धम्मचक्र प्रवर्तन दिन | देवत्व नाकारणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर धम्मचक्र प्रवर्तन दिन | देवत्व नाकारणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर - बहुजन जागृती

बहुजन जागृती

डॉ बाबासाहेब आंबेडकर : बहुजन समाजाची राजनीतिक आणि सामाजिक चळवळ

Sunday, October 25, 2020

धम्मचक्र प्रवर्तन दिन | देवत्व नाकारणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर




<img src="vijayadashmi-dhamma-chakrpravartan-din.jpg" alt="dr b r ambedkar adops buddhism on vijayadashmi in 14 octomber 1956"/>



धम्मचक्र प्रवर्तन दिन Dhamma Chakra Pravartan Din अर्थात अशोक विजयादशमी Ashoka Vijaya Dashami दिनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब 

आंबेडकर यांनी नागपूर येथे आपल्या लक्षावधी अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. दीक्षा देत असताना समता 

स्वातंत्र्य बंधुत्व आणि न्यायावर आधारित समाज व्यवस्था निर्माण करण्यासाठी बुद्ध धम्माची आवश्यकता त्यांनी 

नेहमीच अधोरेखित केली आहे.

माझा पुनर्जन्म होत आहे असे मी मानतो अशी एक प्रतिज्ञा या सोहळ्यामध्ये 22 प्रतिज्ञा 22 pledge देत असताना डॉ. 

बाबासाहेब आंबेडकर स्पष्टपणाने मांडतात यामध्ये सर्वकाही सामावलेले आहे, पण ते अधिक डोळसपणे आपण 

समजून घ्यावे. 1935 सालीच नाशिक येवला मुक्कामी " मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून 

मरणार नाही." अशी प्रतिज्ञा केल्यानंतर तब्बल 21 वर्ष अध्ययन करून बाबासाहेबांनी बौद्ध धम्म 

स्विकारलेला आहे

या कालावधीत त्यांनी हिंदू धर्माला तसेच अन्य सर्वच धर्मांना अंतर्मुख करून विज्ञानवादी बनण्यास व मनुष्यमात्राला 

निसर्गदत्त असणारे मानवी हक्क व अधिकार बिनदिक्कतपणे उपभोगण्यास सारखी व्यवस्था निर्माण करण्यासाठी 

वेळोवेळी संधी दिली. तशा सूचना दिल्या, तशी मागणी केली पण ते होऊ शकले नाही.


सन 1891 ते 1956 या 65 वर्षाच्या आयुष्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी चाळीस वर्ष जे समाजहिताचे कार्य 

केले ते इतके प्रभावी होते की त्यांच्या एका शब्दावर व विश्वासावर लक्षावधी लोकांनी आपला हजारो वर्षांपासूनचा 

धर्म नाकारला. हा धर्म नाकारणारी माणसं ही फार बुद्धिवंत प्रज्ञावंत किंवा चिकित्सक होतीच असे नव्हे. तर त्यांची 

संपूर्ण खात्री ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरां प्रतिच होती. बाबासाहेब जो निर्णय घेतील तो आमच्यासाठी बांधील 

असेल अशी भावना आज अखेरपर्यंत कोट्यावधी जनतेची आहे.

खरं तर 14 ऑक्टोबर 1956 रोजी अशोक विजयादशमी दिनी बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवलेला तथागत 

भगवान गौतम बुद्धांचा मार्ग हा अत्यंत मूलगामी व महत्त्वपूर्ण अशा स्वरूपाचा आहे. बाबासाहेब यांनी त्या वेळी 

भगवान बुद्ध यांचे ऐवजी स्वतःचा नवा धर्म स्थापन केला असता व त्याची दीक्षा या अनुयायांना दिली असती तरी ती 

त्यांनी स्वीकारली असती याबद्दल कोणाच्याही मनात कोणतीही शंका नाही. याविषयीची संपूर्ण जाणीव 

बाबासाहेबांना होती. तरीही गौतम बुद्ध यांच्या विचारांची दीक्षा त्यांनी आपल्या अनुयायांना दिली.

एकंदरीतच जगामध्ये सर्वात प्रभावशाली जर काही असेल तर ती देवत्वाची भावना. नेमकी तीच देवत्वाची भावना 

बाबासाहेबांनी नाकारली, झुगारली आणि बुद्धाचे अनुयायित्व पत्करले. म्हणूनच आधुनिक बुद्ध करणे सर्व जणांना 

बुद्धत्वाचा मार्गावर नेणारे महामानव ठरले ठरले तो दिवस म्हणजे धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा सम्राट अशोक 

विजयादशमी चा बाबासाहेबांच्या धर्मांतराचा.

धर्मांतर आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या आपणा सर्वांना कोटी कोटी शुभेच्छा


राहुल डंबाळे पक्षनेता | रिपब्लिकन युवा मोर्चा महाराष्ट्र

M - 9822917119





No comments:

Post a Comment