म्हणून बाळासाहेबांनी आरएसएसला संविधानाच्या चौकटीत आणण्याचा आराखडा काँग्रेसला मागितला होता..... म्हणून बाळासाहेबांनी आरएसएसला संविधानाच्या चौकटीत आणण्याचा आराखडा काँग्रेसला मागितला होता..... - बहुजन जागृती

बहुजन जागृती

डॉ बाबासाहेब आंबेडकर : बहुजन समाजाची राजनीतिक आणि सामाजिक चळवळ

Saturday, April 25, 2020

म्हणून बाळासाहेबांनी आरएसएसला संविधानाच्या चौकटीत आणण्याचा आराखडा काँग्रेसला मागितला होता.....

<img src="prakash-ambedker-on-rss.jpg" alt="hence prakash ambedkar says bring RSS within the framework of the Constitution"/>



संघाने न्यायालये देखील काबीज केली आहेत, ह्याचा अनुभव २०१४ नंतर अनेक प्रकरणात आलेला असताना 

काँग्रेसचे नेत्यांना शहाणपण आले नाही.म्हणून २०१९ निवडणुकीत काँग्रेस सोबत युती करताना एड बाळासाहेब 

आंबेडकर यांनी संघाला संविधानाच्या चौकटीत आणण्याचा आराखडा काँग्रेस कडे मागितला होता.कारण 

देशापुढे संघाच्या रूपाने असलेला धोका बाळासाहेब आंबेडकर यांनी ओळखला होता.सोबतच काँग्रेसचे अनेक 

नेते संघ व भाजपा धार्जिणे असल्याने नोंदणी नसलेला संघ देशाच्या स्वातंत्र्यानंतर आजवर विनासायास आपला 

अजेंडा राबवित आहे.संघ भाजपा मुळे देशातील लोकशाही, संवैधानिक व्यवस्था धोक्यात आली आहे, संघाने 

पध्दतशीरपणे अनेक संवैधानिक व्यवस्था संपविण्यासाठी काम सुरू केले होते.त्यावर काँग्रेसचे नेत्यांना संघाला 

संवैधानिक चौकटीत आणण्याचा आराखडा देणे कठीण नव्हते.परंतु काँग्रेसचे नेत्यांनी वंचित ला भाजपची बी 

टिम म्हणून टवाळी सुरू केली होती. देशात विरोधी पक्ष ऊभा राहणार नाही ह्याची जेवढी काळजी संघ व 

भाजपाने घेतली त्यापेक्षा अधिक काँग्रेसचे राज्याराज्यातील आणि देशातील नेतृत्वाने देखील घेतली.परिणामी 

२०१४ साली राज्यात राष्ट्रवादीचे पाठिंबा घेऊन कायम राहिलेल्या भाजपाला २०१९ च्या निवडणूक मध्ये राज्यात 

सर्वाधिक जागा निवडून आणता आल्या.२०१९ नंतर भाजपा सोबत पहाटे पहाटे उपमुख्यमंत्री पदाची शपथ 

अजित पवार घेतात, त्यावर काँग्रेस ला आक्षेप नाही.राज्यात कमकुवत झालेल्या काँग्रेसचा सत्तेत, सरकार मध्ये 

सहभाग आहे.जिल्हा जिल्हयात एफआयआर दाखल असताना देखील त्यांना अर्णबला अटक करता आली 

नाही.मुळात काँग्रेस राष्ट्रवादी ने गृह खाते त्यांचेकडे असताना गोस्वामी ह्याला सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी 

मोकळीक दिली आहे.अन्यथा ईतके एफआयआर असताना त्याला अटक करण्यात काहीही अडचण नव्हती.

यावरून एक गोष्ट मात्र सिध्द झाली की काँग्रेसचे नेते स्वतः सोनिया गांधी यांच्या सन्मानार्थ लढायला तयार 

असताना राज्यातील सत्ताधारी काँग्रेस राष्ट्रवादीचे नेत्यांनी जाणीवपूर्वक हि अटक होवू दिली नाही.त्यामुळे अर्णब 

गोस्वामीने भाजपाच्या मदतीने राज्यातील आघाडी सरकारवर डाव उलटविला आहे.एकदा राष्ट्रवादीचे समजू 

शकतो कारण त्यांच्या पक्षाचा जन्मच सोनिया गांधी यांच्या विदेशी असल्याच्या मुद्दा वर झाला आहे.काँग्रेसच्या 

अनेक नेत्यांचे हात दगडाखाली आहेत, त्यामुळे राज्याच्या राजकारणात काँग्रेसला फार किंमत नाही.शिवाय 

त्यांच्या नेत्यांना त्यांच्या नेत्यांच्या इभ्रतीचे सोयरसुतक नाही हे देखील अर्णब प्रकरणात सिध्द झाले आहे.

सर्वोच्च न्यायालयात जाई पर्यंत अर्णब गोस्वामीला बेड्या का ठोकण्यात आल्या नाही, हा प्रश्न काँग्रेसी कार्यकर्ते 

यांनी सरकारला विचारला पाहिजे.अन्यथा तुमच्या पक्षातील सर्वोच्च नेत्यां बाबतीत असे घडत असेल तर सामान्य 

नेते कार्यकर्ते यांच्या बाबतीत राज्यातील नेते कसे वागतील याचे चिंतन केले पाहिजे.

- राजेंद्र पातोडे | प्रदेश प्रवक्ता | वंचित बहूजन आघाडी

No comments:

Post a Comment