जितेंद्र राऊत याच्यावरील शिवभक्तांनी केलेली कारवाई योग्य... पण... जितेंद्र राऊत याच्यावरील शिवभक्तांनी केलेली कारवाई योग्य... पण... - बहुजन जागृती

बहुजन जागृती

डॉ बाबासाहेब आंबेडकर : बहुजन समाजाची राजनीतिक आणि सामाजिक चळवळ

Monday, March 23, 2020

जितेंद्र राऊत याच्यावरील शिवभक्तांनी केलेली कारवाई योग्य... पण...

<img src="jitendra-raut-vs-chhatrapati-shivaji-maharaj-followers.jpg" alt="jitendra raut hit by shivaji maharaj followers"/>



जितेंद्र राऊत हा मुळात मूर्ख माणूस,मंद बुद्धीचा ज्याला किमान अक्कल नव्हती किंवा साधा मेंदू नव्हता.की 

आपण कुणाचा विरोध करतोय याच साधं भान नसलेला हरामी बिनडोक अडानचोट माथेफिऱ्या माणूस हा शंभर 

टक्के मार खाणार हे ठरलेलं होतं.पण साल्याने स्वतः मार खात अख्ख्या समाजाला नाहक नजरेत 

आणलं,त्याच्यासारख्याच्या आगाऊपणामुळे संपूर्ण समाजाला आई बहिणींवरून शिवीगाळ सहन करावी 

लागली.बुद्ध,रमाई, बाबासाहेबांविषयी अत्यंत हिणकस घाणेरडे उच्चार शिवभक्तांनी केले.आणि सरंजामी 

संस्कार दाखवले.

तळातल्या गोरगरीब समाजावर अन्याय करा किंवा कोण करत असेल तर गपगुमान बघत बसा.हा कसला तुमचा शिवधर्म?

जो एडझवा लायकी नसताना निवडणुकीला उभा रहातो,आरक्षण संपवणेची मागणी करतो,बाबासाहेबाना घटना 

लिहलेच श्रेय देत नाही,बायकोला निवडणुकीला उभी करून रेशनवर सरसकट दारू मिळाली पाहिजे याची 

मागणी जाहीरनाम्यात करतो,जीवे मारण्याची धमकी दिली जात असतानाही फेसबुक वरून सतत शिवाजी 

महाराजांविषयी एकेरी बोलून अवमान करतो ते ही औरंगजेबाची तरफदारी करत,इतका कमभेजा अक्कल शून्य 

मूर्ख माणूस हा मार खाण्याच्याच लायकीचा आहे.

त्याला मारले याचे निश्चितच अभिनंदन.. यात तीळमात्र शँका नाही.मात्र त्याला मारल्याचा जल्लोष काही जण असा 

काय करत आहेत की त्याला मारून फार मोठा तिर मारला आहे.

एका मनोरुग्ण,व्यसनी,बुद्धीहीन,वैफल्यग्रस्त,ताट बोड्याचा,ज्याची

माणसात व समाजात गणती नाही असा नासका,ज्या समाजाचे तो नाव घेतो व जयभीम बोलतो त्या समाजानेही 

त्याला बाहेर फेकलेला.अश्या मेल्याहून मेलेल्या, कामातून गेलेल्या माणसाला मारून काय मोठा आनंद मिळाला 

असेल त्यांना कुणास ठाऊक.

अरे मारण्याची एवढीच खुमखुमी आहे तर ज्यांनी शिवाजी महाराजांचा खराखुरा अपमान केला.ज्यांनी तहहयात 

शिवाजींचा खरा इतिहास न सांगता चुकीचा इतिहास सांगितला,माँ जिजाऊ, शंभुराजे यांचे बाबत खोट्या आणि 

घाणेरड्या टिपण्या व गलिच्छ आरोप केलेत.राजर्षी शाहूची चुकीची प्रतिमा उभी करत,अश्लील शेरेबाजी करत 

टिंगल टवाळकी केली.

शिवराज्यभिषेकाला विरोध त्याचे समर्थन करत आलेत,शंभूराजेंना बदनाम केले व त्यांच्या खुनास जे जबाबदार 

होते असे खरे मारेकरी व जे विचारांचे शत्रू आहेत.ज्यांनी धोकाधाडी करून शिवशाही पालथी घातली व मनुस्मृती 

समर्थक पेशवाई आणून शिवराज्य बळकावले.

त्या श्रीपाद छिंदम ने फोनवर अर्वाच्च बोलून शिवरायांचा अपमान केला.ज्या बा.मु.पुरंदरे ने खोटी माहिती जेम्स 

लेन ला पुरवली व जिजाऊ चा अवमान केला.ज्या नाटककारांनी व इतिहासकारांनी शंभुराजेच्या बाबतीत खोटा 

इतिहास व बदफैली राजा म्हणून चित्र रंगवून रेखाटून बदनाम केले.

या उलट छ.शिवाजी महाराजांच्या व शँभु राजेंचे संकल्पनेतील सर्व जात धर्मीयांना एकत्रित करून स्वराज्य 

स्थापन करणेचे स्वप्न होते ते त्यांचे स्वप्न बाबासाहेबानी घटनेत आणून पूर्ण केले,व समानतेचा पुरस्कार करत 

सर्वाना सामावून घेतले,त्या घटनेची निंदा करणारे प्रसंगी शिवाजी महाराजांच्या स्वराज्याला अर्थात 

बाबासाहेबांच्या संविधानाला विरोध करणारे,असे अनेक आहेत.ज्यांच्या डोक्यात जातीचे मनुवादी किडे आहेत जे 

जात धर्मीयात तेढ निर्माण करून जातीयवाद निर्माण करत आहेत असले भिडे तुम्हाला कसे दिसत 

नाहीत,तुम्हाला ते माहीत आहेत पण तुमची त्यांना मारायची त्यांना भिडायची हिम्मत नाही.

मेलेल्याना मारून मर्दुमकी गाजवायच हे कोणतं शॉर्य कार्य किंवा कसला शिवपराक्रम.

शिवरायांच्या संस्कारात खरच आपण वाढलोय असे मानत असो किंवा स्वतःला भक्त म्हणून मिरवत असू तर 

शिवरायांची शिकवण आचरणात आणताना या गोष्टीचे भान असायला हवे आपल्या पेक्षा दुबळ्या समाजावर 

सतत दहशत निर्माण व हल्ले न करता त्यांचे संरक्षण करायला पाहिजे.
हे वाचा - अजून एक खरलांजी । वैजापूर औरंगाबाद


आंतरजातीय विवाह केला म्हणून मुलीच्या कुटुंबीयांनी झुंडीने जाऊन बौद्ध कुटुंबावर हल्ला केला व मुलाच्या 

भावाचे शीर कापून हत्त्या केली व मुलाचे आई वडिलांवर वार करून गँभीर जखमी केले आणि असे प्रकार 

शिवरायांच्या महाराष्ट्रात होत असताना कोण ही शिवभक्त किंवा शिवरायांचा वंशज जातीय अत्याचाराच्या 

विरोधात एक आवक्षर काढत नाही.अरे तुम्ही शिवशाहीचे वाहक आहात ना.मग तुमच्या राज्यात दुबळ्या 

अल्पसंख्य बौद्ध समाजातील एका कुटूंबावर जातीवादी हल्ला होतो माणसाचे मुडदे पाडले जातात आणि तुम्ही 

महाराजांचे अनुयायी मजा बघत रहाता ही महाराजांची शिकवण होती का?

तळातल्या गोरगरीब समाजावर अन्याय करा किंवा कोण करत असेल तर गपगुमान बघत बसा.हा कसला तुमचा 

शिवधर्म? आणि अपमान म्हणाल तर क्वचितच एखादा माथेफिरू महाराजांचे विषयी अपशब्द बोलनेचे धाडस 

करतो मात्र तुमचे जे लोक स्वतःला शिवभक्त म्हणवून घेणारे बाबासाहेबाना इतक्या खालच्या पातळीवर जाऊन 

शिवीगाळ करतात,अर्वाच्च बोलून अपमान करतात,भिकार्डी,भीमटी बोलून आई बहिणीचा व समस्थ समाजाचा 

उद्धार करतात त्याच काय? आरक्षणावरून सतत फुकटे,बोलत टोमणे मारतात.किमान याच तरी त्यांना भान 

असायला हवं की याच बाबासाहेबांच्या संविधानिक तरतुदी व लोकशाही अधिकारामुळे त्यांचा समाजही स्वतंत्र 

आरक्षण मिळवू शकला.

तेंव्हा वंशजानो,जातीच विष जे तुमच्या समाजातील तरुण मुलांच्या मेंदूत ज्यांनी कुणी रुजवलय व कालवलय 

त्यांना तुम्ही ओळखा,जातीमुक्त भारत घडविणेच शिवरायांचे जे स्वप्न होते ते तुम्ही तुमच्या समाजाचे प्रबोधन 

करून त्यांना सर्व जातीधर्मीयांचा प्यारा शिवाजी सांगा.उगाच जात अभिनवेशाची माथी भडकवून जातीय युद्धाला 

खतपाणी घालू नका.

बुद्ध व बाबासाहेब यांचा जर कोण विकृत अवमान करत असेल त्यांची विटंबना करत असेल तर कोण सहन 

करणार नाही,तुमच्या जातीवादी किड्याना,भिडयाच्या अवलादिना तुम्ही ही समजून सांगा.जितेंद्र राऊत सारख्या 

दोन्ही कडच्या अवलादिना बदडूनच नाही तर ठेचून काढायला पाहिजे.फक्त आपला तो बाब्या आणि दुसऱ्याच ते 

कार्ट असा भेदभाव व्हायला नकोय.

सर्व जात समाजातील महामानवांचा आदर सर्वांनीच करायला पाहिजे ते कोणत्याही जातीचे असले तरी त्यांचे 

देशासाठीचे योगदान व कार्य याचा सर्वानाच अभिमान असायला पाहिजे महापुरुषाना विशिष्ट एका जातीत 

बंदिस्त न करता केवळ मानवतावादी महान माणसे म्हणून त्यांचा आदर करायला पाहिजे.त्यांच्या 

कृतींचा,विचारांचा, सनमार्गाचा व त्यांच्या अनुनयांचा देखील सन्मान मनात असायला पाहिजे. किमान एवढं जरी 

भान प्रत्येकाने आपापल्या समाजात आणलं व स्वतः बाळगले तरी माणूस म्हणून एक जात होऊन बाबासाहेब 

आंबेडकर किंवा छ.शिवाजी महाराजांनी माणसाला केंद्रीभूत ठेवून त्यांच्या कल्याणाचा केलेला विचार सार्थकी 

लागेल.व मनुवाद्यांचे माणसात भेद करणारे मनसुभे उधळता येतील.

तेंव्हा कृपया आपआपले समाजात जातीअंताचे प्रबोधन करुया,व कोणत्याही समाजातल्या 

घातक,हिंसक,विक्षिप्त,विकृत मनोवृत्तीला सर्वांनीच मिळून बंधुत्वाचे नात्याने बंदोबस्त करुया..

- शाहीर दिपकभाई गोठणेकर

No comments:

Post a Comment