लोकसभा,विधानसभा आणि ग्रामसभेच्या निवडणुकीनंतर झालेल्या पराभवाचे आकलन करीत पक्षाने नवीन
संघटना बांधण्यास सुरुवात केली.राज्यात नवीन पदाधिकारी नेमण्यात आले.त्यात मुंबईसह राज्यातील
पदाधिकाऱ्यांची फेरनियुक्ती करण्यात आली.त्यामुळे कामचुकार, बंडखोरी निवडणुकीत काम न करणारे अनेक
पदाधिकारी आपोआपच बाजूला झाले.त्यामुळे नव्या जोमाने येणाऱ्या कार्यकर्त्यांना काम करण्यासाठी मोठा वाव
मिळाला.आमदार, ग्रामसेवक,जिल्हाध्यक्ष, झेडपी अध्यक्ष अशी अनेक पदे भूषवणारे पदाधिकारी आता वेगाने
पक्षाचे वाढते स्वरूप पाहून त्यांच्या पोटात दुखू लागले. त्यांची किंमत आता पक्षात कमी होत असल्याचे पाहून
त्यांनी नवीन पदाधिकाऱ्यांच्या कामात ढवळाढवळ करण्यास सुरुवात केली. ही बाब वंचित बहुजन आघाडीचे
अध्यक्ष बाळासाहेबाच्या लक्षात येताच अशा पदाधिकाऱ्यांना सज्जड दम दिला. त्यामुळे अपमानित झालेल्या
पदाधिकाऱ्यांना मूग गिळून गप्प बसण्याशिवाय काहीच पर्याय राहिला नाही. इकडे आड तिकडे विहीर अशी
अवस्था या पदाधिकाऱ्यांची होऊ लागली आणि त्यामुळेच अकोला सारख्या ठिकाणी जो बाळासाहेबांचा गड
आहे. अशा ठिकाणी त्यांना धक्का देण्याचा प्रयत्न पदाधिकाऱ्यांनी केला.आणि त्यांनी सामूहिक राजीनामे देऊन
पक्ष सोडला.
हे वाचा - चलो जंतर मंतर । ४ मार्च प्रकाश आंबेडकरांची हाक
आता असे पदाधिकारी गेल्याने परिणाम पक्षावर होणार नाही. कारण आता नव्या जोमाने येणारा
तरुण वर्ग,तरुण कार्यकर्ते, उत्साही कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर पक्षात येऊ लागले आहेत.पक्ष राज्यातच नव्हे तर
देशाच्या विविध भागात जाऊन कार्य करू लागला आहे.पक्ष संघटना जोर धरू लागली. राज्यात करण्यात
आलेला बंद,आंदोलने यशस्वी झाल्याने पक्ष वाढतोय हेच याचे उदाहरण आहे.
शिवाय असे पदाधिकारी गेल्याने पक्षाला कुठल्या ही प्रकारचा धक्का लागलेला नाही तो आणखीन मजबुतीने उभा राहिला आहे. उलट असे पदाधिकारी गेल्याने काम करणाऱ्या नवीन कार्यकर्त्यांना मोठा वाव मिळाला आहे.
लोकसभा आणि विधानसभेत झालेल्या पराभवानंतर भारिप बहुजन महासंघाचे विसर्जन करून वंचित बहुजन
आघाडीत त्याचे विलीनीकरण केले.त्यामुळे भारिप बहुजन महासंघाचे जे कोणी कार्यकर्ते, पदाधिकारी होते,
त्यांना वंचित बहुजन आघाडीत नव्याने जबाबदाऱ्या देण्याचे काम बाळासाहेबांनी केले. प्रामाणिकपणा, मेहनत
करण्याची कसोटी पाहूनच बाळासाहेबांनी अनेक जुन्या पदाधिकाऱ्यांना नव्याने जबाबदाऱ्या दिल्या.जे
पदाधिकारी पक्षात राहून पक्षविरोधी कारवाई करत होते असे पदाधिकारी आपोआपच बाजूला झाले. या
पदाधिकाऱ्यांनी अनेक पदे भूषवली होती. पक्षाच्या नावावर मोठे झाले होते.मात्र आता त्यांचे अधिकार कमी होत
गेल्याने ते नाराज होऊ लागले.कारण प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अनेक पदाधिकाऱ्यांना पक्षाने मोठ्या
जबाबदाऱ्या दिल्याने त्यांच्या पोटात पोटात दुखू लागले.कानामागून येऊन तिखट झाल्यासारखा हा प्रकार होऊ
लागला आणि म्हणूनच अकोल्यात सामूहिक राजीनामे देऊन हे पदाधिकारी बाहेर पडले.जाताना केवळ हे
एकटेच गेलेत त्यांच्यामागे कुठलाही कार्यकर्ता गेलेला नाही.आजही त्यांनी बाळासाहेबांवर विश्वास दाखवलेला
आहे.
हे वाचा - अनाडी आमदार । प्रणिता शिंदे । वंचितांची प्रतिक्रिया
ज्या पदाधिकाऱ्यांनी पक्ष सोडला त्यांना बाळासाहेबांचे निर्णय,विचार चुकीचे वाटू लागले, मात्र
बाळासाहेबांमुळेच अश्या लोकांची समाजात एक ओळख निर्माण झाली होती.रस्त्यावरून उचलून अशा लोकांना बाळासाहेबांनी शीर्षस्थानी ठेवले होते.मात्र त्याची परतफेड त्यांनी अशी करावी हे कोणालाही न पटण्यासारखे आहे.
निवडणूका झाल्यानंतर त्यांनी राजीनामे दिले आहेत.बाळासाहेबांचे विचार त्यांना चुकीचे वाटत होते तर
त्यांनी आमदार आणि खासदारकीचे तिकीट घेऊन निवडणूक लढायलाच नको होती.मात्र पराभव झाल्यानंतर
आता पक्षाचे निर्णय त्यांना अयोग्य वाटू लागले आहेत.अशा अविचारी लोकांनी पक्ष सोडून गेलेलेच बरे, कारण
असे कार्यकर्ते,पदाधिकारी पक्षाला नेहमी घातकच असतात. म्हणूनच ते स्वतःहून गेले ते चांगले असते.
राज्यात आणि देशात पक्ष वाढतोय, संघटना वाढतेय नव्याने बांधणी झालेल्या वंचित बहुजन आघाडीत अनेक
नवीन कार्यकर्ते सामील होत आहेत.राज्यात एन. आर.सी.तसेच सी.ए.ए.विरोधात झालेले आंदोलन यशस्वी झाले.
हि वंचित बहुजन आघाडीची ताकद आहे.
हे वाचा - महाराष्ट्रात गुलाल नीळ चा प्रयोग अशक्य
त्यामुळे बाहेर जाणाऱ्या पदाधिकाऱ्यांना वाटत असेल की पक्ष सोडल्याने बाळासाहेबांना मोठा धक्का बसेल
किंवा पक्षाचे मोठे नुकसान होईल तर तो त्यांचा समज चुकीचा आहे.त्यांची जागा घेण्यासाठी अनेक पदाधिकारी
उत्सुक आहेत.त्यामुळे पक्षाला कुठल्याही प्रकारचा धक्का बसलेला नाही.या वर्षात अनेक ठिकाणी निवडणूका
होणार आहेत. त्यामुळे नव्याने पक्षात आलेल्या किंवा प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अनुभवी कार्यकर्त्यांना,
पदाधिकाऱ्यांना पक्ष त्यांच्या मेहनतीचे फळ देईलच.
येत्या 4 मार्च रोजी एन.आर.सी. आणि सी.ए.ए.तसेच एन.पी.आर. विरोधात बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली
दिल्लीच्या जंतरमंतरवर जाहीर आंदोलन करण्यात येणार आहे.लाखोंच्या संख्येने कार्यकर्ते या आंदोलनाला
उपस्थित राहण्यासाठी येणार आहेत.त्यामुळे बाळासाहेब खऱ्या अर्थाने राष्ट्रीय नेतृत्व करताना पाहायला मिळेल.
बाळासाहेबांना यापूर्वीच अनेक राज्यातील मुख्यमंत्र्यांनी,सामाजिक,राजकीय संघटनांनी पाठिंबा दिला
आहे.म्हणचेच बाळासाहेबांचे प्रस्थ दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे बाळासाहेबांना धक्का देणारे स्वतः धक्के
खात फिरणार आहेत.
ज्याना पक्षाने मोठे केले त्यांच्या बाहेर जाण्याने पक्षावर काही एक परिणाम होणार नाही.
राज्यात भाजपाची सत्ता आल्यानंतर सत्तेच्या मोहापायी अनेक नेते भाजपात सामील झाले. मात्र भाजपची जादू
ओसरू लागल्याने आणि राज्यात भाजपची सत्ता गेल्याने हिच नेतेमंडळी स्वगृही परतू लागले. मात्र त्यांचे स्वगृही
येणारे दार बंद झाल्याने आता त्यांची अवस्था घर का ना घाट की अशी झाली आहे.हिच अवस्था बाळासाहेबांना
सोडून जाणाऱ्या स्वार्थी पदाधिकाऱ्यांची होऊ नये हीच अपेक्षा.
- सुरेश नंदिरे | प्रसिद्धी प्रमुख | वंचित बहुजन आघाडी
- सुरेश नंदिरे | प्रसिद्धी प्रमुख | वंचित बहुजन आघाडी
No comments:
Post a Comment