सुजय डहाके जे बोलले ते अंतिम सत्य आहे. कारण 'चित्रपट सृष्टीत निर्माता-दिग्दर्शकांचे विचार 'कोरोना
व्हायरस' पेक्षा भयानक आहेत.' मालिकेत दिसणारी अडनावे ही तीन टक्क्यावाल्यांना अनुसरून असतात.
कोणीही खरं बोलत नाही. काम देण्यापासून सगळं आडनावावरून ठरवतात. आणि आमच्या मुलांची नावं बॉय
आणि स्पेशल थँक्स मध्ये दिसतात. आमची कला म्हणजे 'तमाशा' आणि साडेतीन टक्के वाल्यांची कला म्हणजे
'नटश्रेष्ठ...' इतका फरक व्यवस्थेमध्ये झालेला आहे.
लोकसत्ताला दिलेल्या डिस्कशनमंध्ये नक्की काय म्हणाले केसरी चित्रपटाचे दिग्दर्शक सुजय डहाके " ब्राह्मण अभिनेत्रींनाच मराठी मालिकांमध्ये संधी मिळते "
'एकलव्या'चा अंगठा कापणारी जमात इथलीच आहे. परंतु एकलव्यात क्वालिटी आणि कॉन्टिटी दोन्ही
असल्यामुळे त्याने हार मानली नाही. आजपर्यंत आमचे नामदेव, तुकाराम एकेरी शब्दात दाखवले. नाम्या, तुक्या
सांगितले. फुले बदनाम केले, फुलेंच्या तोंडातून 'पाटील' बदनाम केला. हा वैचारिक सांस्कृतिक दहशतवाद आहे,
तो आजच्या भोळ्याभाबड्या कलाकारांना समजणार नाही. आडनाव डाऊन मार्केट असल्यामुळे त्या
कलाकाराला काम सुद्धा त्याच पद्धतीचे दुय्यम देण्यात आले. किंवा कित्येकांना सडवलं गेलं, म्हणून आम्हाला ही
व्यवस्था बदलायची आहे. आमच्या मराठा-बहुजनांच्या मुलां-मुलींना प्रत्येक क्षेत्रात टॉपवर पाहायचं आहे यासाठी
आम्ही सदैव प्रयत्न करू..
सध्या सुरु असलेल्या मराठी मालिकांमधील काही अभिनेत्रीची नावे पाहू :
तुझ्यात जीव रंगला - अंजली पाठक । तुला पहाते रे - इशा निमकर । होणार सून मी ह्या घराची - जान्हवी गोखले । जुळून येति रेशीम गाठी - मेघना देसाई । एक लग्नाची दुसरी गोष्ट- राधा काळे । एक लग्नाची तिसरी गोष्ट - इशा देशमुख । राधा ही बावरी - राधा धर्माधिकारी । बंध रेशमाचे - नंदनी ब्रम्हपुरीकर । अस्सा सासर सुरेख बाई - जुई । गाडगे अँड सन्स - अमृता प्रभुणे । पुढचं पाऊल -कल्याणी सरदेशमुख । रंग माझा वेगळा -गार्गी । खुलत कळी खुलेना - मोनिका देशपांडे
सुजय भाऊ... आम्ही तीस वर्षापासून सांगतो आहोत की, आपल्या मराठा-बहुजनांची मुलं सगळ्या क्षेत्रात टॉपला
गेली पाहिजेत. त्यांनी सगळी क्षेत्र काबीज केली पाहिजेत. आपल्या प्रतिष्ठित आणि पैसा वाल्या लोकांनी
आपल्याच मुलांना संधी दिल्या पाहिजेत, तरच बहुजन समाज सुधारेल, प्रत्येक क्षेत्रात दिसेल.
जोपर्यंत लिहिणारा, बोलणारा आणि सांगणारा बहुजनांचा असणार नाही, तोपर्यंत आपण इतिहास घडवणार
नाही. इतिहास आपला असून काहीही उपयोग होणार नाही. कारण 'इतिहास घडवला मावळ्यांनी... परंतु
लिहीला मनुवादी कावळ्यांनी' म्हणून तो सोयीचा लिहिला आणि रंगवला गेला. आणि तिथेच आपल्या व्यवस्थेचा
घात झाला.
- संतोष शिंदे । जिल्हाध्यक्ष । संभाजी ब्रिगेड। पुणे.
पहा काय म्हणाले संतोष शिंदे
No comments:
Post a Comment