२०२० रोजी बिहार बुद्धभूमी येथील "बोधगया" विहाराला भेट दिली.त्या आपल्या ४३ सदस्यीय प्रतिनिधित्व
मंडळासहित चार दिवस भारत दौऱ्यावर आल्या आहेत. बोधगया येथे त्या आपल्या संपूर्ण टीम्सहीत पोहचल्या.
बुद्धांच्या चरणी नतमस्तक होऊन भारत आणि व्हिएतनाम यांचे मैत्रीचे संबंध अजून घट्ट व्हावेत अशी बुद्ध चरणी
इच्छा व्यक्त केली.त्यांनी बोधीवृक्षाला ३ वेळा प्रदक्षिणाही घातली. यावेळी उप्राष्ट्रपतींना साधना उद्यानातील डॉ
लानी हंटर आणि बौद्ध धर्मगुरू दलाईलामा यांनी लावलेल्या "धर्म घंटा" तीनवेळा वाजविली.
महाबोधी विहाराला परिभ्रमणानंतर उपराष्ट्रपती जवळच्या व्हिएतनाम बुद्धभूमी मॉनेस्ट्री भेट देऊन तेथे पूजा
अर्चना केली.
पत्रकारांशी बोलताना व्हिएतनामचे राजदूत फाम साम चाऊ म्हणाले कि हे तर आमचं सौभाग्य आहे कि इथल्या
पावन भूमीच दर्शन आम्हाला घेता आलं.अडीज हजार वर्षांपूर्वी ज्याठिकाणी बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली आणि
ज्यांनी संपूर्ण जगाला शांतीचा समतेचा बंधुभावाचा संदेश संदेश दिला अश्या भूमीत येऊन आम्ही धन्य आणि
प्रसन्न झालोत.आमच्या या दौऱ्यामुळे भारत आणि व्हिएतनाम देशातील आर्थिक आणि संरक्षण संबंध अजून
मजबूत होतील अशी अशा व्यक्त केली. त्याचबरोबर त्यांनी गया ते हनोई विमानसेवा लवकरच होईल अशी
अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.सध्या व्हिएतनाम मधून श्रद्धाळूंना बोधगयेला येण्यासाठी कलकत्ता आणि दिल्ली
विमानसेवा उपलब्ध आहेत.
विडिओ पहा ...
No comments:
Post a Comment