सावरकरांचे योगदान श्रेष्ठ आहे वक्तव्य करणाऱ्या शरद पोंक्षे यांची तर्कदुष्टी बाधीत झाली आहे, दुर्धर
आजारामुळे त्यांची सदसद्विवेकबुद्धी काम करेनाशी झाली असा टोला वंचित बहूजन आघाडीचे प्रवक्ता राजेंद्र
पातोडे यांनी लावला आहे.
काय म्हणाले शरद पोंक्षे " अस्पृश्य निवारण्यात आंबेडकर फुलें पेक्षा सावरकरांचे योगदान श्रेष्ठ "
अस्पृश्य वर्गातील समुहाच्या वेदना, त्यांना अमानवीय जगण्याची सक्ती करणारे धर्म व शास्त्राची भलावण
करणारे सावरकर कधीही महात्मा ज्योतिबा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याच्या आसपास देखील
पोहचू शकत नाही.ज्या धर्म ग्रंथ व रूढी परंपरांना चिरकालीन मानणारे सावरकर समतावादी व अस्पृश्यता
निवारक जाहीर केले जाणे, हा ठार वेडेपणाचे लक्षण आहे.
शरद पोंक्षे यांनी सहा सोनेरी पाने वाचावीत म्हणजे स्त्री आणि शुद्ध यांच्या बाबतीत सावरकर काय विचार करीत
याचा उलगडा त्यांना होईल.पोंक्षे यांच्या आजाराने गंभीर स्वरूप धारण केले असून त्यांना आता मानसिक त्रास
सुरू झाल्यानेच त्यांना सावरकर अस्पृश्यता निवारण कार्यात फुले आंबेडकर यांच्या पेक्षा काकणभर सरस
वाटलेत.त्यांची सदसद्विवेकबुद्धी काम करेनाशी झाल्याने त्यांनी अशी तुलना केली आहे.त्यांचे आजारपण लवकर
बरे व्हावे आणि त्यांनी महात्मा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे मानवमुक्तीचे केलेले कार्य याच जन्मी
उमजावी अशी सदिच्छा देखील या निमित्ताने राजेंद्र पातोडे यांनी व्यक्त केली आहे.
- राजेंद्र पातोडे | प्रवक्ता | वंचित बहूजन आघाडी
No comments:
Post a Comment