गणेश येडके हल्ल्याचा निषेध होतोय...पण सत्तेत बसलेले बुद्धिस्ट मंत्री मात्र गप्प गणेश येडके हल्ल्याचा निषेध होतोय...पण सत्तेत बसलेले बुद्धिस्ट मंत्री मात्र गप्प - बहुजन जागृती

बहुजन जागृती

डॉ बाबासाहेब आंबेडकर : बहुजन समाजाची राजनीतिक आणि सामाजिक चळवळ

Friday, February 26, 2021

गणेश येडके हल्ल्याचा निषेध होतोय...पण सत्तेत बसलेले बुद्धिस्ट मंत्री मात्र गप्प

<img src="ganesh-yedke-attack-shini-jamga.jpg" alt="buddhist ministers quite on gqnesh yedke attack by upper castes"/>


शिवनी खामगा नांदेड : महाराष्ट्रभर शौर्यनायक गणेश येडके हल्ल्याचा निषेध होतोय त्याला वाचवण्याचा प्रयत्न 

करतोय. सत्तेत बसलेले बुद्धिस्ट मंत्री मात्र गप्प आहेत..! कारण त्यांना आपला माणूस महत्वाचा नाही तर सत्ता 

महत्वाची आहे.

• संजय बनसोडे बुद्धिस्ट आहेत, सामाजिक न्याय राज्यमंत्री आहेत या घटनेबद्दल त्यांचं ना ट्विट, ना निषेध, ना 

परिवाराचे सांत्वन काहीही नाही.

• वर्षाजी गायकवाड काँग्रेसच्या मंत्री आहेत. बुद्धिस्ट आहेत, गणेश येडके बद्दल त्यांनी आतापर्यंत काहीही भूमिका 

घेतलेली नाही. त्यांना ही घटना माहीत नाही का?

• नितीन राऊत काँग्रेसचे जेष्ठ मंत्री आहेत. अनुसूचित जाती जमाती काँग्रेस आघाडीचे ते राष्ट्रीय नेतृत्व आहेत. 



बुद्धिस्ट आहेत परन्तु बुद्धिस्ट तरुण मृत्यूशी झुंज देतोय त्याबद्दल त्यांना काहीही देणं घेणं नाही. जातीय हल्ल्याचा 

राज्यभर निषेध होतोय परन्तु त्यांचं ट्विट नाही. एरवी ते उत्तरप्रदेश मध्ये दलित अत्याचार झाला तर उत्तरप्रदेशला 

निघालेले होते त्यांना आडवलं ही वेगळी बाब आहे. त्यांना मनीषा वाल्मिकी प्रकरण दिसतं परन्तु महाराष्ट्रातला 

दलित अत्याचार दिसत नाही. ग्रहमंत्र्यांना ते याबद्दल बोलत नाहीत. अरविंद बनसोड हत्याकांड सुद्धा त्यांना आम्ही 

लक्ष्यात आणून दिलं म्हणून समजलं. आज सुद्धा शिवनी जामगा प्रकरणी त्यांची भूमिका काहीच नाही. राज्यातल्या 

अनुसूचित जाती जमातीवर त्यांनी बोलायचं नाही असं ठरवलं आहे का?

गृहमंत्री, पालकमंत्री, मुख्यमंत्री यांच्यावर जातीचे म्हणून दबाव का आणत नाहीत? जयभीम म्हणत शपथ घेतली 

परंतु जयभीमच्या रक्षणासाठी भूमिका काय आहे? तर काहीच नाही.

• ज्या दलित गायकांना आमदारकी मिळणार आहे ते सुद्धा कोणत्या कोपऱ्यात जाऊन बसलेत? कळत नाही.

हे सगळं निषेधार्य आहे.. आता तरी जागे व्हा आणि गणेश येडकेचा आवाज बुलंद करा. त्याला आपल्या फंडातून 

मदत करा. उत्तरीय इलाजासाठी एअर अंबुलन्सने मुंबईला हलवा. चांगला इलाज हीच आजची गरज आहे. जर 

संकटात तुम्ही समाजासाठी नसाल तर समाज तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही...

गणेश येडकेच्या इलाजासाठी वंचित नेत्याने केली 10000 रुपयांची मदत... शौर्यनायक गणेश एडकेचा फेसबुक वॉल बघितली असता, वंचित बहुजन आघाडीचा तो कट्टर समर्थक फुलटाईम प्रचारक होता. ही बाब वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र महासचिव अनिल जाधव यांच्या लक्ष्यात आली आणि त्यांनी तात्काळ संपर्क करून पीडित गणेश एडकेच्या इलाजासाठी 10000 रुपयांची मदत करण्याची इच्छा व्यक्त केली त्यांनी पाठवलेला निधी मिलिंद येडके यांच्या google pay नंबरवर ट्रान्सफर करण्यात आली.
अनिल जाधव सहित महाराष्ट्रभरातून जेवढी जमेल तेवढी मदत भीमसैनिक करत आहेत त्या सर्वांच्या तत्परतेला सलाम!


या हल्ल्याच्या निषेधार्त 27 फेब्रुवारी 2021"लोहा बंद" आवाहन आंबेडकरी जनतेनं केलं आहे.

ganesh-yedke-attack-shini-jamga



बौद्ध वस्तीत घुसलेल्या जातीय आतंकी विरोधात जाऊन समाजावरील घाव स्वतःच्या डोक्यात घेतला..!

शौर्यनायक गणेश येडके वाचला पाहिजे..!

त्याच्या इलाजासाठी गणेश येडके यांच्या वडिलांच्या खात्यावर जेवढी जमेल तेवढी मदत करा!

अनुसूचीत जातीचा बौद्ध तरुण तडफडतोय, मृत्यूशी झुंज देतोय. त्याला एअर अंबुलन्सने मुंबईला हिरानंदानी, 

लीलावती मध्ये इलाजासाठी हलवलं पाहिजे सगळा खर्च सरकारने केला पाहिजे. येते एका जातीचं सरकार आहे 

त्यांना माणूस नाही तर जात महत्वाची आहे.

आपला माणूस आपणच वाचूऊया..

शौर्यनायक गणेशला वाचवण्यासाठी तात्काळ आर्थिक मद्य करा.!!

खाता क्रमांक : 33539539445

खाता नाव : बापूराव मालु एडके

BAPURAO MALU EDAKE

IFSC CODE : SBIN0005929

शाखा : Loha लोहा

संपर्क : 8080643336


ganesh-yedke-attack



- दिपक केदार | राष्ट्रीय अध्यक्ष, ऑल इंडिया पँथर सेना

#AllindiapantherSena

#JusticeForGaneshYedke

#VanchitBahujanAaghadi



No comments:

Post a Comment