इंदू मिल ठिकाणी आंबेडकर स्मारक झालेच पाहिजे - रिपब्लिकन सेना इंदू मिल ठिकाणी आंबेडकर स्मारक झालेच पाहिजे - रिपब्लिकन सेना - बहुजन जागृती

बहुजन जागृती

डॉ बाबासाहेब आंबेडकर : बहुजन समाजाची राजनीतिक आणि सामाजिक चळवळ

Sunday, January 19, 2020

इंदू मिल ठिकाणी आंबेडकर स्मारक झालेच पाहिजे - रिपब्लिकन सेना

<img src="indu-mill-ambedkar-smarak.jpg" alt="prakash ambedkar opposes ambedkar smarak"/>



इतिहास गवा आहे,की संघर्ष केल्याशिवाय आंबेडकरी समाजाला आजपर्यंत काहीही मिळालं नाही,प्रत्येक गोष्ट

मिळवण्यासाठी आंबेडकरी समाजाला संघर्ष करावा लागला,मग तो अन्याय विरोधात मिळवण्यासाठी केलेला 

न्याय असो,विद्यापीठ नामांतर असो,खैरलांजी असो,अथवा इंदूमिल असो...!!!

यासाठी अनेकांनी,अनेक आंबेडकरी तरुणांनी संघर्ष केला, मागितल्या शिवाय,संघर्ष केल्याशीवाय, 

भांडल्याशिवाय,लढल्याशिवाय या जातीयवादी व्यवस्थेत आजपर्यंत आंबेडकर समाजाला कधीही काहीही 

मिळालं नाही,हे सत्य कोणीच नाकारू शकत नाही...!!

इंदूमिलच्या साडे बारा एकर जागेवर जागतिक कीर्तीचे आंतराष्ट्रीय स्थरावरील विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर 

यांचे स्मारक व्हावे,यासाठी रिपब्लिकन सेनेचे प्रमुख,सर्वेसर्वा सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेबांनी व 

त्याच्या समवेत हजारो भीमसैनिकांनी संघर्ष केला,लढा दिला,उपाशी,तापाशी राहून लढत राहिले,लाठ्या,काठ्या 

खालल्या,इंदूमिल ठिकाणी ठाण मांडून बसले.
इंदू मिल मधील डॉ बाबासाहेब आंबेडकार यांच्या स्मारकाला प्रकाश आंबेडकरांचा विरोध

त्यामुळे इंदूमिल मध्ये होणाऱ्या आंबेडकर स्मारकाला व त्यासाठी संघर्ष केलेल्या हजारो भीम अनुयायी,याचा 

विचार व्हावा,त्याचा कार्याचा ,कर्तृत्वाचा, संघर्षाचा,क्रांतिकारी विचारांचा सन्मान व्हावा..!!

त्या ठिकाणी इंदूमिलचा ताबा घेताना त्याठिकाणी वातावरण गंभीर झालं होतं,कुठलीही तमा न बाळगता 

आंबेडकरी अनुयायी यांनी त्याठिकानाचा ताबा घेतला,सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांनी रोखठोक 

भूमिका घेत,जोपर्यंत इंदूमिल ची सर्व जागा आंबेडकर स्मारक बनवण्यासाठी देण्यात येणार नाही तो पर्यंत ताबा 

सोडणार नाही अशी कडक भूमिका घेतली,तेव्हाच तत्कालीन सरकारने अखेर मान्यता दिली व आंदोलन मागे 

घेतलं..!!

आपण हे सर्व भीम अनुयायी यांचा संघर्ष त्याग डोळ्याआड करणार आहोत का?डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे 

स्मारक हे इंदूमिल मुंबईत स्थित झालेच पाहिजे,त्यासाठी हजारो कोटीच काय तर अधिक निधी लागला तरी 

चालेल,व तो सरकारने द्यावा,सरकार नक्की देईल अशी आशा करतो, पण हे स्मारक जागतिक कीर्तीचे 

व्हायलाच पाहिजे,या मतांचा मी आहे..!!

विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतराष्ट्रीय दर्जाचे स्मारक इंदूमिल ठिकणी करून,उभारून त्या सर्व 

भीमसैनिकांचा सन्मान करावा व आदर व्हावा,हीच माझी अपेक्षा..
भीमा कोरेगाव विजयस्तंभाला समस्त बहुजन समाजानी अभिवादन का करावे 

शेवटी आंबेडकर घराण्याचा व आंबेडकर घराण्यातील प्रत्येक व्यक्तीचा शब्द,विचार,भूमिका, आदेश,हा माझ्या 

समवेत असंख्य भीम अनुयायी यांच्यासाठी आदरणीय होता आहे,आणि यापुढे ही असेल त्यात दुमत न्हवत व 

कधी नसेल ही...

- मा.रविंद्र गायकवाड - रिपब्लिकन सेना-उपाध्यक्ष , पुणे जिल्हा