लेण्यांद्रीची बुद्ध लेणीवर काल्पनिक गिरिजात्मक अष्टविनायक गणपती मंदिर हे अतिक्रमण आहे. बुद्धी लेणीवर
देवी देवतांचे अतिक्रमण वाढत असून त्यातीलच हा प्रकार आहे. लोकप्रतिनिधी असलेल्या संवैधानिक पदावर
बसलेल्या खासदार अमोल कोल्हे जातीय आणि धार्मिक मानसिकतेतून अतिक्रमण कायम करण्यासाठीची भूमिका
घेणे हे अपराधिक कृत्य आहे.
पुरातत्व विभागाचं तिकीटघर हे तिथेच राहणार कारण जेवढा भाग बुद्ध लेणीचा आहे त्याला अनुसरून तिथे
तिकीटघर उभा केलं आहे. ऑल इंडिया पँथर सेनेची भूमिका आहे की, हे धार्मिक दहशतवादी प्रवृत्तीने हा
खोडसाळपणा करून लेणीवर अतिक्रमण केले आहे. स्वतःची दुकानदारी बसवण्यासाठी, राजकीय पोळी
भाजण्यासाठी, बुद्ध लेण्यांचं ऐतिहासिक अस्तित्व संपवण्यासाठी जाणीवपूर्वक मनुवादी धर्ममार्तंडांनी लेण्यांद्री बुद्ध
लेणीवर अतिक्रमण केले आहे.
ऐकेकाळी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील याने सुद्धा लेणी संपवण्याचा खेळ केला. आता खासदार
अमोल कोल्हे यांनी पुरातन विभागाला पत्र देऊन तिकीटघर हलवून लेनिवरील मंदिर अतिक्रमणाचे समर्थन केले
आहे. याचा आम्ही निषेध करतो.
हे वाचा - वंचितांनो योग्य राजकीय पर्याय निवडा
ऑल इंडिया पँथर सेना मागणी करते की, खासदार या पदावरून अतिक्रमणाचे समर्थन करणाऱ्या अमोल
कोल्हेवर कायदेशीर कार्यवाही करा. लेण्यांद्री बुद्ध लेणीवरील हे गिरिजात्मक अष्टविनायक मंदिर हे अतिक्रमण
आहे ते तात्काळ हटवावे. देशभरातील लेणीवरील देवी देवतांचे अतिक्रमण तात्काळ हटवावे. पुरातन विभागाने
हिंदुत्ववादी भूमिका सोडावी अन्यथा लेण्या बुद्ध धम्म अनुयायांच्या ताब्यात द्यावेत.
अमोल कोल्हे यांनी बुद्ध धम्म विरोधी घेतलेल्या भूमिकेचा त्यांच्या हिंदुत्ववादी धार्मिक मानसिकतेचा आम्ही निषेध
करतो. धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या कोल्हेनी महाराष्ट्रात दंगली पेटवण्याचे षडयंत्र करू नये. तात्काळ लेणीवरील
हा खेळ बंद करावा अन्यथा जयभीम च्या घोषणा देत लेण्यावरील अतिक्रमण हटवलं जाईल.
#SaveBuddhistCaves
#SaveBuddhist
- दिपक केदार | राष्ट्रीय अध्यक्ष - ऑल इंडिया पँथर सेना
#SaveBuddhist
- दिपक केदार | राष्ट्रीय अध्यक्ष - ऑल इंडिया पँथर सेना
----------------
लेणी अभ्यासक सुरज रतन जगताप यांनी खासदार अमोल कोल्हेना खपली दिलेल्या फॉरमॅट मध्ये email करा...
अमोल कोल्हे
खासदार ( शिरूर लोकसभा)
जिल्हा पुणे
विषय - कपीचीत बौद्ध लेणी( लेण्याद्री बौद्ध लेणी) मधील तिकीट बंद करण्यासाठी आपण घेतलेल्या पुढाकाराबद्दल निषेध व्यक्त करण्याबाबत व आपण दिलेले निवेदन तत्काळ मागे घेण्याबाबत
महोदय,
आपण भारतीय पुरातत्व सर्व्हेक्षण मधील माननीय डायरेक्टर जनरल यांना भेटून कापीचीत बौद्ध लेणी मधील लेणी क्रमांक ७ तुमच्या भाषेतील गणेश लेणे परंतु भारतीय पुरातत्व सर्व्हेक्षण व संपूर्ण जगा मधील अभ्यासक नुसार बौद्ध विहार( संघाराम) हे तिकीट मुक्त करण्यासाठी आपण जो पुढाकार घेत आहात याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो.
आपल्या सारख्या हुषार, अभ्यासू खासदारां कडून असे अर्धवट माहितीच्या आधारे दिलेले निवेदन नक्कीच अपेक्षित नाही. आपण दूरचित्रवाणी वर साकारलेली छत्रपति शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज मालिका पाहून त्यातील अभिनयामुळे व सत्य इतिहास जगा पुढे मांडण्याच्या आपल्या भूमिकेमुळे संपूर्ण बहुजन समाजाला आपल्या बद्दल खूप अपेक्षा वाढल्या आहेत. त्याच बरोबर संसदे मध्ये आपली भूमिका आम्हाला अभिमान वाटावी अशीच आहे. परंतु आपल्या या कृतीतून आपण या बाबतीत अभ्यास न करता दिलेले निवेदन नक्कीच हास्यास्पद आहे.
मुळातच कपीचित लेणी ही बौद्ध संस्कृतीचे एक महत्वाचे केंद्र आहे. लेणी क्रमांक ६ हे चैत्य गृह असून त्याच्या शेजारील लेणी क्रमांक ७ हे बौद्ध भिक्खु यांच्या निवास साठी कोरलेले विहार आहे. परंतु १८ व्या शतकात तिथे अतिक्रमण झाले व लेणी मधील विहार तोडून तिथे गणपतीची स्थापना वजा अतिक्रमण करण्यात आले. आणि हेच अतिक्रमण वाढवण्यासाठी किंवा तिकीट बंद करा म्हणून आपण केलेली मागणी नक्कीच निषेधार्थ आहे. बौद्ध संस्कृती संपवण्यासाठी व राष्ट्रिय संपत्तीची हानी करण्यासाठी आपण पावले उचलत आहात असे यामुळे वाटते.
मुळातच आपल्याकडून
१) बौद्ध लेणी ज्या की राष्ट्रीय संपत्ती आहेत त्या वरील अतिक्रमण काढणे व ही राष्ट्रीय संपत्ती नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना कायद्याची चपराक देणे.
२) जुन्नर परिसरातील बौद्ध लेण्या ज्या की राष्ट्रीय संपत्ती आहेत त्यांचे संवर्धन करणे.
३) प्रत्येक लेणी वर तिकीट खिडकी बसवणे. (एकट्या जुन्नर तालुक्यात अजून ९ ठिकाणे आहेत जिथे तिकीट चालू होऊ शकते.)
४) सध्याचे २५ रुपये तिकीट वाढवून १०० रुपये करणे.
५) राष्ट्रीय स्मरकांचे विद्रुपीकरण थांबवणे.
६) स्मारकावर समाज प्रतिनिधी म्हणून आपला अंकुश ठेवणे व चाललेले गैरप्रकार रोखणे.
या आणि याचबरोबर अशा अनेक पद्धतीने या संरक्षित स्मारका मधून भारतीय महसूल कसा वाढेल याच्या कडे लक्ष देणे तसेच राष्ट्रिय संपत्तीचे जतन व संवर्धन करण्याकडे आपले लक्ष असणे अपेक्षित होते.
तिकीट बंद करण्या बाबत आपली भूमिका नक्कीच संशयास्पद वाटते.
भारतीय पुरातत्व सर्वेक्षण इथे असल्यामुळे या परिसराचे संरक्षण होत आहे. याच तिकीट विक्रीतून जो महसूल मिळतो तो सर्व संरक्षीत स्मारकांच्या संवर्धन व देखभालीसाठी खर्च केला जातो. Asi चे अस्तित्व असल्यामुळे ही स्मारके जागतीक स्तरावर नावाजली आहेत. त्या मुळे asi च्या चांगल्या भूमिकेला आपण विरोध करत आहात.
या बाबतीत आपण दिलेले निवेदन तत्काळ मागे घ्यावे व जुन्नर परिसरातील प्राचीन ऐतिहासिक ठेवा संरक्षीत रहण्याबरोबरच जतन व संवर्धन करण्याबाबत आपण आग्रही भूमिका मांडावी.
आपला नम्र
सूरज रतन जगताप
९३२०२१३४१४
अशा पद्धतीचे पत्र सर्वांनी खालील e mail ID वर पाठवावे. जेणे करून asi ला आपला विरोध स्पष्ट होईल..
अमोल कोल्हे
Dramolkolhe80@gmail.com
Amol.kolhe@sansad.nic.in ,
DG ASI
DG.asi@gov.in
JDG MONUMENTS
Jdgmon.asi@gmail.com
जुन्नर सब सर्कल
Subcirclejun.asi@gmail.com
मुंबई सर्कल
Circlemumbai.asi@gmail.com
RD west
Rdwest.asi@gmail.com
मुख्यमंत्री
Cmo@maharshtra.gov.in
------------------------------------------------------------
किमान एका दिवसात ५००० मेल तरी गेले पाहिजेत
No comments:
Post a Comment