अनाड़ी आमदार | प्रणितीताई शिंदे यांच्या वक्तव्यावर वंचितांची प्रस्तिक्रिया अनाड़ी आमदार | प्रणितीताई शिंदे यांच्या वक्तव्यावर वंचितांची प्रस्तिक्रिया - बहुजन जागृती

बहुजन जागृती

डॉ बाबासाहेब आंबेडकर : बहुजन समाजाची राजनीतिक आणि सामाजिक चळवळ

Friday, February 21, 2020

अनाड़ी आमदार | प्रणितीताई शिंदे यांच्या वक्तव्यावर वंचितांची प्रस्तिक्रिया

<img src="praniti-shinde-questions-ambedkars.jpg" alt="vanchit bahujan aghadi replies to praniti shinde statement"/>


काल परवा एका जिल्हात आयोजित (नुसत्या) धरणे आंदोलनात खांग्रैसी आमदार प्रणितीताई यांनी आपल्या 

प्रचंड राजकीय अज्ञानाचे जाहीर प्रदर्शन केले.वडिलांची राजकीय बेरोजगारी आणि स्वतः मंत्री पदाच्या 

हुलकावणी मुळे उद्विग्न मनस्थितीत असलेल्या प्रणितीताई बेताल वक्तव्य करत्या झाल्या.त्यांचे वक्तव्य बालिश 

आणि हास्यास्पद असले तरी त्यामागील मानसिकता समजून घेतली पाहीजे.

एक तर शिंदे साहेब सद्या केंद्रीय राजकारणात साईड ट्रैक आहेत.खासदार नाहीत किंवा ज्याची चर्चा होती ते 

राष्ट्रीय अध्यक्ष पद देखील त्यांचे वडीलांना मिळू शकले नाही.विधानसभा उमेदवारी करीता चक्क भाजपाच्या 

दारात उभे रहाण्याची नामुष्की त्यांचे कुटुंबावर काँग्रेसने आणलेली.कसेबसे त्या आमदार झाल्या.

खरंतर त्यांनी आधी ह्या प्रश्नांची उत्तरे दिली पाहिजे की, एनआरसी, सीएए व एनपीआर कायदा राज्यसभेत मंजूर 

कसा झाला? राज्यसभेत भाजप कडे बहूमत नसताना हे विधेयक पारित झाले तेंव्हा काँग्रेस व राष्ट्रवादी ने 

विधेयकाचे समर्थन केले होते, विरोध केला होता की वॉकआऊट केले होते?

दुसरा प्रश्न आहे राज्यात त्यांचा पक्ष सत्तेत सहभागी आहे. (विचारधारा की संधीसाधू वृत्ती त्यावर नंतर चर्चा करू) 

त्यांचे सख्खे मावसे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा देखील सहभाग आहे, मग इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे 

त्यांचे सरकार या कायद्या विरोधात ठराव पारित का करीत नाही? तेंव्हा त्यांचे रक्तातील नात्यांना त्या साद का 

घालीत नाही? सभागृहात ठराव घेण्या ऐवजी रस्त्यावर धरणे करण्याची स्टंटबाजी कशा करीता सुरू आहे.
एक बाब लक्षात घेतली पाहीजे की काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते स्वतः किंवा पक्षाचे आंदोलन करीत नाही तर इतर संस्था संघटनेच्या आंदोलनात हजेरी लावून भाषणे ठोकताहेत.त्या मध्ये हिंदू मतांच्या विरोधात जाण्याची भीती नाही, घाबरलेला मुस्लिम समुह आपोआप सेक्युलर म्हणून काँग्रेस राष्ट्रवादीशी जोडून राहतो.हे राजकीय गणित आहे

प्रणितीताईचे बेताल वक्तव्य त्यांचे बालबुध्दीचे प्रदर्शन असले तरी मला त्यातला आशय मात्र प्रचंड आश्वासक 

वाटते.तो म्हणजे ह्या देशातील लोकशाही वाचविण्याची, घटना विरोधातील शक्तीशी लढण्याची कुवत फक्त डॉ. 

बाबासाहेब आंबेडकरांच्या रक्तात आहे.इतर कुणात ती धमक नसल्याचे त्यांनी सिध्द केले आहे.अन्यथा राज्य व 

केंद्रात कुठल्याही सत्तेत नसलेले "बाळासाहेब आंबेडकर" यांनाच त्यांनी प्रश्न का केला असता? अर्थात काँग्रेसचे 

शिर्ष व राज्य नेतृत्व कुचकामी आहे, लढण्याची कुवत गमावून बसलाय याची त्यांना मनोमन खात्री पटलेली 

दिसते.म्हणुन त्यांना काँग्रेसचे नेते एनआरसी, सीएए व एनपीआर विरोधात लढत नसल्याचे काहीही वाटत 

नाही.मृतप्राय झालेले काँग्रेसचे 'मढे' लढणार नसल्याची खात्री करूनच त्यांनी बाळासाहेब व वंचित बहुजन 

आघाडी कडून लढण्याची अपेक्षा व्यक्त केलीय असे समजूया.
काय म्हणाल्या प्रणिती शिंदे वाह रे मोदी 'तेरी चाल वंचित बहुजन आघाडी व एमआयएम तेरे दलाल , कुठं गेलं रक्त... असं बोलून प्रकाश आंबेडकरांवर जोरदार टीका

राहिला प्रश्न मोदी हस्तक असल्याचा तर विधानसभा निवडणुकीत त्यांचे वडील एका उमेदवारी करीता संघ शरण 

गेले होते, हे सोलापूर जिल्ह्यातील जनतेने उघड्या डोळ्यांनी पाहिले होते.
हे वाचा - भीमा कोरेगाव विषय चिंगम नाही
त्यांचे रक्तातील नात्याचे चुलत भाऊ अजित पवार ह्यांनी तर पहाटे पहाटे भाजपचे मुख्यमंत्र्या सोबत 

उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी उरकून घेतला ते काय होते ह्याचा खुलासा महाराष्ट्राच्या जनतेला केला पाहिजे.

शेवटी जाता जाता एकच सल्ला की राज्यात व देशात बाळासाहेब व वंचित बद्दल आंदोलन, मोर्चे, धरणे यांची 

माहिती साठी एखादी डिबेट लावावी.आमच्या प्रवक्त्या दिशा पिंकी शेख यांना पाठवून प्रणितीताईंच्या ज्ञानात भर 

घालायला आम्ही तयार आहोत.तारीख, वेळ व स्थळ सांगावे मी व्यवस्था करतो.अट मात्र एकच आपल्या पक्षाच्या 

एनआरसी, सीएए व एनपीआर बाबतीत राजकीय भूमिका व रक्तातील नात्यांची मोदी, संघ, भाजपा बाबतची 

राजकीय बांधिलकी यावर उत्तरे द्यायला सज्ज असावे.

- राजेंद्र पातोडे - प्रदेश प्रवक्ता - वंचित बहूजन आघाडी

No comments:

Post a Comment