उद्धवजी मुंबईकरांच्या जीवाचं काय? उद्धवजी मुंबईकरांच्या जीवाचं काय? - बहुजन जागृती

बहुजन जागृती

डॉ बाबासाहेब आंबेडकर : बहुजन समाजाची राजनीतिक आणि सामाजिक चळवळ

Thursday, May 14, 2020

उद्धवजी मुंबईकरांच्या जीवाचं काय?




<img src="cm-uddhav-thackeray-bmc-controlled-by-shiv-sena-many-years.jpg" alt="whaat shiv sena did for mumbaikaars for many years"/>



नरेंद्र मोदींच्या घोषणांनी आणि भाषणांनी भेदरलेल्या नागरिकांना मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी भावनिक 

दिलासा दिला. 'नवीन मुख्यमंत्री' म्हणून त्यांनी ज्या पद्धतीने जनतेची सहानुभूती मिळवली आहे त्याबद्दल त्यांचे 

अभिनंदन. राज्य सरकारच्या चुका/कमतरता याकडे राज्यातील जनतेने उद्धव ठाकरे नवीन असल्यामुळेच 

अनेक दिवस दुर्लक्ष केलं आहे. पण मुंबई शहराच्या बाबतीत उद्धव ठाकरेंना ही सहानुभूती देता येणार नाही. 

कारण गेली अनेक वर्षे मुंबई महापालिकेवर शिवसेनेचे राज्य आहे. शिवसेनेने इतक्या वर्षात या सत्तेचा नेमका 

कशासाठी वापर केला? कोणती व्यवस्था निर्माण केली? देशातील सर्वाधिक बजेट असलेल्या महापालिकेची 

आरोग्य व्यवस्था एका झटक्यात कोलमडून पडते याचा काय अर्थ घ्यायचा सामान्य मुंबईकरांनी? मुंबई 

महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना कोरोनाच्या काळात सुद्धा सुरक्षा साधने मिळत नाहीत याची जबाबदारी उद्धव 

ठाकरे आणि शिवसेनेला झटकता येणार नाही.

मुंबईतील सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांना, पत्रकारांना फोन करून लोक मदत मागताहेत, अनेक लोक सोशल 

मीडियावर मदतीची याचना करीत आहेत. मात्र रुग्णालयात भरती करून घेण्यासाठी बेड उपलब्ध नाहीयेत. 

मुंबई महापालिकेला पैशांची कमतरता नाहीये. मग सतत आपत्तीला तोंड द्यावे लागणाऱ्या मुंबई शहरात आरोग्य 

व्यवस्थेचे तीन तेरा का वाजले? आज पर्यंत कोणते आपत्ती व्यवस्थापन करून ठेवले शिवसेनेने? हा प्रश्न 

राजकारणाचा नाहीये, प्रश्न मुंबईकरांच्या जीवन-मरणाचा आहे. आणि आज तुमच्या नेतृत्वातील महापालिका 

मुंबईकरांना उपचार देण्यात अपयशी ठरत असून दिवसागणिक अनेक लोक मृत्यूच्या दाढेत ढकलले जात 

आहेत. लोकांना आता केवळ भावनिक दिलासा नकोय तर उपचार आणि आरोग्य सुविधा हव्या आहेत. आज 

मुंबईकरांच्या मनात अनेक प्रश्न आहेत आणि त्याचे उत्तर उद्धव ठाकरे यांना द्यावेच लागेल.

सिद्धार्थ मोकळे | प्रदेश प्रवक्ता | वंचित बहुजन आघाडी

No comments:

Post a Comment