एल्गार प्रकरणातील बनावट कागदपत्रे शरद पवारांनी सार्वजनिक करावीत - ऍड. प्रकाश आंबेडकर एल्गार प्रकरणातील बनावट कागदपत्रे शरद पवारांनी सार्वजनिक करावीत - ऍड. प्रकाश आंबेडकर - बहुजन जागृती

बहुजन जागृती

डॉ बाबासाहेब आंबेडकर : बहुजन समाजाची राजनीतिक आणि सामाजिक चळवळ

Tuesday, September 15, 2020

एल्गार प्रकरणातील बनावट कागदपत्रे शरद पवारांनी सार्वजनिक करावीत - ऍड. प्रकाश आंबेडकर







<img src="prakash-ambedkar-appeal-to-sharad-pawar.jpg" alt="sharad pawar disclose elgaar parishad papers says prakash ambedkar"/>


पुणे, दि. १५ - एल्गार परिषदेच्या प्रकरण हे बनावट असून त्याबद्दलचं पत्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना 

शरद पवार यांनी लिहले होते. ही कागदपत्रे शरद पवारांनी सार्वजनिक करावी व केंद्रातील मोदी सरकारच्या 

कारभाराचा पर्दाफाश करावा, त्याचबरोबर केंद्र सरकार लोकशाहीचा आवाज कसा दाबतोय, हे या 

कागदपत्रांवरून उघडकीस येईल. त्यामुळे शरद पवारांना विनंती आहे की, त्यांनी बोगस कागदपत्रे सार्वजनिक 

करावीत, अशी विनंती वंचित बहुजन आघाडीतर्फे प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून फेरतपास करण्याची मागणी केली. आणि केंद्र सरकारने राज्याकडून तो तपास काढून घेतला. ज्याअर्थी पवारांनी मागणी केली त्याअर्थी त्यांच्याकडे काही पुरावे असतील.तसेच शरद पवार हे भाजपच्या विरोधात आहेत असे आम्ही गृहीत धरतो. त्यांनी ते पुरावे जनतेसमोर मांडून नरेंद्र मोदींचे लोकशाही विरोधी कारस्थान जगासमोर आणावे
प्रकाश आंबेडकर काय म्हणाले ते पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

याबाबत प्रकाश आंबेडकर म्हणाले की, एल्गार परिषदेचे आयोजन सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश पी.बी. 

सावंत यांनी केले होते. दरम्यान केंद्रात आरएसएस, बीजेपीचे सरकार आल्यानंतर त्यांनी एल्गार परिषदेला 

बदनाम केले. एल्गार परिषदेच्या निमित्ताने केंद्राने राजकारण केले असून या प्रकरणाचा तपास चुकीच्या पद्धतीने 

करण्यात आला आहे. नको असलेले कायदे याठिकाणी लावण्यात आले. हे सुरू असतानाच, राज्यात देवेंद्र 

फडणवीसांची सत्ता गेली व उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे की, एल्गार प्रकरण बोगस असून, संबंधित कागदपत्रे बनावट 

तयार करण्यात आली आहे. त्यासाठी या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. असे पवारांनी मुख्यमंत्र्यांना 

लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. या प्रकरणातील खोटी कागदपत्रे तयार करण्यात आल्याचे पवारांना माहिती झाले 

आहे, तर त्यांनी ती कागदपत्रे सार्वजनिक करावी. त्यामुळे केंद्र सरकार लोकशाहीचा आवाज कसा दाबत आहे 

याची माहिती लोकांना होईल.

वंचित बहुजन आघाडीच्या विनंतीला शरद पवार हे मान देतील, अशी अपेक्षा बाळासाहेब आंबेडकर यांनी व्यक्त 

केली आहे. अशी माहिती वंचितचे राज्य प्रसिद्धी प्रमुख सुरेश नंदिरे यांनी दिली आहे.

बाईट - प्रकाश आंबेडकर

अध्यक्ष - वंचित बहुजन आघाडी

(मराठी-हिंदी)

सुरेश नंदिरे | राज्य प्रसिद्धी प्रमुख | वंचित बहुजन आघाडी




No comments:

Post a Comment