वंचितांनो योग्य राजकीय पर्याय निवडा... वंचितांनो योग्य राजकीय पर्याय निवडा... - बहुजन जागृती

बहुजन जागृती

डॉ बाबासाहेब आंबेडकर : बहुजन समाजाची राजनीतिक आणि सामाजिक चळवळ

Saturday, February 20, 2021

वंचितांनो योग्य राजकीय पर्याय निवडा...




<img src="vote-for-vba.jpg" alt="ambedkarite peoples select correct political party"/>





सत्तर वर्षात सांसदीय लोकशाहीचे घराणेशाहीत रुपांतरण झाले आहे,त्याचा परिणाम असा झाला की,प्रत्येक 

जिल्ह्यात वा तालुका स्तरावर एक घराणं राजकारणात प्रस्थापित झालं आहे, त्या घराण्याच्या हातात सत्ता एकवटली 

आहे त्यामुळे सत्तेपासून, संधी पासुन आणि निर्णय प्रक्रियेतुन समाजातील मोठा वर्ग वंचित राहिला आहे...!!

वंचित समुह संख्येने खुप मोठा आहे मात्र त्याला वेगवेगळ्या विशेषणांनी संबोधून विभाजीत केले 

आहे,ऊदा..अलुतेदार, बलुतेदार ही त्यांची खरी ओळख मात्र त्याला, कुंभार, लोहार,शिंपी, सुतार,गवंडी, 

मातंग,धोबी,न्हावी, कुणबी,शेणवी,तेली, तांबोळी,बेलदार अशा अनेक जातीत विभागून त्याला बहूजना ऐवजी 

अल्पजन बनविले एकमेकांना विरुद्ध ऊभे केले हे मनुवादी षढयंत्र आहे परिणामी तो जातीच्या कोंडवाड्यात 

अडकून सत्तेपासून वंचित राहिला आहे...!!

जसं छोट्या ओबीसी बांधवांना जातीच्या कोंडवाड्यात अडकविले तसेच भटके विमुक्त आणि आदिवासी यांनाही, 

कैकाडी, वडार,पाथरवट, नंदीबैल वाले, वासुदेव,मदारी, डोंबारी, मेहतर, पारधी, फासेपारधी, गारुडी ,मांग गारुडी 

अशा अनेक जातीत विभागून त्यांना अल्पजन बनविले आणि मोठ्या जातीच्या आणि धनवान लोकांनी लोकशाहीचे 

सामाजिकीकरण होऊच दिले नाही,ती घराणेशाहीत बंदिस्त केली...!!

सत्तर वर्षाचा अनुभव साक्षी आहे इथं छोट्या ओबीसी, आदिवासी भटक्या विमुक्त समुहाला सत्तेची खुर्ची मिळाली 

नाही...!!

सत्तेशिवाय विकास शक्य नाही, समाजातील दुर्बल घटकांना सक्षम करण्यासाठी सत्तेची खुर्ची आणि राजकीय 

निर्णय घेण्याची संधी मिळणे आवश्यक आहे...!!

सत्तेत जाण्यासाठी राजकीय पक्ष आवश्यक आहे, आम्हा वंचितांचा राजकीय पर्याय कोणता...??

या दिशेने विचार करुन आता राजकिय पर्याय अर्थात राजकीय पक्ष निवडून आपणं सत्तेत सहभागी झालं पाहिजे...!!

सत्तर वर्षाचा अनुभव काय सांगतो...??

कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, भाजप आणि शिवसेना या प्रस्थापित राजकीय पक्षांनी छोट्या ओबीसी आदिवासी दलित 

मुस्लिम समुहाची मते घेतलीं मात्र या समुहाला सत्तेची खुर्ची दिली नाही, आरक्षणाच्या नावाखाली ज्यांना संधी दिली 

त्यांचीही घराणेशाही निर्माण केली आहे...!!

भाजप हा मनुवादी विचारांचा आणि ब्राम्हणी वर्चस्वाचा पक्ष आहे इथं छोट्या ओबीसी समुहाला मतदार म्हणून 

राबवून घेतले जाते त्याला सत्तेत बसण्याची संधी दिली जातं नाही हे वास्तव आहे, छोट्या ओबीसी बांधवांना ज्या 

गोपीनाथ मुंडे साहेबांनी भाजपशी जोडले त्या गोपीनाथ मुंडे साहेबांनांच सत्तेतील महत्त्वाचे पद देण्याची वेळ आली 

तेव्हा खड्या सारखे बाजुला सारले हा अनुभव आहे...!!

कॉंग्रेस हा पक्ष गेल्या सत्तर वर्षांपासून सतत सत्तेत राहिला आहे, कॉग्रेस पक्षाने छोट्या ओबीसी आदिवासी दलित 

मुस्लिम समुहाची मते घेतलीं आणि घराणेशाही मजबुत केली हा अनुभव आहे म्हणून कॉग्रेस हा पक्ष वंचितांचा होऊ 

शकत नाही...!!

शिवसेना या पक्षाने हिंदुत्ववादी धोरणं अंगिकारत धर्माच्या नावाखाली सर्वच हिंदू धर्मातील जातीच्या मतदारांची मतें 

घेतलीं मात्र अलुतेदार बलुतेदार तथा छोट्या ओबीसी बांधवांना सत्तेची खुर्ची दिली नाही तर कॉग्रेस, भाजप प्रमाणेच 

घराणेशाही मजबुत केली मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरे आणि त्यांचा मुलगा आदित्य ठाकरे हाही एकाच मंत्रीमंडळात 

मंत्री आहे हे एकच घराणेशाहीचे उदाहरणं पुरेसे आहे हा अनुभव आहे...!!

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल काय सांगावे...??

शरद पवार साहेब,त्यांची मुलगी सुप्रिया सुळे, त्यांचा पुतण्या अजित पवार, अजित पवारांचा मुलगा पार्थ पवार, 

अजित पवारांचा पुतण्या रोहित पवार अशी तिसरी पिढी सत्ता उपभोगते आहे, घराणेशाहीचा वारसा चालविते 

आहे...!!

वंचितांनो तुम्हाला  राजकीय पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करायचे असेल तर या चारही प्रस्थापित राजकीय पक्षांत 

काम करुन दहा पंधरा वर्षांनंतर पश्र्चाताप करण्यापेक्षा आपल्या हक्काच्या वंचित बहूजन आघाडीत काम करा 

आणि स्वत: सत्तेच्या खुर्चीत विराजमान व्हा...!!

जर योग्य वेळी तुला  तिकिट मिळाले नाही ,संधी मिळाली नाही वा काही अपरिहार्य कारणास्तव संधी हुकली तरीही 

तुझा कोणतातरी वंचित भाऊबंद हा सत्तेतील खुर्चीवर विराजमान झालेला असेल म्हणून तुला पश्र्चाताप करायची 

वेळ येणार नाही कारण वंचित समुहाच्या हितासाठीच तुझे मत आणि तुझे कष्ट कामी लागलेले असतील...!!

प्रस्थापित राजकीय पक्षात तुला राबवून घेतले जाते, तुझ्या समुहाच्या मतांवर सत्ता मिळवून  सत्तेचा मलिदा मात्र 

घराणेशाही वाले लाटतात ही बदमाशी बंद करायची असेल तर वंचित बहूजन आघाडी हाच आपला सर्वच वंचित 

बहूजन बांधवांचा राजकीय पर्याय आहे हे लक्षात घ्यावे...!!

जो जो छोटा ओबीसी, आदिवासी,भटका विमुक्त, दलित बांधव राजकीय कार्यकर्ता म्हणून काम करीत असेल त्या 

प्रत्येकाने,आपली फसवणूक तर होतं नाही ना..??

अशी मनाशी विचारणा करुन

राजकीय प्लॅटफार्म वरील भुमिकेचे चिंतन मनन करुन पुढिल वाटचाल करावी ही नम्र विनंती...!!

बहुजन सारें एक होऊ...!!

सत्ता आपल्या हाती घेऊ...!!

जयभीम.

- भास्कर भोजने



No comments:

Post a Comment