सोलापूर । फसव्या जयसिद्धेश्वर महाराजांवर भडकले लिंगायत धर्मगुरू शिवानंद हैबतपुरे सोलापूर । फसव्या जयसिद्धेश्वर महाराजांवर भडकले लिंगायत धर्मगुरू शिवानंद हैबतपुरे - बहुजन जागृती

बहुजन जागृती

डॉ बाबासाहेब आंबेडकर : बहुजन समाजाची राजनीतिक आणि सामाजिक चळवळ

Friday, February 28, 2020

सोलापूर । फसव्या जयसिद्धेश्वर महाराजांवर भडकले लिंगायत धर्मगुरू शिवानंद हैबतपुरे

<img src="jaisiddheshwar-shivacharya-maharaj.jpg" alt="shivanand haibatpure exposes solapur mp jaisiddheshwar maharaj"/>



मिस्टर जयसिद्धेश्वर ऊर्फ 420,

तुम्ही लिंगायत आथवा जंगम तर नाहीतच पण तुम्ही या देशाचे नागरिक म्हणून देखील घेण्याच्या पात्रतेचे नाहीत.

या देशातील संविधानाची व सामान्य जनतेची फसवणूक करणारे तुम्ही लबाड व ढोंगी दरोडेखोर आहात. 

जनतेच्या अर्थातच शासनाच्या तिजोरीवर तुम्ही दरोडा टाकला आहात. वास्तविक पाहता सोलापूर लोकसभा ही 

मागासवर्गीय जातीसाठी आरक्षित होती. त्या मतदारसंघात तुम्हाला उभं रहाण्याचा कुठलाच अधिकार नव्हता. 

विशेष म्हणजे उमेदवार म्हणून तुमची काडीमात्र लायकी देखील नव्हती. ज्या मतदारसंघात तुम्ही उभे होता त्या 

मतदारसंघात तुमचा मठ आहे. आजही तुमच्या मठात मागासवर्गीय व इतर मागासवर्गीय लोकांना तुम्ही प्रवेश 

देत नाही. सोवळं ओवळं पाळता. प्रचंड अंधश्रद्धा पसरवणारे व जातियवाद पाळणारे तुम्ही तुमची लायकी 

संसदेची नव्हतीच मुळी . हे अगदी भाजपच्या सर्व नेत्यांना ही माहिती होतं. तुम्ही मागास नाहीत हे ही भाजपाला 

माहिती होतं. पण असं असूनही भाजपाने तुम्हाला उमेदवारी दिली. याचं एकमेव कारण म्हणजे सोलापूरच्या 

निवडणुकीत श्रदेय बाळासाहेब आंबेडकर उभे होते. ते विजयाच्या वाटेवर होते. अशा परिस्थितीत श्रद्येय 

बाळासाहेब आंबेडकर जिंकले असते तर महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड मोठी उलथापालथ झाली असती. 

प्रस्थापित गारद झाले असते. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर हे प्रस्थापित नेत्यांना मग तो कुठल्याही पक्षाचा असो 

त्यांना पचणी पडणारा विषयच नव्हता. म्हणून खास मोठं षडयंत्र रचून या मिस्टर जयसिद्धेश्वर ऊर्फ 420 ला 

मैदानात उतरवलं गेलं. आज या मिस्टर 420 जयसिद्धेश्वर चे जातीचे प्रमाणपत्र खोटे निघाले. वास्तविक या 420 चं 

सर्टीफिकेट बोगस आहे हे आगोदरच जगजाहीर होतं तरी या महाभागानी हलकटपणा केला. वास्तविक ही 

संविधानाची मोठी फसवणूक आहे. हा एक प्रकारचा देशद्रोह आहे. सामान्य जनतेची व लोकशाहीची ही क्रुर 

थट्टा आहे. आज जातपडताळणी समितीने व न्यायालयीन प्रक्रियेने या 420 जयसिद्धेश्वरांचा हरामखोरी पणा 

उघडकीस आणला. पण या नालायक व खलनायक जयसिद्धेश्वरांपेक्षा मोठा गुन्हेगार तर भाजपा आहे. त्या पक्षाचे 

पार्लमेंटरी बोर्ड ही तितकेच दोषी आहे हे विसरून चालणार नाही.विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर व समतावादी 

चळवळीच्या विरोधात जातियवादी शक्ती ने केलेला हा विषारी प्रयोग लोकशाहीला जीवघेणा ठरला. अशा 

परिस्थितीत या 420 जयसिद्धेश्वरांना मोकळं सोडून चालणार नाही. यांना रस्त्यावर अडवून जाब विचारला पाहिजे.

सोलापूरच्या निवडणूकीत मी पुर्णवेळ प्रचारक होतो. ती निवडणूक कशा प्रकारे जातियवादी बनवण्यात आली हे 

सर्वांना माहीत आहे. एवढे कारस्थान जाणीवपूर्वक श्रदेय बाळासाहेब आंबेडकर यांना व संविधानाला अडचणीत 

आणण्यासाठी केलं होतं . आज ते कारस्थान उघडे पडले आहे. अशा परिस्थितीत हे 420 जयसिद्धेश्वर महाशय 

निर्लज्जपणे दाखला प्रवासात हारवला आहे म्हणतात. म्हणजे यांची बौद्धिक पातळी किती आहे हे लक्षात येतं.

आम्ही लिंगायत आंदोलनाच्या वतीने या 420 जयसिद्धेश्वर स्वामींचा तिव्र निषेध करतो.

या नालायक माणसाने संविधानाचा अपमान तर केलाच आहे पण त्याच बरोबर यांनी लिंगायत धर्मसंस्थापक 

महात्मा बसवेश्वर यांचा व महाराष्ट्रातील एक कोटी लिंगायत समाजाचा अपमान केला आहे.

अरे 420 जयसिद्धेश्वर स्वामीजी,

तुमचा जय झालाच नाही. तो कधीही होणार नाही.

कारण तुम्ही षडयंत्राचा भाग आहात. तुम्ही EVM ची पैदास आहात...

थु तुमच्या हरामखोरी वर.

शरणु शरणार्थी !!

- शिवानंद हैबतपूरे (बसव कथाकार) / लिंगायत आंदोलन

No comments:

Post a Comment