डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या दिवशी राजगृहावर फडकला काळा झेंडा डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या दिवशी राजगृहावर फडकला काळा झेंडा - बहुजन जागृती

बहुजन जागृती

डॉ बाबासाहेब आंबेडकर : बहुजन समाजाची राजनीतिक आणि सामाजिक चळवळ

Friday, April 17, 2020

डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या दिवशी राजगृहावर फडकला काळा झेंडा

<img src="black-flag-on-rajgruha.jpg" alt="dr anand teltumbade arrest on ambedkar jayanti"/>



राजगृहावरून काळा झेंडा लावून तेलतुंबडे यांच्या अटकेचा निषेध केला गेला या प्रकरणाची इतकी बोंब 

करण्याची गरज नाहीये ,लॉकडाऊनमध्ये सगळे एका ठिकाणी स्थानबध्द असल्याने रस्त्यावर जाऊन तर निषेध 

नोंदवू शकत नाहीत .की अनुयायांना लॉकडाऊनच्या वेळेस दंगे करा म्हणून सांगितले नाही ,जिथे आहेत तिथून 

साधा निषेधच नोंदवला आहे ,टीका करणार्यांना इतकं न समजणं म्हणजे समजून बुजून नाटक केल्यासारखे आहे 

,तेलतुंबडे भले वामपंथी असतील तरी ते आंबेडकर कुटुंबातील एक सदस्यच ना?आंबेडकरी कुटूंबातील एका 

सदस्याला डॉ. आंबेडकर जयंतीच्या दिवशी राजगृहावरून अटक होते , तिकडे भीमा कोरेगाव प्रकरणात भिडे 

आणि इतर दंगे पसर्वणार्या नेत्यांना अटक करण्याचे सोडून सरकार विरोधी वामपंथी नेत्यांना जबरदस्ती बदनाम 

करून वर्षेनुवर्षे तुरुंगात डांबून ठेवते ,

ही केस राज्य सरकारच्या अखत्यारीत येऊ नये म्हणून पूर्ण प्रयत्न केले जातात जेणे करून खऱ्या दंगेखोरांपर्यंत 

यंत्रणा पोहचलीच नाही पाहिजे. बिजेपीच्या या निर्णयाविरोधात राज्य सरकार विरोध करू शकत असताना या 

प्रकरणावर मुद्दामहून काना डोळा केला गेला कारण वामपंथी आणि आंबेडकरी हे दोघे कांग्रेस आणि बिजेपीचे 

प्रखर विरोधक आहेत .

कसा नोंदवायला निषेध : विडिओ लिंक 

राजगृह आंबेडकरी कुटुंबाचे वारसा हक्क संपत्ती आहे , तिचा वापर त्यांनी कसा करावा हे त्यांना सांगणे 

मूर्खपणाचे लक्षण आहे ,सर्व संपत्ती बाबासाहेबांनी ट्रस्टला दिली होती आणि या एका ठिकाणी वारसांना जर 

निषेध नोंदविण्याचा देखील हक्क नसेल तर समाजासाठी ज्यांनी आपले सर्व काही अर्पण केले त्यांच्या 

परिवारासाठी आपण काय करतोय यावर चिंतन करण्याची वेळ आली आहे असे म्हणावे लागेल.

No comments:

Post a Comment