना समान दिला, अर्थात जगातील सर्वात श्रीमंत मुकेश 

अंबानी यांच्या मताची किंमत आणि रस्त्यावर भिक मागणा-या भिका-याच्या मताची किंमत सारखीच केली...!!

राष्ट्रपती भवनातील राष्ट्रपती प्रथम दर्जाच्या नागरिकाच्या मताची किंमत आणि गावखेड्यातील अंगठा बहाद्दर 

अज्ञानी माणसाच्या मताची किंमत सारखीच केली....!!

त्यामुळे काही विशिष्ट वर्गाची जी मक्तेदारी होती ती संपवून सत्तेच्या खुर्चीत सर्वसामान्य माणसाला बसण्याची सोय 

झाली हा क्रांतिकारी बदल रक्ताचा एकही थेंब न सांडता आंबेडकरांनी घडवून आणला ....!!



भारताचा इतिहास साक्षी आहे,इथं मुठभर लोकांनी हजारो वर्षे इथल्या बहुसंख्याकांवर राज्य केले,कपटनितीचा 

अवल़ंब करीत समाजात प्रचंड अज्ञान रहावे म्हणून शिक्षण बंदी घातली आणि समाज अज्ञानी ठेवून त्याच्या 

अज्ञानाचा गैरफायदा घेत इथं विशिष्ट वर्गाचे अर्थातच ब्राम्हण्यवाद्यांचे शासन होते.....!!

त्या शासनाचा नमुना म्हणजेच "सतीची चाल"...!!

(स्त्रीला गुलाम बनविण्याचा नमुना.)

अस्पृश्याला नैसर्गिक स्त्रोतातील पाणी पिण्यास मनाई...!!

(समाजातील लढाऊ,शुर वर्गाला गुलाम बनविण्याचा नमुना.)

शुद्राला संस्कृत शिकणे आणि वाचण्याची मनाई...!!

( समाजातील बहूसंख्य वर्गाला गुलाम बनविण्याचा नमुना, शिक्षणबंदीचा नमुना.)

संत तुकाराम महाराजांच्या गाथा इंद्रायणीत का बुडविल्या त्याचा संदर्भ शोधा.)

अशाप्रकारे देशातील ओबीसी,स्त्री वर्ग, अस्पृश्य, आदिवासी,भटके विमुक्त सारेच गुलाम बनून जगतं होते त्यांची 

गुलामी संपवून त्यांनाही समतेच्या तत्वाने सवर्णांच्या सोबतं सत्तेतील निर्णय प्रक्रियेत सहभागी करण्याचा यशस्वी 

प्रयत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी केला...!!

समतेच्या तत्वाने सवर्णांच्या हातातील अमर्याद अधिकार संपले आणि सोबतच बहुसंख्यांकाची गुलामी संपली....!!

शिक्षणबंदी हटली,सर्व शिकू लागले...!!

ओबीसीला आदिवासी भटक्या विमुक्त समुहाला मोकळा श्वास घेता आला, शिकून प्रगतीची वाट मोकळी झाली...!!

सतीची चाल बंद झाली,स्त्रीला पुरुषाच्या बरोबरीने हक्क आणि अधिकार मिळाले,स्त्री दास्य संपले...!!

मात्र हा बदल मुठभर ब्राम्हण्यवादी लोकांना रुचला नाही, कारणं त्यांचे अमर्याद अधिकार कुंठीत झाले आहेत 

संपले आहेत....!!

आपले गेलेले अमर्याद अधिकार पुन्हा कसे मिळवायचे म्हणून गेली सत्तर वर्षे इथला ब्राम्हण्यवादी माणूस 

सातत्यपूर्ण रीतीने प्रयत्नशील राहिला,त्याने सोंग घेऊन तो समाजवादी झाला,तो कम्युनिस्ट झाला,तो पुरोगामी 

झाला,तो सेक्युलर झाला मात्र त्याचे एकच "लक्ष्य " होते त्याच्या समुहाचे गेलेले अधिकार परत मिळविणे...!!

त्यासाठी त्यांनी लोकशाही प्रक्रियेत अनेक भ्रष्ट मार्गाचा अवलंब करीत लोकशाही संपवून इथं घराणेशाही रुजू केली 

हा गेलेले अमर्याद अधिकार पुन्हा प्रस्थापित करण्यासाठीचा मार्ग आहे...!!

घराणेशाहीने काही कुटूंबातच,सत्तेची खुर्ची आणि निर्णय प्रक्रिया एकवटली आणि म्हणूनच मग लोकशाही ऐवजी 

एकाधिकारशाही चा अमंल सुरू झालेला आहे...!!

महत्प्रयासाने सवर्ण वर्गाने सत्तर वर्षांच्या कालावधीत घराणेशाहीच्या माध्यमातून गेलेल्या अधिकारांना पुन्हा 

प्रस्थापित करण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे....!!

पहिल्या आंबेडकरांनी आमचे अमर्याद अधिकार संपविले म्हणून आम्ही सत्तर वर्षे सोंगाळे बनुन देशातील जनतेच्या 

डोळ्यात धूळफेक करीत आमच्या समुहाचे गेलेले अधिकार काही प्रमाणात मिळविले तर हा दुसरा आंबेडकर....!!

वंचित बहूजन आघाडीचे प्रणेते अॅड बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर, घराणेशाही हटवून लोकशाहीचे सामाजिकीकरण 

करतो म्हणते आहे...!!

लोकशाहीचे सामाजिकीकरण म्हणजे तळागाळातील माणसांना सत्तेच्या खुर्चीत विराजमान करणे...!!

अॅड बाळासाहेब आंबेडकर यांनी तसा यशस्वी प्रयत्न केला आहे,...!!

एका जिल्ह्यला मॉडेल बनवून तिथं हा पर्याय यशस्वी केला आहे....!!

ज्यांना माहिती नाही त्यांनी समजून घ्यावे....!!

घराणेशाही हटवून सामान्यातील सामान्य माणसाला सत्तेच्या खुर्चीत विराजमान करण्याचा, निर्णय प्रक्रियेत सहभागी करण्याचा यशस्वी प्रयत्न बघा....!!

१) श्री.मखराम पवार (बंजारा.)

आमदार विधानसभा, आमदार, विधानपरिषद.

कॅबिनेट मंत्री म.राज्य.( घराणेशाहीचा वारसा नसणारा माणूस, बंजारा समाजाचे अकोला जिल्ह्यात प्राबल्य नसतांना 

घडविलेला एक बहूजन नेता.)

२) श्री रामदास बोडखे.(बारी समाज.)

आमदार विधानसभा आणि राज्यमंत्री.रोजगार हमी.( अतिशय गरीब कुटुंबातील व्यक्ती तथा अतिशय छोट्या जाती 

समुहाचा लोकप्रतिनिधी.घराणेशाहीचा वारसा नसणारा माणूस.)

३) डॉ.दशरथ भांडे.(कोळी समाज.)

जिल्हा परिषद अध्यक्ष, आमदार आणि कॅबिनेट मंत्री म.राज्य .( घराणेशाहीचा वारसा नसणारा माणूस, अतिशय 

गरीब कुटुंबातील व्यक्ती, अतिशय लहान जात समुहातील कार्यकर्ता.)

४)श्री.भिमराव केराम.(आदिवासी.)

आमदार विधानसभा.(अतिशय गरीब कुटुंबातील, धडपड्या तरुण, आणि घराणेशाहीचा वारसा नसणारा माणूस.)

५) श्री.वसंतराव सुर्यवंशी.( आदिवासी.)

आमदार विधानसभा.

(आदिवासी समाजातील उपेक्षित वंचित समुहातील कार्यकर्ता, घराणेशाहीचा वारसा नसणारा माणूस.)

६) श्री. हरिदास पंढरी भदे.(धनगर.)

जिल्हा परिषद सदस्य, पंस.सभापती, आमदार विधानसभा दोन वेळा.

(घराणेशाहीचा वारसा नसणारा माणूस, धनगर समाजाचे प्राबल्य नसतांना निवडून आणून सत्तेच्या खुर्चीत 

विराजमान केले.)

७) श्री.बळीराम भगवान सिरस्कार.( माळी.)

जिल्हा परिषद अध्यक्ष, आमदार विधानसभा दोन वेळा.

( अतिशय गरीब कुटुंबातील व्यक्ती, घराणेशाहीचा वारसा नसणारा माणूस,माळी जातीचे प्राबल्य नसतांना निवडून 

दिले आणि सत्तेची सूत्रे हातात दिली.)

८) प्रा.रणजित मेश्राम.(बौद्ध.)

खनिकर्म महामंडळाचे अध्यक्ष,म.राज्य.

राज्यमंत्री पदाचा दर्जा.

( धाडसी पत्रकार वर्गातील प्रतिनिधी, सुशिक्षित वर्गाला सत्तेच्या खुर्चीत विराजमान केले.)

९)श्री बालमुकुंद बिरडं.(तेली.)

पं.स.सभापती जिल्हा परिषद अध्यक्ष.

(घराणेशाहीचा वारसा नसणारा माणूस, अतिशय लहान जात समुहातील कार्यकर्ता.तेली समाजाचे प्राबल्य नसतांना 

निवडून आणून सत्तेच्या खुर्चीत विराजमान केले. तेली समाजातील महाराष्ट्रातील पहिला अध्यक्ष.)

१०) सौ.साबिया अंजुम सौदागर.( मुस्लिम, कासार.)

जिल्हा परिषद अध्यक्ष.

(अतिशय गरीब कुटुंबातील व्यक्ती, अतिशय लहान जात समुहातील व्यक्ती, महाराष्ट्रातील पहिली मुस्लिम महिला 

जिल्हा परिषद अध्यक्ष.)

११) सौ.ज्योत्सना गौतम गवई.(बौद्ध.)

अकोला महापालिका महापौर.

(अतिशय गरीब कुटुंबातील व्यक्ती, महाराष्ट्रातील पहिली महिला बौद्ध महापौर.)

१२) सौ.अनिताताई अव्वलवार.(वडार.)

नगराध्यक्षा, मुर्तिजापूर नगरपरिषद.

( अतिशय लहान जात समुहातील व्यक्ती, उपेक्षित कूटूंबातील व्यक्ती, वडार समाजातील पहिल्या नगराध्यक्षा.)

१२) सौ.कविताताई ढाळे.(पाथरवट.)

उपसभापती,पातुर पंचायत समिती.

( अतिशय गरीब कुटुंबातील व्यक्ती, अतिशय लहान जात समुहातील व्यक्ती, समाजातील पहिल्यांदा सत्तेची खुर्ची 

मिळालेली व्यक्ती.)

ही नमुन्यादाखल उदाहरणं दिली आहेत, अकोला पॅटर्न मध्ये गेल्या तीस वर्षांत अशी अनेक उदाहरणे आहेत...!!

वरील उदाहरणावरून ,गरीब, लहान जात समुहातील, उपेक्षित जातीतील आणि सर्वच धर्मातील व्यक्तींना सत्तेच्या 

खुर्चीत विराजमान करुन घराणेशाही हटविण्याचा अतिउत्तम आराखडा अॅड बाळासाहेब आंबेडकरांनी मांडला 

आहे आणि म्हणूनच मग सर्वच सत्ताधारी पक्षातील राजकारणी अॅड बाळासाहेब आंबेडकरांचा जीव तोडून विरोध 

करतात, त्यासाठी वेगवेगळ्या सबबी सांगून वेगवेगळे फंडे वापरतात...!!

मित्रांनो, सत्ताधाऱ्यांना,सवर्ण वर्गाला, घराणेशाही वाल्यांना , सत्तेच्या तुकड्यांसाठी चापलुसी करणारांना 

आंबेडकरांची भिती का वाटते ते एकदा समजून घ्या...!!

जयभीम.

- भास्कर भोजने



No comments:

Post a Comment