जेव्हा गांधी हि बनले होते आंबेडकरवादी - समिक्षक गिरीराज किशोर जेव्हा गांधी हि बनले होते आंबेडकरवादी - समिक्षक गिरीराज किशोर - बहुजन जागृती

बहुजन जागृती

डॉ बाबासाहेब आंबेडकर : बहुजन समाजाची राजनीतिक आणि सामाजिक चळवळ

Thursday, February 13, 2020

जेव्हा गांधी हि बनले होते आंबेडकरवादी - समिक्षक गिरीराज किशोर

<img src="padma-shri-giriraj-kishore.jpg" alt="padmashri giriraj kishore writes gandhi and ambedkar"/>


प्रसिद्ध कादंबिकार कथाकार नाटककार आणि समिक्षक गिरीराज किशोर यांचं रविवार दिनांक ०९ फेब्रुवारी

२०२० मध्ये हृदयात विकाराने कानपूरमध्ये वयाच्या ८३ व्य वर्षी निधन झाले.त्यामुळे हिंदी भाषिक साहित्य क्षेत्रात 

न भारत येणारी पोकळी निर्माण झाली आहे . गिरीराज किशोर ( Giriraj Kishore ) यांच्या "ढाई घर" आणि 

"पहला गिरमिटिया" या दोन चर्चित कादंबऱ्याच्यानिमित्ताने नेहमीच स्मरणार्थ राहतील .

गिरीराज किशोर याना साहित्य अकॅडमी अवॉर्ड (१९९२) व्यास सन्मान (२००२) पी एचडी छ शाहू महाराज 

युनिव्हर्सिटी (२००२) पदमश्री (२००७) आदी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे .

गिरीराज किशोर यांच्या "पहला गिरमिटिया" या सर्वात लोकप्रसिद्ध असलेल्या कादंबरीबद्दल सांगायचं झालं तर 

गिरमिटिया शब्दाचा अर्थ होतो करार किंवा गिरमिट. या कादंबरीत ते लिहितात , या करारानुसार हजारो 

भारतीय नागरिक दक्षिण आफ्रिकेसारख्या अनोळखी देशात गेल्या दीडशे वर्षांपासून ब्रिटिशांमुळे गुलामगिरीचे 

जीवन जगात आहेत.असेच एकदा महात्मा गांधी याना बॅरिस्टर झाल्यावर दक्षिण आफ्रिकेत ट्रेनमधून बाहेर 

ढकलण्यात आले होते. या वर्णभेदीचा भयानक चटका गांधींना इतकं जबर बसला कि त्यानी गुलमगीतीत जगत 

असलेल्या भारतीयांसाठी एक ओठ लढा उभा केला होता .

गिरीराज किशोर यांनी गांधींजींच्या जीवनावर प्रकाश टाकण्यासाठी इतर पुस्तकांपैकी एक त्याच नाव " गांधी 

और समाज ". या कादंबरीत त्यांनी कश्याप्रकारे महात्मा गांधींचा कल डॉ बाबासाहेब आंबेडकरांकडे वळत 

होत. हे लिहिलं आहे . हे पुस्तक ऑनलाईन किंवा विक्रेत्याकडे मिळू शकेल

पुस्तक - गांधी और समाज

लेखक - गिरीराज किशोर

प्रकाशन - राजकमल प्रकाशन

किंमत - रु. ५९५ /-

या पुस्तकातीळ हा एक मुद्दा मराठीत भाषांतरित :

विसाव्या शतकात अश्या दोनच व्यक्ती होत्या ज्यांनी मानवी हक्कांच्या क्षेत्रात भारतीय समाजावर खोलवर प्रभाव 

पाडला. एक होते महात्मा गांधी आणि दुसरे डॉ भीमराव आंबेडकर. मानवाधिकाराचे दोन दिशादर्शक आहेत. 

पहिले एखाद्या व्यक्तीच्या दुःखाला समजून घेणे आणि त्याचा प्रतिकार करणे तर दुसरे एखाद्या समाजाच्या 

समस्या समजून घेणे व त्याचे निवारण करणे ( संबंधित उपाय योजना करणे ). आंबेडकरांना मानवी चिंतांचा 

वेगळा प्रकार होता. आंबेडकरांची एवढा मोठा मागासलेला ( दलित ) समाज होता. आंबेडकर सुरुवातीपासूनच 

या सर्व हाल अपेष्टा परिस्तिथीतून गेले होते.त्यांनी ते सर्व दुःख्ख अनुभवले होते. या सर्व समस्यांचं निवारण फक्त 

मानवतावादी विचारानेच होईल असे त्यांचे मत होते

डॉ आंबेडकरांना समाजाची काळजी//करुणा दिसून येते आणि तीच आपल्याला बुद्धांच्या तत्वज्ञानातही 

सापडते.आंबेडकरांनी समस्या स्वतःपुरती मर्यादित न ठेवता त्या समस्या जगासमोर मांडल्या आणि त्यामुळेच या 

मागासलेल्या समाजासाठी लोकांच्या मनात मानव अधिकाराची जाण निर्माण करता आली . आंबेडकरांचे 

आंदोलन इथल्या धर्मवेड्या मनुवाद्यांशी होते

म गांधींनी आफ्रिकेतील गुलामांच्या मुक्तीसाठी आंदोलन उभे केले होते.त्यात गिरमिटिया भारतीय हे 

मागासवर्गीय ( दलित ) समाजाचेच होते. आणि त्यामुळेच गांधींनी आपल्या आचरणात त्या पीडित वर्गाच्या 

जीवनशैलीच अंगीकारत त्यांच्या संघर्षांचा एक हिस्सा बनले. तर डॉ आंबेडकर याना अशाप्रकारचे राहणीमान 

पसंत नव्हते कारण ते याच पीडित कष्टकरी वर्गातून शिक्षित होऊन पुढे आले होते. म्हणूनच ते आधुनिक 

युगातील वेशभूषा ( सूटबूट ) करीत. म गांधींना वाटे कि हे पीडित मजूर लोक त्यांचा फार आदर करतात , 

गांधीजींच्या उच्च राहणीमानामुळे पीडित वर्ग त्यांच्यासमोर येण्यास घाबरत होता.गांधीजी मानत कि जोपर्यंत 

परिवर्तन होत नाही तोपर्यंत यांच्या मनात समानतेचा भाव निर्माण करणे अशक्य आहे . 

डॉ आंबेडकरांपुढे आपल्या उपेक्षित समाजाला कसे प्रगतिवान करता येईल हे आव्हान होते तर गांधींच्या पुढे ह्या 

उपेक्षित समाजाला उच्च वर्णियांसोबत कसे समानता आणता येईल हे आव्हान होते. गांधींच्या त्यासाठी गरीब 

वस्त्यांमध्ये निवास करू लागले.थोड्याफार प्रमाणात सवर्ण लोकनांच्या मनात या उपेक्षित समाजाबद्दलच्या 

द्वेषातून मुक्त होत होता . पण अजूनही फार मोठा समाज या उपेक्षित अस्पृश्य समाजाचा द्वेष करतात आणि 

पुढेही करणार
या दोन मोठ्या नेत्यांचा ( डॉ आंबेडकर आणि म गांधी ) यांच्या अथक प्रयत्नाने देखील देशात जातपात आजही कायम आहे.
देश स्वतंत्र दिशेने वाटचाल करत होता तोपर्यंत म गांधींना डॉ आंबेडकरांचे म्हणणे पटू लागले होते. समतेसाठी 

डॉ आंबेडकरांची आखणी म गांधींना समजण्यास जास्त वेळ लागला नाही.आणि देश स्वतंत्र झाल्यावर म गांधी 

या समतेसाठी जातींने लक्ष घालणार होते.पण इथल्या धर्मवेड्या सवर्णांना हे मान्य नव्हते आणि काही दिवसात 

नथुराम गोडसेंनी गांधींची हत्या करून डॉ आंबेडकरांचा मार्ग अजून खडतर केला . 

आजच्या भाषेत बोलायचं झालं तर म गांधी हे देखील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने प्रेरित होऊन 

"आंबेडकरवादी"बनले होते असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

पुढे डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी संसदेत पोहचून भारतीय संविधान लिहून समतेचा पाया रचला.

No comments:

Post a Comment