बहूजन बांधवांनो घराणेशाहचे षढयंत्र समजून घ्या...!! बहूजन बांधवांनो घराणेशाहचे षढयंत्र समजून घ्या...!! - बहुजन जागृती

बहुजन जागृती

डॉ बाबासाहेब आंबेडकर : बहुजन समाजाची राजनीतिक आणि सामाजिक चळवळ

Sunday, October 31, 2021

बहूजन बांधवांनो घराणेशाहचे षढयंत्र समजून घ्या...!!




<img src="political-dynasty-biggest-enemy-of-bahujan-democracy.jpg" alt="RAJKIY GHARANESHAHI MODIT KADHA"/>





प्रस्थापित सत्ताधारी सत्तेत कायम का राहतात...?? घराणेशाही मजबुत का झाली...??

या दोन्ही प्रश्र्नांच्या ऊत्तराचा शोध घेतला असता जे जाणवते ते असे...!!

लोकशाही संपवून घराणेशाही मजबुत करण्यासाठी इथल्या प्रस्थापित सत्ताधारी वर्गाने बहूजन समाजाच्या अनेक संधीसाधू लोकांना हाताशी धरुन बहूजन समाजाची सत्ता हिसकावून घेतली आहे...!!
बहूजन समाजाकडे आवश्यक असलेली बहुमताची संख्याही आहे तरीही गेल्या सत्तर वर्षाचा इतिहास साक्षी आहे की,इथे ओबीसी घटक सत्तेत नाही तर सतत उपेक्षितच राहिला आहे...!!

महाराष्ट्राचा विचार करता इथं मोजकेच १६९ घराणे सतत सत्तेत कायम असतात गेल्या सत्तर वर्षांपासून इतर कुणालाही सत्तेत शिरकाव नाही हाच गेल्या सत्तर वर्षाचा अनुभव आहे...!!


जे प्रस्थापित सत्ताधारी आहेत ते बहूजन समाजातील संधीसाधू लोकांना सत्तेच्या तुकड्यांचे आमिषे देऊन गळाला लावतात आणि बहूजन समाजाच्या मतांची लांडगेतोड करतात.हा अनुभव लक्षात घ्या...!!



१) आदिवासी समाजातील भिमराव केरामला BHIMRAO KERAM भारिप बहुजन महासंघाने आमदार बनविले त्याला शरद पवारांनी फुस लावली ते चळवळीशी बेईमान झाले परंतु ते नंतर कधीच आमदार म्हणून निवडून आले नाही,आज ते भाजपमध्ये आहेत,त्यांच्या चारित्र्यावर संशयाचा डाग लागला तो लागलाच...!!

नुकसान कुणाचे झाले...??

बहूजन समाजाच्या मतांची लांडगेतोड झाली, गरीबाच्या नियतीवर बदनामीचा शिक्का बसला पक्षांतर करणाराचे राजकीय जीवन कुंठीत झाले,फायदा मात्र प्रस्थापित सत्ताधाऱ्यांचा झाला...!

२) बंजारा समाजातील मखराम पवार SAKHARAM PAWAR यांना भारिप बहुजन महासंघाने आमदार म्हणून निवडून आणले आणि मंत्रीसुद्धा बनविले ते चळवळीशी बेईमान झाले,ते शरद पवारांच्या नादाला लागून कॉग्रेस मध्ये गेले गेली विस वर्षे झाली आहेत कुठं आहेत मखराम पवार...??

ना आमदार,ना सत्ता ना स्टेज ना मानमरातब एक बहूजन समाजातील नेतृत्व प्रस्थापित सत्ताधाऱ्यांनी संपविले... नुकसान बहूजन समाजाचे झाले,प्रस्थापित सत्ता ऊपभोगतच आहेत...!!

३) अतिशय लहान जातसमुहातील बारी समाजाचे रामदास बोडखे RAMDAS BOKHADE यांना भारिप बहुजन महासंघाने आमदार बनविले तसेच रोजगार हमी मंत्री सुद्धा बनविले ते चळवळीशी बेईमान झाले, कॉग्रेस पक्षात गेले आज विस वर्षे झाली आहेत ते पुन्हा कधीच निवडून आले नाहीत आणि सत्तेत जाऊ शकले नाहीत, नुकसान कुणाचे झाले..??

, बहूजन समाजातील धडपड्या कार्यकर्ता संपला, प्रस्थापितांनी बहूजन समाजातील मतांची लांडगेतोड केली ते आजही सत्तेत कायम आहेत...!!

४) कोळी समाजाचे डॉ डि.एम.भांडे DR D M BHANDE भारिप बहुजन महासंघाने त्यांना जिल्हा परिषद अध्यक्ष, आमदार,मंत्री बनविले ते शरद पवारांच्या नादाला लागून राष्ट्रवादी काँग्रेसपक्षात गेले, पक्षाचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष म्हणूनही काही दिवस राहिले मात्र त्यांना गेल्या विस वर्षात कधीच कोणत्याच निवडणुकीत निवडून येता आले नाही आणि सत्ताही मिळाली नाही, नुकसान कुणाचे झाले...??

बहूजन समाजाच्या मतांची लांडगेतोड झाली, विधानसभेत सलग साडेतीन तास अभ्यासुपणे विषयाची मांडणी करणारा आमदार म्हणून नोंद असलेला अभ्यासु माणूस संपविला...!!

सत्ताधारी मजबूत झाले आणि बहूजन माणूस तथा समाज सत्तेपासून बेदखल झाला...!!

रामदास आठवले,प्रितमकुमार शेगांवकर, आणि रिपाइंच्या कोट्यातुन मंत्रीपद मिळविणारे आज कुठं आहेत...??


वरील सर्व राजकीय नेत्यांचा विचार केल्यास हेच स्पष्ट होते की,प्रस्थापित सत्ताधाऱ्यांनी आपली सत्ता अबाधित ठेवण्यासाठी ही खेळी केली आहे आणि बहूजन समाजाला सत्तेपासून बेदखल केले आहे...!!

आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोट्यातून आमदार झालेल्या अमोल मिटकरीचे AMOL MITKARI उदाहरण घ्या...!!

एकट्या अमोल मिटकरीला सहा वर्षांसाठी सत्तेची खुर्ची मिळाली त्यात समाजासाठी काहीही नाही, परंतु ब्राम्हण्यवादावर तुटून पडणारी वैचारिक तोफ थंड झाली प्रबोधनाचं सत्र थांबलं ही कितीतरी मोठी वैचारिक हानी झाली आहे हेही लक्षात घ्यावे...!!

शरद पवारांनी ब्राम्हण्यवादी विचाराला अभय दिले असेच म्हणावे लागेल...!!

ऊद्या यशपाल भिंगे YASHPAL BHINGE सारखा एखादा तरुण आमदार होईल त्याला व्यक्तीगत सहा वर्षांसाठी सत्तेची खुर्ची मिळेल. समाजहिताचे काय..??

धनगर आरक्षणाचे काय..??

तुमच्या ज्ञानाचा समाजाला फायदा होण्याऐवजी घराणेशाही मजबुत होते आहे याचीही जाणीव झाली असती तर फार बरे झाले असते...!!

घराणेशाही मजबुत करायची की, बहूजन समाजाच्या हितासाठी झटायचे हा प्रश्न आता प्रत्येक लहान समाजातील तरुणांनी चर्चेला घेतला पाहिजे...!!

वंचित बहूजन आघाडीचे प्रणेते अॅड बाळासाहेब आंबेडकर PRAKASH AMBEDKAR हे गेल्या चाळीस वर्षांपासून बहूजन समाजातील सहकारी सोबत घेऊन चळवळ करीत आहेत, बहूजन समाजाच्या सत्तेतील सहभागासाठी झटतं आहेत,कुणाबद्दलही आकस नाही...!!

किती जण गेले,कुणी कुणी चळवळीशी बेइमानी केली त्याचा हिशोब न करता कार्य चालू आहे, वंचित बहूजन आघाडीत आजही बहूजन समाजाचे अनेक होतकरू तरुण झोकून देऊन काम करीत आहेत...!!

प्रस्थापित सत्ताधारी मोगलाई मराठ्यांचे षढयंत्र समजून घेतले तर बहूजन बांधवांनो आपणंही सहज सत्तेत जाऊ शकतो हा आत्मविश्वास निर्माण करा आणि समाजहिताचे राजकारण करा...!!

बहुजन सारें एक होऊ...!!


सत्ता आपल्या हाती घेऊ...!!

धनगर,मराठा, मुस्लिम, आणि धोबी समाजाच्या आरक्षणाचा भिजतं पडलेला प्रश्न मार्गी लावता येईल...!!

एस सी.आरक्षणातील अबकड श्रेणीही ठरविता येईल मात्र त्यासाठी व्यक्तीगत हितापेक्षा समाजहिताला महत्त्व द्यावे लागेल हा निकषही लक्षात घ्या...!!

एक एक मोहरा टिपून शिकारी शिकार करतो आहे...!!

ज्याची शिकार झाली आहे,त्याला समाजाने बेदखल करुन वाटचाल करावी लागेल हाही निकष लक्षात घ्या...!!
जाणारा व्यक्तीगत फायद्यासाठी जातो आहे त्याला समाजहिताचे काही देणंघेणं नाही हेही समजून घ्या...!!

जयभीम.

- भास्कर भोजने - वंचित बहूजन आघाडी


No comments:

Post a Comment