साधा निषेधही नोंदवण्याचे सौजन्य महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना ( Uddhav Thackeray )दाखवता आलेले नाही. ही
बाब अतिशय निंदनीय व महाराष्ट्राच्या राजकारणातील असंवेदनशीलतेचा कळस ठरणारी आहे.
आपण सर्व आंदोलकांनी व्यापक स्वरूपामध्ये #जनआक्रोश आंदोलनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री यांचेशिवाय
राज्यातील सर्व जिल्हा पालकमंत्री तसेच उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनादेखील या प्रश्नावर बोलते केले आहे व
कृतिशीलपने आंबेडकरी जनभावने सोबत उभे राहण्याचा संदेश महाराष्ट्राला देण्यासाठी त्यांना पीडित
कुटुंबीयांची भेट घेऊन सरकार पीडित कुटुंबीयांन सोबत आहे हे सांगण्यास भाग पाडले आहे.
हे वाचा : उद्धवजी मुंबईकरांच्या जीवांचं काय
खरंतर कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न हा गृहमंत्र्यांच्या अखत्यारित असल्यामुळे त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीचा विषय
आपण कायम लावून धरलेलाच आहे. पण राज्याचा प्रमुख व महाराष्ट्राचा मुख्यमंत्री या नात्याने उद्धवजी ठाकरे
यांनी या घटनांकडे अद्यापपर्यंत दुर्लक्ष करणे हे त्यांच्याविरुद्धच्या आंदोलनाची मुख्य कारण आहे.
#SpeakUpCM या जनआक्रोश ऑनलाईन आंदोलनाच्या द्वारे त्याची तीव्रता आपण सर्वजण राज्यभर वाढवत
आहोत.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जातीय अत्याचाराच्या प्रश्नावर ठामपणाने भूमिका घेऊन नव्याने धोरणे आखावीत
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जातीय अत्याचाराच्या प्रश्नावर ठामपणाने भूमिका घेऊन नव्याने धोरणे आखावीत
तसेच यासाठी जनआक्रोश आंदोलनाच्या माध्यमातून जातीय अत्याचाराच्या घटनांना प्रतिबंध करून यातील
आरोपींना जास्तीत जास्त कठोर शिक्षा व्हावी म्हणून पाच कलमी कार्यक्रम सुचवलेला होता. ज्या बाबतचे तब्बल
पंचवीस हजारांपेक्षा अधिक निवेदन ईमेलद्वारे तसेच 650 पेक्षा अधिक शिष्टमंडळात द्वारे निवेदने मुख्यमंत्र्यांच्या
नावे सादर केलेली आहेत. यावर देखील मुख्यमंत्री अद्यापपर्यंत बोलत नाहीत भूमिका घेत नाहीत त्यामुळे आपण
सर्वांनी मुख्यमंत्र्यांच्या विरोधामध्ये राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये मुंबई
येथे विधिमंडळाला घेराव घालण्याची आंदोलन देखील सुनिश्चित केले असून त्या दृष्टिकोनातून बैठका व नियोजन
सुरू आहे.
आपण सर्वांनी प्रत्येक घटनेच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांना जाब विचारला होता त्यांना बोलतं करायला हवं आणि
आपण सर्वांनी प्रत्येक घटनेच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांना जाब विचारला होता त्यांना बोलतं करायला हवं आणि
त्यांना #SpeakUpCM on atrocity या विषयावर धारेवर धरायला हवे.
- राहुल डंबाळे । नेते रिपब्लिकन युवा मोर्चा
No comments:
Post a Comment