संगमनेर | बौद्ध सरपंचाला चपलेचा हार घातल्याच्या निषेधार्थ संविधान देऊन हार घालून काढला संविधान सन्मान मोर्चा संगमनेर | बौद्ध सरपंचाला चपलेचा हार घातल्याच्या निषेधार्थ संविधान देऊन हार घालून काढला संविधान सन्मान मोर्चा - बहुजन जागृती

बहुजन जागृती

डॉ बाबासाहेब आंबेडकर : बहुजन समाजाची राजनीतिक आणि सामाजिक चळवळ

Tuesday, November 2, 2021

संगमनेर | बौद्ध सरपंचाला चपलेचा हार घातल्याच्या निषेधार्थ संविधान देऊन हार घालून काढला संविधान सन्मान मोर्चा

<img src="sangamner-victim-sarpanch-sathi-samvidhan-sanman-morcha.jpg" alt="samvidhan sanman morcha arranged for victim sarpanch in kasare village of sangamner taluka ahmednagar district"/>



01 नोव्हेंबर 2021 संगमनेर , गाव-कासारे,

संगमनेर कसारे येथील बौद्ध सरपंचाला चपलेचा हार घातल्याचे प्रकरणाने महाराष्ट्र हादरला आहे. ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांनी काल पीडित कुटुंबाची भेट घेतली आणि या घटनेला संगमनेर मध्ये मोर्चा काढून उत्तर देऊ अशा इशारा दिला. आज संगमनेर येथील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला अभिवादन करून बौद्ध सरपंचाला संविधान, महामनावाचा फोटो, गळ्यात पुष्प हार, निळा अस्मिता गळ्यात टाकून स्वागत करत संविधान सन्मान मोर्चा काढला.

संगमनेर तहसील कार्यलयावर मोर्चा धडकला जोरदार घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता. मोर्चा थेट तहसीलदार यांच्या कॅबिन मध्ये नेण्यात आला.



यावेळी बोलताना दिपक केदार यांनी सांगितले, अहमदनगर क्रांतिकारी विचारवंतांच शहर आहे, येते पुरोगामी विचारांचा वारसा आहे. नितीन आगे, सागर शेजवळ, सोनई हत्याकांड रोज होत असलेले दलित अत्याचार यामुळे हा जिल्हा दलित अत्याचारग्रस्त जिल्हा झाला आहे. एवढा दलित अत्याचार का याच उत्तर सत्ताधारी बाळासाहेब थोरात आणि विखे पाटील यांनी दिल पाहिजे. केवळ बौद्ध सरपंच आहे म्हणून त्याला काम करण्यास अडवणे त्याला त्रास देणे निंदनीय आहे.

स्वातंत्रयाच्या 75 वर्षांनंतर सुद्धा येते आम्हाला स्वतंत्र मिळालेलं नाही याचं हे उदाहरण आहे. आम्ही आजही आमचं स्वतंत्र शोधत आहोत. संविधानाने आम्हाला मताचा अधिकार दिला, नागरिकत्व दिलं, पदसिद्ध हक्क दिले. पदसिद्ध सरपंचाचा अवमान हा देशद्रोह आहे. देशाचा सर्व ढाच्या समान आहे.


<img src="sangamner-victim-sarpanch-sathi-samvidhan-sanman-morcha.jpg" alt="samvidhan sanman morcha arranged for victim sarpanch in kasare village of sangamner taluka ahmednagar district"/>





मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्र्यांनी ठोस पाऊलं उचलणे गरजेचे आहे. अट्रोसिटी ऍक्टला क्रॉस दरोड्याचा गुन्हा ही फॅशन झाली आहे. बौद्ध सरपंच आयुष्यात एकही चोरी केली नहो साधी एनसी त्याच्यावर नाही, 5 तास कोणता दरोडेखोर पोलीस स्टेशनला बसेल. जशी अट्रोसिटी दाखल झाली लगेच दरोडा दाखल केला. आम्हाला सामाजिक आयुष्यातून उद्धवस्त करणे, बदनाम करणे हेच षडयंत्र आहे. उद्या आमचे लेकरं दरोडेखोरांचे लेकरं म्हणून ओळखले जाणार का? त्यांचं आयुष्य बदनाम का करता? खोट्या केसेस करून खऱ्या घटनांना जन्म दिला जात आहे, उद्या जर महाराष्ट्रात पीडित चिडला आणि न केलेल्या घटनांचा बळी पडायला लागला तर तो खरे दरोडे टाकेल जे जे एफआयआर मध्ये लिहिलंय ते खरं करेल या नव्या क्राईमला सरकार जन्म का घालत आहे.

सवर्ण माय माउलीला पुढे करून विनयभंग सोनं चोरल्याच्या खोट्या तक्रारी दिल्या जातात. त्या मायमाऊलीला का बदनाम करताय, तिचा रेकॉर्ड का खराब करताय, तिचं चारित्र्य का उद्धवस्त करताय? तिच्या मुलींना मुलांना समाजात भविष्यात उत्तरं द्यावी लागतील याचं पोलीस यंत्रणेला भान का नाही? राजकारण्यांना का भान नाही? याचं उत्तर सरकारने द्यावे.

बौद्ध सरपंचाने जो मुद्दा उपस्थित केलाय तो राज्याचा मुद्दा आहे. गळ्यात हार घालणारा आरोपी हा महिला ग्रामपंचायत सदस्याचा पती आहे, तो कारभार हाकत होता त्याला बौद्ध सरपंचाने विरोध केला. राज्यभर हीच स्तिथी आहे, याचा विचार सरकारने गांभीर्याने करावा. ज्याला पद त्यांनीच कारभार करावा अन्यथा सदस्यत्व रद्द कराव. भावनिकतेवर नातंपोतं सांभाळत संवैधानिक पद भूषवणे गुन्हा आहे.




<img src="sangamner-victim-sarpanch-sathi-samvidhan-sanman-morcha.jpg" alt="samvidhan sanman morcha arranged for victim sarpanch in kasare village of sangamner taluka ahmednagar district"/>



ऑल इंडिया पँथर सेना मागणी करतंय की महेश बोऱ्हाडे या सरपंचाला चपलेचा हार घालणाऱ्या प्रवृत्तीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा. खोटा दरोडा गुन्हा मागे घ्या, मनोबल खच्चीकरण झालेल्या सरपंचाला 25 लाखांची मदत करा, पीडित कुटुंबाला संरक्षण द्या, दोन्ही प्रकरणे एकच अधिकारी पोलीस उपायुक्त यांच्याकडे तपासाला द्या, महाराष्ट्रातील दलित अत्याचार थांबवा, ज्या पोलीस निरीक्षकाने खोटा दरोडा गुन्हा दाखल केला त्याला तात्काळ निलंबित करा, गावात जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वात शांतता कमिटीची बैठक घ्या. अन्यथा राज्यभर आंदोलन छेडण्यात येईल.

यावेळी महाराष्ट्र सरचिटणीस जितेशभाई जगताप, महाराष्ट्र संघटक बाळू शेंडगे, उत्तर जिल्हा अध्यक्ष राम दरोले, राज्य प्रवक्ता संध्याताई खरे, संगमनेर तालुका अध्यक्षा करुणा, मोकळ, पायल यादव, महानंदा आठखिळे, रामपसरे इत्यादींच्या नेतृत्वात संविधान सन्मान आंदोलन करण्यात आले. यावेळी राज्यसरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे.

#deepakkedar
#JusticeForMaheshBorade
#AllindiaPantherSena

No comments:

Post a Comment