अभिनेत्री पायल घोष ने केला रिपाई पक्षात प्रवेश अभिनेत्री पायल घोष ने केला रिपाई पक्षात प्रवेश - बहुजन जागृती

बहुजन जागृती

डॉ बाबासाहेब आंबेडकर : बहुजन समाजाची राजनीतिक आणि सामाजिक चळवळ

Monday, October 26, 2020

अभिनेत्री पायल घोष ने केला रिपाई पक्षात प्रवेश




<img src="payal-ghosh-joins-ramdas-athawale.jpg" alt="actress payal ghosh joins ramdas athawales rpi"/>


केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री ना.रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले) या 

पक्षात अभिनेत्री पायल घोष यांनी आज जाहीर प्रवेश केला. अभिनेत्री पायल घोष यांची रिपब्लिकन पक्षाच्या महिला 

आघाडी चे राष्ट्रीय उपाध्यक्ष निवड करीत असल्याची घोषणा ना.रामदास आठवले यांनी केली. जुहू येथील इस्कॉन 

च्या गोविंदा हॉल मध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ना रामदास आठवले यांच्या उपस्थितीत अभिनेत्री पायल घोष 

तसेच अभिनेत्री सोनी कनिष्का ; बिल्डर योगेश करकेरा; उद्योजक अंकुश चाफेकर;ऍड. नितीन सातपुते ; आयशा 

सय्यद आदींनी यावेळी रिपब्लिकन पक्षात जाहीर प्रवेश केला. 

दिग्दर्शक अनुराग कश्यप वर अभिनेत्री पायल घोष यांनी अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. त्यानुसार वर्सोवा 

पोलीस ठाण्यात अनुराग कश्यप विरुद्ध तक्रार दाखल झाली आहे. त्याबाबत मुंबई पोलिसांनी अनुराग कश्यप यांची 

चौकशी केली आहे मात्र अद्याप त्यांना अटक केली नसल्याची नाराजी यावेळी अभिनेत्री पायल घोष यांनी व्यक्त 

केली. अनुराग कश्यप यांच्यावर आपण केलेले आरोप गंभीर असून त्याची चौकशी चालू आहे तो दोषी सिद्ध होईल. 

तो निर्दोष नाही. मात्र या प्रकरणाचा निकाल लागे पर्यंत बॉलिवूड ने अनुराग कश्यप वर बहिष्कार टाकला पाहिजे 

असे आवाहन अभिनेत्री पायल घोष यांनी केले. महिला म्हणून मला न्याय देण्यासाठी मला खंबीर साथ दिल्या बद्दल 

आपण केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांचे आभारी आहे. गरिबांची मदत करावी; महिलांना न्याय मिळवून 

देण्यासाठी त्यांना साथ द्यावी ; देशाची सेवा करावी यासाठी मी रिपब्लिकन पक्षात प्रवेश केला असल्याचे मनोगत 

यावेळी अभिनेत्री पायल घोष यांनी व्यक्त केले. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानाचा मी पूजा 

करते असे सांगत अभिनेत्री पायल घोष यांनी जय भीम चा नारा दिला. 

विडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा


बॉलिवूड मध्ये करियर करण्यासाठी ;अभिनेत्री म्हणून नाव कमविण्यासाठी येणाऱ्या नवीन मुलींचे जर शोषण झाले; 

त्यांच्यावर कोणी अन्याय केला तर न्याय मिळवून देण्यासाठी रिपब्लिकन पक्ष सदैव त्यांच्या पाठीशी उभा राहून 

खंबीर साथ देईल असे आवाहन यावेळी ना रामदास आठवले यांनी केले. यावेळी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय 

उपाध्यक्ष लाखमेन्द्र खुराणा; जिल्हा अध्यक्ष प्रकाश कमलाकर जाधव;किशोर मासुम; एम एस नंदा;गुजराती 

भाषिक आघाडी चे अध्यक्ष जयंती गडा; सोना कांबळे; रमेश पाईकराव; रतन अस्वारे; रमेश पाळंदे; महिला 

आघाडी च्या जिल्हा अध्यक्षा रेशमा खान; छायाताई राऊत:; आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.




No comments:

Post a Comment