परभणीत...बौद्धाला नाकारलं ग्रामपंचायतच्या बोरिंगचे पाणी... परभणीत...बौद्धाला नाकारलं ग्रामपंचायतच्या बोरिंगचे पाणी... - बहुजन जागृती

बहुजन जागृती

डॉ बाबासाहेब आंबेडकर : बहुजन समाजाची राजनीतिक आणि सामाजिक चळवळ

Friday, April 30, 2021

परभणीत...बौद्धाला नाकारलं ग्रामपंचायतच्या बोरिंगचे पाणी...




<img src="parbhani-no-water-allowed-for-buddhist.jpg" alt="shivsena follower disallow water to buddhist farmer"/>





परभणी, पाथरी तालुक्यातील खरेडा गावात बौद्ध असलेले अनुसूचित जातीचे सिद्दोधन भाग्यवंत याना रमाई आवास 

योजनेतून घरकुल मिळालं आहे. घरकुल बांधण्यासाठी दलित वस्ती सुधार योजनेतून मिळालेल्या शासकीय पाणी 

बोरचं पाणी बांधकामासाठी वापरावे यासाठी स्टार्टर कडे गेले असता स्टार्टरला लॉक होते. महिला सरपंच पतीला 

कॉल केला असता तुला पाणी देणार नाही, मोटर बिघडली तर कोण भरून देईल म्हणत शिवीगाळ करण्यात 

आली. भाग्यवंतांनी त्यांना आठवण करून दिली की हा बोर आमच्या समाजासाठीच दलित वस्ती सुधार योजनेतून 

घेतलेला आहे. तुमचा यावर अधिकार नाही आमचा अधिकार आहे तात्काळ पाणी द्या एवढा बोलतो कसा, तुझी 

औकात आहे का म्हणत थांब आलोच म्हणून धमकी दिली.

या घटनेतील विडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

काही वेळातच सरपंच पती व ग्रामपंचायत सदस्य पती दोघे जातीयवादी आले आणि कंबरेच्या बेल्टनी मारहाण 

केली. दगडांनी मारहाण केली. बेदम मारहाण केली यात भाग्यवन्त जखमी झाले डोक्यात जबर मार लागला आहे. 

फासूळीला मार लागलेला आहे. मध्यस्ती करायला आलेल्या पीडिताच्या आईला आणि बायकोला सुद्धा जबर 

धक्काबुकी केली लहान लेकरांवर दगड उचलण्यात आले. दहशत करून तू गावात कसा राहतो तेच बघतो 

म्हणाले.




यात एफआयआर झालेली आहे, आरोपी आणखी अटक नाहीत. सरकार शिवसेनेची आहे हे जातीयवादी सुद्धा 

शिवसेनेचे आहेत. परभणीत शिवसनेच्या जातीय गुंडाकडून होत असलेले हल्ले निंदनीय आहे.

येते पोलीस यंत्रणा शिवसेनेची बटीक झाली आहे. ही घटना गंभीर आहे. यात एफआयआर दाखल आहे आरोपी 

अटक नाही. डीवायएसपी फोन बंद करून बसलाय, पोलीस निरीक्षक कोरन्टाईन आहे. पोलीस यंत्रणेनी 

एफआयआर दाखल करायला विलंब लावला. गावात हल्ला झाल्यावर पीडित बौद्ध विव्हळत 3 तास पडून राहिला. 

गाडी मिळू दिली नाही.

सुनियोजित सत्तेच्या आडून हा कोंडमारा सुरू झाला आहे. पोलीस आरोपीला शोधत आहेत म्हणतात आणि बौद्ध 

पीडित सिव्हिल हॉस्पिटलला ऍडमिट आहे त्याला ते तिथे आलेले दिसतात, डोळे वटारून धमकवताना दिसतात 

अशावेळी न्याय मागायचा कुठे हा प्रश्न आहे. गुन्हेगार पर्शवभूमीचा हा हल्लाखोर आहे तडीपार आरोपी आहे.

यंत्रणेच्या संशयित भूमिकेमुळे मी जिल्हाधिकाऱ्यांना कॉल केला असता त्याना परभणीतील दलित अत्याचाराच्या 

घटनांनाचा पाडा वाचून दाखवला. लवकरात लवकर जिल्हा स्तरावर बैठक बोलवून अट्रोसिटी ऍक्ट संदर्भातील 

केसेस संदर्भात ठोस भूमिका न घेतल्यास व आरोपीला अटक न झाल्यास आम्हाला या काळात सुद्धा परभणीत 

रस्त्यावर उतरावे लागेल अशा इशारा दिला आहे.

या एफआयआर मध्ये 307 व महिलांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्यामुळे तात्काळ विनयभंग 354 अंतर्गत 

कार्यवाही झाली पाहिजे. आरोपीला अटक झाली पाहिजे.

आज आमच्यासमोर आमच्या अस्तित्वाचा प्रश्न उभा राहिला आहे. सत्तेला हाताशी धरून आमचा नायनाट सुरू 

झाला आहे. काल नांदेड जिल्ह्यात रोही पिंपळगाव येते बौद्धांवर बहिष्कार टाकला आज पाथरीला बोरिंगचे पाणी 

नाकारले. स्वतंत्र भारतात आमच्यावर हे अन्याय किती काळ..!

आज ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार, महाथेरो भन्ते मुदीतानंद, नागसेन प्रतिष्ठानचे प्रमुख 

सचिन पाचपुंजे, महाराष्ट्र अध्यक्ष विनोद भोळे, निवृत्ती वाघमारे, राहुल मकासरे इत्यादी उपस्तीत होते.

#JusticeForPerbhaniBuddhist

#AllindiaPantherSena


No comments:

Post a Comment