भिमाकोरेगाव विषय म्हणजे चिंगम नाही भिमाकोरेगाव विषय म्हणजे चिंगम नाही - बहुजन जागृती

बहुजन जागृती

डॉ बाबासाहेब आंबेडकर : बहुजन समाजाची राजनीतिक आणि सामाजिक चळवळ

Thursday, February 20, 2020

भिमाकोरेगाव विषय म्हणजे चिंगम नाही

<img src="koregaon-bhima-case.jpg" alt="koregaon bhima case is not a chewing gum"/>


याद राखा, भीमाकोरेगाव आमची अस्मिता आहे तिला न्याय देता येत असेल तर द्या, अन्यथा दलितांची थट्टा करू 

नका. दरआठ दिवसाला भिमाकोरेगाव उकरून काढलं जातंय, त्याचा आता चौता करून टाकला आहे. तीन 

पक्षाची सत्ता आहे, तेच एकमेकाला निवेदन देऊन दलितांची थट्टा करत आहे. पवारसाहेब पत्रकार परिषद घेऊन 

काय साध्य करणार आहात? दलितांच्या गाड्या जाळल्या, शिव्या खाल्या, दगड खाली, रक्तबंबाळ झाली, 

आंबेडकरी कार्यकर्ते अटक झाली, कोंबिंग झालं, बाटलीतले हातबॉम्ब लागले. आम्ही मुकाट सहन केलं, 

उद्धवस्त आम्ही झालो, स्वतःला सावरलं. तुमचं सरकार करत काही नाही फक्त "या बोटावरचा थुका त्या 

बोटावर करायचा" आणि आम्हाला बालिशासारखं झुलवत ठेवायचं. करायचंच असेल दलितांसाठी काही तरी 

करा, भिमाकोरेगाव हल्ल्यानंतर विध्यार्थ्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घ्या, नुकशान भरपाई द्या, पूजा सकटच्या 

हत्येचा छडा लावा, फडनविसला अटक करा, हल्ल्या दिवशी भिडे खरंच जयंत पाटलाच्या घरी होता का हे 

तपासा, असेल तर जयंत पाटलांना विचारा, कोणत्या प्रकारचे आंबे भिडेला चोखायला देत होतात? की दंगलीचे 

फुटेच सोबत बसून पाहत होतात? 
आम्ही गप्प आहोत आम्हाला गप्पच राहू द्या. सरसकट गेंड्याच्या कातडीकडून आमच्या अपेक्षाच राहिलेल्या नाहीत. आमच्यावर हल्ला करणारे सेना, भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेसचे जातीयवादी मराठा होते हे तुम्हाला माहीत नाही का?

तुम्ही कधीच कार्यवाही करू शकणार नाहीत? मुख्यमंत्री उद्धवजी 

म्हणतात एल्गार प्रश्न वेगळा आहे आणि भीमाकोरेगाव प्रकरण वेगळं आहे 

मी दलितांवर अन्याय होऊ देणार नाही.

हे वाचा : एल्गार परिषद कनेक्शनवर शरद पवारांचा खुलासा

उद्धवजी सिल्लोडच्या आंधरीच्या दलित महिलेला जिवन्त जाळून 

टाकलं याच कोण उत्तर देणार? बुलढाण्यात दलित वस्तीवर हल्ला 

झाला, हिंगोलित झाला, नाशिकला चार वर्षाच्या मुलीवर बलात्कार 

झाला, उद्धवजी काल डोंगरगाव सिल्लोडला मायालेकींना मारून 

टाकलंय आपल्या प्रशासनाला मिसिंग केस दिली त्यांना सापडलीच 

नाही, सापडली तेंव्हा पुरावे नष्ट झालेल्या प्रेत कुजलेल्या अवस्थेत? 

प्रेतासाठी गावाने गाडी दिली नाही, पोलिसांच्या गाड्या खराब होतील 

म्हणून आल्या नाही, बाजीवर प्रेत आणलं आणि तुम्ही दलितांवर 

अन्याय होऊ न देण्याची ढोंगी भाषा काय करताय?


तुमच्या मंत्र्याला अब्दुल सत्तारला विचारा तुझ्या मतदार संघात हे काय चालू आहे? तुम्ही दलित अत्याचार 

रोखण्याची भाषा करूच नका, दलितांचा तरुण बेरोजगार होतोय त्याला भिकाला लागायची वेळ आली आहे. 

बेरोजगारांच्या फाशीत वाढ होत आहे. सरकार तिघांचे आहे. "तू हणल्या सारख कर मी रडल्यासारख करतो" या 

तत्वावर हा खेळ सुरू आहे हा थांबवा. 

निवडणुकीच्या काळात मोदी-पवार भेट होते परंतु भिमाकोरेगाव साठी फक्त पत्रकार परिषद होते.

सीएए / एनआरसी विरोधात पवारांचा पक्ष कधी उतरणार आहे ते त्यांनी सांगावं? उगाच चालू असलेल्या 

आंदोलनाला रोखण्यासाठी, दलितांची वंचितची झालेली एकजुट तोडण्यासाठी हा खटाटोप करू आहे. 

एसआयटीच ढोंग, एनआयएचं ढोंग आम्ही काय मूर्ख वाटलो का? भिमाकोरेगावचा विषय म्हणजे चग्ळायचा 

चिंगम वाटला का?

त्या सरकारने खेळ केला हे सरकार खेळ खंडोबा करतंय. यांची मानसिकता पुन्हा एकदा भिमाकोरेगावच्या 

नावाखाली दंगली घडवण्याची असल्याचे दिसते. 

हे वाचा : गुलाल नीलचा प्रयोग महाराष्ट्रात अशक्य । काय कारण असावे ? 

न्याय दिला पाहिजे अन्यथा ही भंपकबाजी तरी थांबवली पाहिजे. आता आमचे पुन्हा ढिगभर प्रश्न प्रलंबित पडलेत 

त्यावर कोण बोलणार. काही लोकांना या विषयाआडून जिवन्त राहायचे आहे. त्यांच्या पोटाचा साधन म्हणजे 

भिमाकोरेगाव झालेलं आहे. सत्य सगळ्याला माहीत असताना ते शोधण्याच केवळ ढोंग चालू आहे. दलितांना 

न्याय न देता त्याची थट्टा करत राहणं हा सुद्धा दलित अत्याचार आहे आणि तो वारंवार हे राजकीय मंडळी करत 

आहेत.

2 वर्ष झालं न्याय मिळतं नाही. क्रांतिकारकांची आम्ही जमात आहोत. भीमाकोरेगाव लढाईतील शूरवीरांचे आम्ही 

वारसदार आहोत. आम्ही लढतोय, केसेस झेलतोय, उगाच आम्हाला गाजर, केळ, रताळ दाखवुन आमची 

अस्मिता असलेला भिमाकोरेगाव हा विषय चिंगम सारखा चगळू नका अन्यथा परिणाम वाईट होतील..!

- दिपक केदार |  राष्ट्रीय अध्यक्ष  | ऑल इंडिया पँथर सेना

No comments:

Post a Comment