१ जानेवारी २०२१ च्या आधी ३५००० तरुणांवरील गुन्हे मागे घ्यावे! अन्यथा... १ जानेवारी २०२१ च्या आधी ३५००० तरुणांवरील गुन्हे मागे घ्यावे! अन्यथा... - बहुजन जागृती

बहुजन जागृती

डॉ बाबासाहेब आंबेडकर : बहुजन समाजाची राजनीतिक आणि सामाजिक चळवळ

Thursday, December 24, 2020

१ जानेवारी २०२१ च्या आधी ३५००० तरुणांवरील गुन्हे मागे घ्यावे! अन्यथा...


<img src="bbhima-koregaon-case-take-back-cases-against-ambedkarites.jpg" alt="before 1 january 2021 take back all cases against ambedkarites"/>


न्यायहक्काच्या लढाईसाठी रस्त्यावर उतरलेल्या तरुणांवर दडपशाही आणत नोंदवले गेलेले गुन्हे मागे घेण्यासाठी 

दीपक केदार  Deepak Kedar भाई यांच्या नेतृत्वात राज्यव्यापी निवेदन मोहीम आंदोलन.....!!!!



भीमजयंती घरातून केली,

धम्मचक्र प्रवर्तन घरातून केलं,

चैत्यभूमीला अभिवादन घरातून केलं,

आम्ही साथ दिली...

तुम्ही कधी देणार ?

भीमाकोरेगावचे ३५००० तरुणांवरील गुन्हे मागे कधी घेणार?

विद्रोहातून निर्माण झालेल्या क्रांतीचे प्रतीक असणाऱ्या भीमा कोरेगाव मधील विजय स्तंभला मानवंदना देण्यासाठी 

पोहोचलेल्या भीमसैनिकांवर जातीय मानसिकतेतून झालेल्या हल्ल्याची माहिती होताच महाराष्ट्रभर भीमसैनिक 

रस्त्यावर उतरले, हल्लेखोर असणाऱ्या मनुवादी अवलादिना जेरबंद करा म्हणून आवाज उठवू लागले. परंतु 

दि. २४ ते २८ डिसेंबर २०२० : सर्व जिल्हाधिकारी कार्यालय तहसील कार्यालय मार्फत मुख्यमंत्र्यांना राज्यव्यापी निवेदन मोहीम आंदोलन १ जानेवारी २०२१ च्या आधी ३५००० तरुणांवरील गुन्हे मागे घ्यावे! अन्यथा आंबेडकरी जनतेमध्ये संताप आहे कधीही उद्रेक होईल याची दखल घ्या, ऑल इंडिया पँथर सेनेच्या अचानक आंदोलनाला आपल्याला येणाऱ्या काळात सामोरे जावे लागेल. पुन्हा एकदा आंबेडकरी जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही.आता आम्ही आमच्या मुद्द्याचं राजकारण होऊ देणार नाही?


तत्कालीन नेत्यांना १ जानेवारीच्या दंगलीपेक्षा नेमकी त्यानंतर उभी राहिलेली न्याय हक्काची लढाई कायदा 

सुव्यवस्था बिघडवणारी वाटली. आणि न्यायासाठी लढणाऱ्या ३५,००० जणांवर प्रशासनाने गुन्हे दाखल करून 

आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला.....!!!

त्यावेळी दाखल केलेले गुन्हे मागे घेणे हा पुढील निवडणुकीत भीमसैनिकाची मते मिळवण्याचा मुद्दा बनवला गेला, 

परंतु बहुजनांचे प्रश्न हे फक्त निवडणुकीचे विषय असतात हे पुन्हा सिद्ध झालं आणि प्रशासनाला त्यांच्या वचनाचा 

विसर पडला....!!!!

त्यामुळे प्रशासनाला त्यांचे वचन लक्ष्यात आणून देत न्यायासाठी रस्त्यावर उतरलेल्या तरूनांवरचे गुन्हे मागे घेण्यास 

सरकारला भाग पाडण्यासाठी दीपक भाई केदार यांच्या नेतृत्वाखाली चाललेल्या राज्यव्यापी निवेदन मोहीम 

आंदोलन महत्वाचे आहे......!!!!

त्यामुळे महाराष्ट्रभर ऑल इंडिया पँथर सेना जिल्हाधिकारी, तहसील कार्यालय मार्फत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना 

निवेदन देवून ३५,००० तरूनांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी करणार आहे.....!!!!

- दीपक केदार | ऑल इंडिया पॅन्थर सेना



No comments:

Post a Comment