इंदू मिल ठिकाणी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला प्रकाश आंबेडकरांचा विरोध इंदू मिल ठिकाणी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला प्रकाश आंबेडकरांचा विरोध - बहुजन जागृती

बहुजन जागृती

डॉ बाबासाहेब आंबेडकर : बहुजन समाजाची राजनीतिक आणि सामाजिक चळवळ

Sunday, January 19, 2020

इंदू मिल ठिकाणी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला प्रकाश आंबेडकरांचा विरोध

पुणे : आज पुणे येथे घेतलेल्या पत्रकाश परिषद मध्ये वंचित बहुजन आघाडी अध्यक्ष ऍड बाळासाहेब तथा प्रकाश

आंबेडकर यांनी इंदू मिल मधील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्यदिव्य स्मारकाला विरोध केला 

काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या या स्मारकाबद्दल बैठक

बोलवून समर्कची उंची १०० फूट वाढवून आवश्यक असणारा निधी राज्य सरकार देईल असा ठराव मंजूर केला 

होता.
वंचित बहुजन आघाडी प्रवक्ता गोविंद दळवी यांचं प्रकाश आंबेडकरांबद्दल मत
आज प्रकाश आंबेडकरांचा स्मारकाला केलेला हा विरोध मुंबईतील वाडिया हॉस्पिटल वाचविण्यासाठी महत्वाचा 

निर्णय ठरू शकतो

प्रकाश आंबेडकर म्हणाले कि आधीच मुंबई महानगरपालिकेने वाडिया हॉस्पिटलचे ९८ कोटी रुपये अनुदान 

थकवल्याने हे हॉस्पिटल बंद होण्याच्या मार्गावर आहे

त्यामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला जो निधी पुरविण्यात येणार आहे तो वाडिया हॉस्पिटलसाठी  

देण्यात यावा असा आदेश हायकोर्टाने द्यावा अशी मी विनंती करतो असं प्रकाश आंबेडकर म्हणाले

याच स्पष्टीकरण ते म्हणाले कि खरंतर इंदू मिलची जागा हि स्मारकासाठी नसून ती डॉ बाबासाहेब आंबेडकर 

यांच्या वैचारिक वारसा म्हणजे इंटरनॅशनल स्कूल ऑफ स्टडीजसाठी आहे ,

पहा नक्की काय म्हणाले प्रकाश आंबेडकर..

<img src="prakash-ambedkar-on-indu-mill.jpg" alt="prakash ambedkar on indu mill ambedkar memmorial divert money ot wadia hospital"/>


No comments:

Post a Comment