खोटी बातमी देऊन राज्य सरकारला अडचणीत आणून भाजपला मदत करणारे एबीपी माझाचे वार्ताहर राहुल
कुलकर्णी यांना बांद्रा सत्र न्यायालयाने जमीन मंजूर करून त्याची सुटका केली आहे. बांद्रे स्टेशन गर्दी अफवा
प्रकरणातील अन्य 9 आरोपीना १८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत पाठविण्यात आले आहे मात्र राहुल कुलकर्णीला
लगेच जामीन मिळाला आहे. कुळकर्णीवर ही मेहेरबानी का करण्यात आली याचे उत्तर शोधण्यासाठी प्रसिद्ध
अमेरिकन विदुषी पेगी मेकिंटोस हिने मांडलेली व्हाईट प्रिव्हिलेजची संकल्पना समजून घेतली पाहिजे. पेगी
मेकिंटोसने मांडलेल्या सिद्धांतानुसार अमेरिकेतील श्वेत वर्णीय व्यक्तीला दैनंदिन जीवनात किमान ५० असे
जन्मसिद्ध लाभ मिळतात की जे अश्वेत,एशियन, हिस्पॅनिक वा अन्य समूहाला मिळत नाहीत. या छोट्याछोट्या
परंतु महत्वपूर्ण अशा जन्मसिद्ध लाभांची खुद्द त्या श्वेत व्यक्तीलाही जाणीव नसते. पेगी स्वतः श्वेतवर्णीय होती.
तरीही तिने केवळ जन्माच्या आधाराने रूढ झालेला हा सूक्ष्म भेदभाव टिपला व त्यावर प्रबंध लिहिला. भारतातील
ब्राह्मणांच्या संदर्भात हीच व्हाईट प्रिव्हिलेजची संकल्पना ब्राह्मण प्रिव्हिलेजच्या संदर्भात तपासली तर डोळ्यांना न
दिसणारे व जाणवणारे असे शेकडो जन्मसिद्ध लाभ आहेत की जे दैनंदिन जीवनात केवळ ब्राह्मण व्यक्तीला
जन्माच्या आधारे मिळतात.
उदा. ब्राह्मण व्यक्तीला केवळ नाव-आडनाव पाहून जातीच्या आधारावर समाजात मान-सन्मान मिळेल.
उदा. ब्राह्मण व्यक्तीला केवळ नाव-आडनाव पाहून जातीच्या आधारावर समाजात मान-सन्मान मिळेल.
1.नाव उच्चारताना पंत, श्रीमान,जी, पंडितजी असे आदरार्थी संबोधन जोडले जाईल.
2.मी ब्राह्मण आहे असे तो व्यक्ती अभिमानाने सांगेल.जात माहीत झाली तरीही त्यास हीन दृष्टीने पहिले जाणार
नाही
3.ब्राह्मण व्यक्तीला देशात कोठेही भाड्याने घर मिळण्यास कोणतीही अडचण येणार नाही.
4.ब्राह्मण आहे म्हणजे विद्वान,सुसंस्कृत,सभ्य आहे असे आपसूकच गणले जाईल,त्याच्या राष्ट्र प्रेमाबद्दल
कोणतीही शंका उपस्थित केली जाणार नाही.
5.ब्राह्मण व्यक्तीने एखादा गुन्हा केला असेल तर न्यायालयात त्याची बाजू मांडणारे वकील ब्राह्मण असतील.
केसची सुनावणी ब्राह्मण न्यायाधीशाच्या समोर होण्याची शक्यता जास्त असेल ( न्यायपालिकेत ९५ टक्के
न्यायमूर्ती ब्राह्मण आहेत). यामुळे जमीन मिळण्याची/निर्दोष सुटण्याची शक्यता जास्त असेल.
6.ब्राह्मण व्यक्तीवरील गुन्हा सिद्ध झाला तरी त्या कारणास्तव ब्राह्मण जातीस गुन्हेगार म्हटले जाणार नाही. किंवा
गुन्हेगारी प्रवृत्ती ब्राह्मण जातीशी जोडला जाणार नाही. इत्यादी ७) ब्राह्मण व्यक्तीने गुन्हा केला असेल तरी तो
कसा निर्दोष आहे हे प्रसार माध्यमातून,लिखाणातून वारंवार ठसविले जाईल.त्याच्या बाजूने सर्व ब्राह्मण खंबीरपणे
उभे राहतील व तपास यंत्रणावर दबाव आणतील.
राहुल कुलकर्णीला लगेच जामीन मिळणे हे ब्राह्मण प्रिव्हिलेजचे उत्कृष्ट उदाहरण आहे.राहुल कुलकर्णीला अटक
करणे कसे चुकीचे आहे हे अति उजवा अर्नब गोस्वामी,रजत शर्मा पासून ते अति पुरोगामी,सेकुलर,लिबरल वगैरे
म्हणविणारे “द वायर” चा सिद्धार्थ वरदराजन ते एनडीटीव्हीचा रविश कुमार पर्यंत सारा भट-ब्राह्मण परिवार
एकत्र आला. यावरून भारतात विचारांना,तत्त्वाला काहीही महत्व नाही तर ब्राह्मण असण्याला सर्वोच्च महत्व आहे
हेच अधोरेखित होते.
सुनील खोबरागडे | संपादक दैनिक जनतेचा महानायक,मुंबई.
सुनील खोबरागडे | संपादक दैनिक जनतेचा महानायक,मुंबई.
No comments:
Post a Comment