आपल्या पूर्वजांच्या शौर्याच प्रतीक भीमा कोरेगाव विजयस्तंभाला यावर्षी मानवंदना घरूनच... आपल्या पूर्वजांच्या शौर्याच प्रतीक भीमा कोरेगाव विजयस्तंभाला यावर्षी मानवंदना घरूनच... - बहुजन जागृती

बहुजन जागृती

डॉ बाबासाहेब आंबेडकर : बहुजन समाजाची राजनीतिक आणि सामाजिक चळवळ

Monday, December 21, 2020

आपल्या पूर्वजांच्या शौर्याच प्रतीक भीमा कोरेगाव विजयस्तंभाला यावर्षी मानवंदना घरूनच...





आंबेडकरी समुदायाचा वर्षारंभ हा अस्मितेसाठी रक्ताची सिंचन करणाऱ्या शूरवीर महार योध्यांना अभिवादन 

करूनच होत असते.यासाठी सुमारे 15 लाखापेक्षा अधिक लोक भीमा कोरेगाव विजय स्तंभ याठिकाणी आपल्या 

कुटुंबीयांसह जमत असतात. यंदा तसे न करण्याबाबतचे आवाहन वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या 

मान्यवरांकडून आमच्या सहित केले जात आहे.

काहींना कदाचित हे पटणार नाही. पण आपण हे पटवून घ्यायला कारण कोणाचा सर्वाधिक प्रादुर्भाव हा पुणे 

परिसरातून आहे. 26 डिसेंबर ते 26 जानेवारी या तीस दिवसांच्या कालावधीमध्ये covid-19 ची दुसरी लाट येण्याचा 

संभावना नाकारता येत नाही. आजच परदेशांमध्ये अनेक देशांनी दुसरे लॉकडाऊन स्वीकारले आहे. तसेच 

कोरणाने त्याच्या स्वरूपामध्ये बदल करून तो अधिक जोरकसपणे फैलावनारा करणारा जीवाणू म्हणून आकार 

घेतलेला आहे. प्रगत देश एकापाठोपाठ एक बंद होत आहेत पण भारतात आणि महाराष्ट्रात तसे होत नाही याचे 

कारण महाराष्ट्रात आणि भारतात सर्व काही आलबेल आहे असे अजिबात नाही. किंबहुना लॉकडाऊन महाराष्ट्राला 

आणि भारताच्या अर्थव्यवस्थेला अजिबातच परवडणारी नाहीत म्हणून आपण तो पर्याय स्वीकारत नाही. कडेकोट 

लोकडाऊन मध्ये दारूची दुकाने महसुलाला साठी उघडी ठेवावी लागली होती, त्यांना जनतेकडून पैसे 

मिळवण्यासाठी आव्हान करावे लागले होते यामुळे लोकडाऊन आपल्याला परवडणारे नाही हे आपण लक्षात घ्यावे.

माझा समाज माझी जबाबदारी अभिवादन घरच्या घरी


आज अर्ध्यापेक्षा अधिक महाराष्ट्र हा covid-19 पासून पूर्णतः चावलेला आहे याठिकाणी 14 दिवसांपासून फार 

क्वचित पेशंट आढळलेले आहेत ही समाधानाची बाब आहे. कोरेगाव उत्सव ज्या पुणे परिसरात होणार आहे त्या पुणे 

परिसरात आज रोजी वीस हजाराच्या आसपास पेशंट आहेत. तसेच या ठिकाणी मुंबई ठाणे पुणे नवी मुंबई मुंबई 

उपनगर या ठिकाणावरून येणाऱ्या उपनगरांमध्ये व शहरांमध्ये सुमारे पन्नास हजारांपेक्षा जास्त ऍक्टिव्ह covid-19 

चे पेशंट आहेत. त्यामुळे भीमा कोरेगाव या ठिकाणी आपण गर्दीने जमल्यास कोरोना चा प्रादुर्भाव होण्याची शक्यता 

नाकारता येत नाही. यामुळे जो अर्ध्यापेक्षा अधिक महाराष्ट्र यापासून सावरलेला आहे तो पुन्हा धोक्यात येऊ शकतो.

दिल्ली येथील मरकस प्रकरणी माध्यम व समाजकंटकांनी मुस्लीम समुदायाला ज्या पद्धतीने बदनाम केले आहे 

त्यापेक्षा अधिक पद्धतीने आंबेडकरी समुदायाला बदनाम करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आपण 

सर्वांनी आपल्या भावनांना आवर घालायलाच हवा.

बाकी आपण सर्वजण सुज्ञ समंजस आहोतच.

- राहुल डंबाळे | रिपब्लिकन युवा मोर्चा पुणे
   9822917119

No comments:

Post a Comment